#भुतांच्या_गोष्टी
रवी अन् त्याची बायको मधु हे नवीन लग्न झालेलं जोडपं नुकतंच नवीन घरात शिफ्ट झाले होते.
दोघंही जण एकमेकांना फार जपत, नवलाईचे दिवस त्यांचे छान चालले होते
अचानक एक दिवस रवीला घरी यायला उशीर होणार होता त्याने मधुला तसं कळवलही आणि कामात गढून गेला.
१/३
जरा वेळानं त्याने घडाळ्याकडे पाहिलं रात्रीचे ११ वाजले होते, त्याने घरी निघायची तयारी केली आणि पार्किंगमध्ये गाडीकडे चालत निघाला.
इकडे मधु जेवायची थांबली होती, रवीची बात बघून पार पेंगुळली होती तेवढ्यात बेल वाजली.
२/३
दरवाजा उघडला आणि रवीला बघून खुश झाली.
म्हणाली चल रवी फ्रेश हो आज किती उशीर केलास, तुझ्या आवडीची भरली वांगी आणि ठेचा केला आहे आज.
आलोच म्हणून रवी जे घरात गेला ते अर्धा तास झाला तरी जेवण्याच्या टेबलावर येईना.
मधुनी दोनदा आवाजही दिला.
तेवढ्यात फोनची रिंग वाजली.
३/४
मधुने फोन उचलला तर उन्मेष रवीचा मित्र बोलत होता वहिनी रवीच्या गाडीला अपघात झाला आहे तुम्ही लवकर सिटी हॉस्पिटलला या.
४/५
मधु किंचाळत घरात गेली तर रवी शांतपणे म्हणाला शांत हो मधु आज आपल्याला खूप लांबच्या प्रवासाला जायचं आहे जिथं आपल्याला कुणीही विलग करू शकणार नाही. अगदी काळ सुध्दा!
मधु जी तिथं थिजली ती कायमची!!
तेव्हापासून रवी आणि मधु तिथेच असतात नीरव भीषण शांततेत आणि सदैव सावजाच्या शोधात 💀💀
५/५
#Armenia#ArmeniaVSAzerbaijan
अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन देशांमध्ये सध्या युद्ध पेटलय, आपल्यापैकी अनेकांसाठी हे देश अपरिचित असतील परंतु सध्या जगाच्या नकाशावर कुठल्याही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली तरी इतर देशांसाठी ती चिंतेची बाब आहे.
+
या युध्दाचं कारण ह्या दोन देशांमधला सीमा विवाद हे असून ह्याला मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमधील तेढही कारणीभूत ठरली आहे. अझरबैजान हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे तर आर्मेनिया हे ख्रिश्चन बहुल राष्ट्र आहे.
+
मुख्य विवाद अनेक वर्ष जुना नागार्नो- काराबाख प्रदेश असून हा ख्रिश्चन बहुल प्रदेश असून अझरबैजानच्या सीमेत येतो त्यांना आर्मेनियामध्ये विलीन व्हायचं आहे जे अझरबैजान देशाला मान्य नाही.
नागार्नो-काराबाख प्रदेश एकेकाळी ओटोमन, रशिअन आणि पर्शिअन साम्राज्याचा मध्यबिंदू होता.
+
आज काल आपण राजकारणात उजवे डावे किंवा राइट विंग लेफ्ट विंग असे सर्रास वापरतो.
पण ह्याची सुरुवात कुठून झाली ह्याविषयी थोडीशी माहिती..
1789 सालच्या उन्हाळ्यात फ्रेंच क्रांतीचे वारे वाहत होते. ज्याला कारण त्याआधीच्या काळातले क्रूर जुलमी शासक लुई १४ वा आणि लुई १५ वा हे ठरले
१/६
त्यात जेव्हा त्यांचा वारसदार लुई १६ वा (१७७४-१७९३) ह्याने पदभार स्वीकारला त्याचाही खर्चिक कारभार जनतेला मानवला नाही त्यानंतर सामान्य फ्रेंच लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि त्यांनी लोकाभिमुख सत्तेचा प्रस्ताव दिला.
२/६
त्यावेळेस लुई सोळावा ह्याच्या बाजूने जी मंडळी होती, ज्यांना राजाचे हकक अबाधित ठेवले जावेत असं वाटत होतं ती सदनाच्या उजव्या बाजूस बसली होती तर याविरुद्ध ज्यांना तत्कालीन व्यवस्थेत क्रांती, बदल हवा होता ते डाव्या बाजूस बसले होते!!
असा हा बसायच्या व्यवस्थेवरून सुरू झालेला मामला
३/६