*'राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास'* सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका, सासरा आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी वंशाचा संस्थापक असणार्‍या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करुन,त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खूपसून पूर्ण सैन्यातून मिरवून,त्यानंतर आपले भाऊ व साल्यांचे
मुडदे पाडून 21/10/1296 रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीपति झाला.सत्तेसाठीचा रक्तपात आटोपून अल्लाउद्दिनने भारतातील इतर राज्यांवर आक्रमण करुन लूट मिळवण्याचे सत्र सुरु केले.चित्तोड(इ.स1303) ,गुजरात(1304), रणथंबोर(1305),मालवा(1305),सिवाना
1308,देवगिरी(1308),वारंगल(1310), जलोर(1311),
द्वारसमुद्र(1311)आदि राज्यांवर आक्रमणे करुन अल्लाउद्दिनने परमार, वाघेला, चामहान(चौहान) ,यादव,काकाटीय,होयसाळ,पांड्य आदि साम्राज्ये उद्ध्वस्त केली. हजारोंचा नरसंहार केला,लाखोंचे धर्मपरिवर्तन केले,कोट्यवधींच्या संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि आमच्या अगणित माताभगिनींचा
शीलभंग करुन त्यांना आपल्या जनानखान्यात भरती केले वा बाजारात विकण्यास्तव गुलाम बनवून नेले. इतिहासकारांच्या लेखण्यांना लिहीतानाही लाज वाटेल इतके रानटी व सैतानी अत्याचार अल्लाउद्दिन व त्याच्या सैनिकांनी आम्हां भारतीयांवर केले. सैतानालाही लाज वाटेल असा हा 'इतिहासात
कुप्रसिद्ध' अल्लाउद्दिन खिलजी.अल्लाउद्दिन दिल्लीच्या गादीवर असतांना मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता व चित्तोडगड ही त्याची राजधानी होती.आणि रतिप्रमाणे अद्भूत,आरसपानी अशा लावण्याची खाण असलेली पद्मिनी मेवाडची महाराणी होती.सिंहली(श्रीलंकेचा ?)राजा गंधर्वसेन व
राणी चंपावतीची रुपगर्विता राजकन्या असणारी पद्मिनी लहानपणापासून युद्धकौशल्यात निपूण होती.तिच्या स्वयंवराचा पण असा होता की जो कोणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल, त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल.आणि असे म्हणतात की तो सैनिक म्हणजे स्वतः पद्मिनीच असे.तर असा पण जिंकून राणा
रतनसिंहाने पद्मिनीला वरले. रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रुपासाठी विश्वविख्यात होते.रतनसिंहाच्या दरबारी "राघव चेतन" नावाचा एक कलाकार होता.कसल्यातरी गुन्ह्यासाठी राणाने राघव चेतनला अपमानित करुन दरबारातून हाकलून दिले.सूडाग्निने पेटलेला राघव चेतन
दिल्ली राज्यातील एका वनात जावून बसला जेथे खिलजी नियमितपणे शिकारीला येत असे.एके दिवशी खिलजीचे शिकारी टोळके येताना पाहून राघव चेतनने सुंदर बासरी वाजवणे सुरु केले. बासरीचे सूर ऐकून अल्लाउद्दिनने त्याला आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने राणी पद्मिनीच्या अनुपम
सौंदर्याचे रसभरित वर्णन करुन सांगितले की,"तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे."हे ऐकून खिलजीच्या व्याभिचारी व लंपट मनात पद्मिनीच्या प्राप्तीची इच्छा बळावली.आणि पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी 1303मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व
गडाला वेढा घातला.राजपूतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होवूनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते.तेंव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की ,"मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले,तर मी दिल्लीला निघून जाईन." प्रजाहितास्तव राणाने हे मान्य केले.परंतु यामागील कुटिल डाव ओळखून
राणी पद्मिनीने स्वतः समोर न जाता आरशातून खिलजीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात यावे,असे सूचविले.त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी,लंपट खिलजी राणीचे रुप पाहून आणखीनच चेकाळला.'अतिथी देवो भव' या भारतीय मूल्याचे पालन करण्यास्तव
(परंतु देश-काल-पात्राचा विवेक न केल्यामुळे जी आपल्याच अंगावर उलटून अनेकदा आपली 'सद्गुणविकृती' ठरली) रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला.मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करुन खाली आपल्या पाडावात नेले आणि निरोप पाठवला की
"राणा जीवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा."
गडावर सैनिकी खलबतं झडली. आणि गडावरुन निरोप गेला की,"राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दिनच्या डेर्यात दाखल होईल,पण त्याबदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे."
ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालखी उचलणारे चार-चार पालखीचे भोई खिलजीच्या डेर्यात दाखल झाले.राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली.राणा रतनसिंहाला मोकळे करुन घोड्यावर बसवण्यात आले.पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली.
अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला.आणि....आणि हे काय?क्षणात पद्मिनी, त्या दासी व त्या भोयांच्या हातात पालखीत लपवून ठेवलेल्या तलवारी तळपायला लागल्या.दगा झाला होता तर!राणीचा मामा गोराच पद्मिनीचा वेश घेवून आणि त्याचा पुतण्या बादल(ही गोरा-बादलची काका-पुतण्याची
जोडगोळी राजस्थानी लोकगीतांमध्ये फार प्रसिद्ध आहे.)काही निवडक सैनिकांना घेवून स्त्रीवेश धारण करुन खिलजीच्या डेर्यात घुसले होते.काही कळायच्या आतच सपासप कत्तल सुरु झाली व भूमाता उष्ण शत्रूशोणिताचे पान करुन तृप्त व्हायला लागली.गोरा तर खुद्द अल्लाउद्दिनच्या तंबूत शिरला व त्याची गर्दन
उडवणार तो त्याने आपल्या दासीला समोर केले.स्त्रीवर वार न करण्याच्या राजपूत बाण्यामुळे गोरा थांबला अन् मागून आलेल्या खिलजीच्या सैनिकांनी गोराचे मुंडके धडावेगळे केले.आपल्या स्वामीचे प्राण वाचविण्यासाठी गोराने हौतात्म्य पत्करले.बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राणाला घेवून झपाट्याने
गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.
आता मात्र झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी भुजंग त्वेषाने चालून गेला.काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले.25 ऑगस्ट 1303 रोजी गडाचे दरवाजे उघडून
'जय एकलिंग,जय महाकाल' चे नारे देवून राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली.परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला.दहा-दहा सुल्तानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत रणभूमीरुपी मातेच्या चरणी अर्पण होवू लागला.लढाई संपली.राणासहित सर्व राजपूत मारले गेले.
अन् वखवखलेले सुल्तानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार,म्हणून गडात घुसले.
पण गडावर शिरताच पाहतात तर काय,एकही स्त्री दिसेल तर शपथ.थोडे पूढे जावून चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध 'विजयस्तंभ' ओलांडल्यावर लागणाऱ्या विस्तीर्ण मैदानावर जिथे आज *'जौहर स्थल'*
म्हणून पाटी लागलेली आहे,तिथे जावून पाहतात तर काय,अनलज्वाला आकाशाला भिडताहेत.राजपूतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळा सहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते,त्याच अग्नित उड्या घेतल्या.
स्वतःच्या शीलाचे व देव,देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका अग्नितच जळून भस्म झाल्यात.आईला मुलींच्याच रक्ताचा अभिषेक घडला.रणभूमीला रणरागिणींच्याच देहाच्या माला अर्पित झाल्या.अन् चित्तोडगडाने अनुभवला एक अलौकिक सोहळा, *'जोहाराचा सोहळा'*.तसे चित्तोडगडाने
यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवलेत,पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला. लढाई संपल्यावर सुमारे 30,000 निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दिनने कत्तल केली,असे त्याच्याच दरबारातील लेखक अमिर खुस्रोने लिहून ठेवलेय.तसेही प्रत्येक युद्ध आटोपल्यावर तेथील निःशस्त्र व निष्पाप
नागरिकांची कत्तल करुन,त्यांच्या मुंडक्यांचे पहाड रचून त्यापुढे बसून मदिराप्राशन करणे,हा अल्लाउद्दिनचा आवडता छंद होता,असे म्हणतात.आणि म्हणूनच अशा क्रूर,रानटी श्वापदाचे थोडेही महिमामंडन भारतीय जनमानस कधीही स्वीकार करु शकत नाही.
आणि आम्हां साऱ्या भारतीयांना मातृवत् पूजनीय असलेल्या महाराणी पद्मिनीच्या चारित्र्यावर यत्किंचितही शिंतोडे उडवलेलेही आम्हांला चालू शकत नाही.
शेवटी राजपूतान्याच्या गौरवशाली इतिहासातील जोहाराचे हे सोनेरी पान संपवतांना एवढेच म्हणावेसे वाटते-
ये हैं अपना राजपूताना,नाज इसे तलवारोंपे*
इसने सारा जीवन काटा बरची-तीर-कटारोंपे
ये प्रतापका वतन बना हैं आजादी के नारोंपे
कूद पडी थी यहाँ हजारों पद्मिनीयां अंगारोंपे
*गूंज रहीं हैं कण-कण से कुर्बानी राजस्थान की*
*इस मिट्टी से तिलक करों,ये धरती हैं बलिदान की।।*
*।।वन्दे मातरम्।वन्दे मातरम्।।*
*।।भारत माता की जय।।*

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with कट्टर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व

कट्टर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

5 Oct
वक्त रहते सुधर जावो मित्रो Image
यूपी के सीएम योगी जी का वो सच, जो बहुत कम लोग जानते हैं???
भयंकर रुप, जिसने पूरी भाजपा को हिलकर रख दिया????
बात अक्टूबर 2005 की है, एक UP का माफिया था। जिसका नाम मुख़्तार अंसारी था।वो खुली जीप में हथियार लहराते.महू में साम्प्रदायिक दंगा करवा रहा था।
3 दिन तक मौत का तांडव महू में मुख्तार करता रहा,उस वक़्त UP का CM मुलायम सिंह यादव था।और वो कई दफ़ा ये भी बोल चुका था कि
"मुझसे बड़ा गुंडा इस UP में नही है..." ये बात वो सिंर्फ़ योगी जी के लिये बोलता था।
जब दंगे को का तीसरा दिन था तो प्रशासन
Read 18 tweets
5 Oct
काँग्रेस सत्तेवर आली की कृषीविषयक कायदे केराच्या टोपलीत टाकू..राहुल गांधी..

याला निवडणूक जिंकायचीच नाहीये. इतका बिनडोक माणूस काँग्रेसचा नंबर वन नेता आहे ही देशाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे.
त्याहूनही चांगली गोष्ट ही आहे की इतर विरोधी पक्ष दरवर्षी हा सुधारेल म्हणून लाळ गाळत याच्या मागे फिरत असतात.त्यात आता शिवसेनेची भर पडली आहे ही महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. चार चोंगे उठून सोशल मीडियावर दंगा करतात म्हणून परसेप्शन तयार होत नसते.
फायदा झालेले शेतकरी निवडणुकीत कोणाला मत देणार ते मोदींना माहितीय. गरीब जनतेची नस कळते त्यांना.२०१९ च्या निवडणुकीतसुद्धा हेच घडले होते...लोकांना चक्कर आली जेंव्हा भाजपला ३०३ सीट्स मिळाल्या..@sachin_inc
Read 4 tweets
5 Oct
गेल्या काही दिवसापासुन हाथरस मधील मुलीची धिंड ह्या मुर्ख मिडियावाल्यांनी व गाणी गात हसत खेळत राजकिय पर्यटन करणाऱ्या नेत्यांनी काढली आहे. व ही लाजिरवाणी दृष्य जबरदस्ती पहावी लागत आहेत.
हे येवढे मोठे पत्रकार आहेत पण FIR दाखल करायला गेलेली
मुलगी व तिच्या भावाने लिहुन दिलेली जबानी पाहायचे कष्ट कोणी घेतले नाहीत. तेथुन अलीगड येथील हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट कोणी पाहिला नाही. पाहिला नाही हे खरे नाही ह्यांना पहिल्या दिवसापासुन हे माहित होते पण तेंव्हा ती मुलगी चांगली होती त्यामुळे घटना घडली
ती 14 तारखे पासुन ती मुलगी क्रिटिकल झाली नाही तो पर्यंत हे सगळे गप्प बसले होते.
अलिगडहुन मुलगी जास्त क्रिटिकल झाली म्हणुन तिला सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली येथे हलवले. तेंव्हा रक्ताचा वास यावा तसा ह्या राजकारणी लोकांना वास आला. व हल्ली सगळी मिडिया ही पक्षीय पातळीवर पोहचली आहे.
Read 28 tweets
4 Oct
सेकुलर लिबरल गैंग की घ्राण शक्ति बहुत मजबूत है । वे आसन्न खतरों को पहचान लेते हैं । सोनिया -अहमद पटेल -येचुरी- राजदीप सरदेसाई- सागरिका घोष ने वर्ष 2000 में भांप लिया था कि उनके सत्तर साल पुराने इको सिस्टम को नरेन्द्र मोदी ध्वस्त कर देगा
क्योंकि वह स्थापित राजनैतिक धारा के विपरित चलने वाला है । वह परिवार से दूर है ,घोर हिंदूवादी है ,प्रचंड इमानदार है‌। उसे रोकने का मौका मिला 2002 के दंगों में ।क्या क्या कुचक्र नहीं रचे गए , तत्कालीन गृहमंत्री को तो जेल में बंद किया ही गया ,इशरत जहां एनकाउंटर केस में
IPS बंजारा सहित SIT की सारी टीम को सस्पेंड कर दिया गया। और CBI ने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी को दिल्ली में सात सात घंटे बेंच पर बिठा कर रखा गया । राणा अय्यूब ने वाशिंगटन पोस्ट में Butcher of Gujarat नामक लेख लिखा और गुजरात फाइल्स नामक किताब लिखी।
Read 7 tweets
27 Sep
मी अलीकडेच 'भारतीय ज्ञानाचा खजिना' नावाचं प्रशांत पोळ ह्यांनी लिहिलेलं अतिशय महत्वपूर्ण पुस्तक वाचलं. सदर पुस्तकाचं प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलंय आणि पुस्तकाला मा. मोहन भागवतांची प्रस्तावना आहे. सदर पुस्तकातून मुस्लिम आक्रमक भारतात येण्या आधीच्या
संपूर्ण कालखंडात सर्व जगात आपला कसा दबदबा होता, आपण ज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि समृद्धीच्या बाबतीत जगात कसे सर्वश्रेष्ठ होतो ह्यावर संशोधन करून प्रशांत पोळ ह्यांनी अभ्यासपूर्णपणे मांडलेलं आहे. पुस्तकातून उलगडलेली काही अद्भुत माहिती अशी -
१. पेशावर/रावळपिंडीपासून ते जावा-सुमात्रा (इंडोनेशिया) पर्यंतच्या भूभागावर सन २०० BC ते सन १००० अशी सुमारे १२०० वर्ष संस्कृत ही भाषा बोलली जायची.

२. 'तक्षशीला' विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकायला यायचे. चाणक्य, पाणिनी ही काही तिथली विद्यार्थ्यांची नावे.
Read 16 tweets
27 Sep
क्या ऐसा ग्रंथ किसी अन्य धर्म मैं है ?
इसे तो सात आश्चर्यों में से पहला आश्चर्य माना जाना चाहिए ---

यह है दक्षिण भारत का एक ग्रन्थ

क्या ऐसा संभव है कि जब आप किताब को सीधा पढ़े तो रामायण की कथा पढ़ी जाए और जब उसी किताब में लिखे शब्दों को उल्टा करके पढ़े
तो कृष्ण भागवत की कथा सुनाई दे।

जी हां, कांचीपुरम के 17वीं शदी के कवि वेंकटाध्वरि रचित ग्रन्थ "राघवयादवीयम्" ऐसा ही एक अद्भुत ग्रन्थ है।

इस ग्रन्थ को
‘अनुलोम-विलोम काव्य’ भी कहा जाता है। पूरे ग्रन्थ में केवल 30 श्लोक हैं। इन श्लोकों को सीधे-सीधे
पढ़ते जाएँ, तो रामकथा बनती है और
विपरीत (उल्टा) क्रम में पढ़ने पर कृष्णकथा। इस प्रकार हैं तो केवल 30 श्लोक, लेकिन कृष्णकथा के भी 30 श्लोक जोड़ लिए जाएँ तो बनते हैं 60 श्लोक।

पुस्तक के नाम से भी यह प्रदर्शित होता है, राघव (राम) + यादव (कृष्ण) के चरित को बताने वाली गाथा है ~
Read 25 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!