शुभ संध्या मित्रांनो,एक कबीर कथा
कबीराचा मुलगा कमाल एकदा काशीतून फिरत असता एका घराचे दार उघडे दिसले.त्याने आत डोकावून पाहीले तर तिथे एक बाई दळण दळत होती
कमाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता.दाणे जातात कुठे ???
त्याला रडू आले
त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले
त्याने विचार केला,आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत
कमाल घरी आला, वडीलांजवळ जाऊन रडू लागला
कबीर महाराज विचारताहेत..
"कमाल अरे काय झाले रे ?
कमाल सर्व पाहिलेलं सांगतो,आणि म्हणतो.
"जात्यामध्ये सर्व दाणे मेले"
कबीर कमालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले
जात्याची वरची पाळी बाजुला करुन दाखविली
खुंट्याजवळ२,४दाणे तसेच चिकटलेले होते
ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते.
कमाल च्या भाषेत ते वाचले

"आपल्याही जीवनाच्या जात्याला एक खुंटा आहे."
"तो म्हणजे सदगुरु."
"त्यांना धरुन ठेवावे."
"त्यांचा आधार घ्यावा."
"जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते..."
विनाशाची भिती टाळायची असेल तर अविनाशी खूंटा सदगुरु..
त्यांचा आधार घ्यावा..
तो घट्ट धरुन ठेवावा..
जीवाला निर्भय करणारी एकच विभूति
ती म्हणजे सदगुरु🙏
🙏गुरुविण दुजा नाही आधार🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा

Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rajrajsi

13 Oct
मित्रानो गेले काही दिवस मी रोज समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पोस्ट करत आहे
मनाच्या श्लोकात श्री रामाचे नाव असते.
श्री राम कुठे नाही, जळी स्थळी काष्टी पाषाणी राम राहे भरुनी
इतकंच नाही तर आपल्या सर्वांच्या नावातच राम भरून राहिला आहे असे सांगितले तर
@kul_anagha Image
कसा हे मी नाही दुसरे महान राम भक्त संत तुलसीदास सांगून गेलेत कसा ते पाहू या "आपले नाम राम" ह्या धाग्यात
माझ्या वाचनात आल्यावर मी खूप टेम्प्ट झालो आपल्यापुढे ठेवायला म्हणून आज बॅक टू बॅक धागा लिहित आहे
खात्री आहे आपल्याला नक्की आवडेल
@Vishakh50862352 Image
तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की,
"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?
तुलसीदास म्हणाले :- "हो"
भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ?
तुलसीदास :- "हो नक्की"
@RajeGhatge_M @TheDarkLorrd
Read 10 tweets
12 Oct
मित्रानो आज आठवड्याचा पहिला दिवस,
या आठवड्याचा शनिवार शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ
आजपासून विजयादशमी पर्यंत शक्य तो थ्रेड देवी भवानीच्या संदर्भात पोस्ट करायचा मानस आहे
त्या निमित्ये देवी सेवा आणि देवीचे नाम घेणे होईल
@RajeGhatge_M @Vishakh50862352
२ दिवसांपूर्वी मी तुळजाभवानी मातेच्या घोर निद्रेच्या संदर्भात एक विडिओ पोस्ट केला होता
पण माता तुळजाभवानी ची हि एवढीच निद्रा नसते
आजचा धागा त्या महामायेच्या निद्रे विषयी आहे
चला पाहू या हा

"मंचक निद्रा" धागा

श्री तुळजाभवानी देवी वर्षातून ३ वेळा निद्रा घेत असते
या निद्रा दोन प्रकारच्या मंचकावर (पलंगावर) होत असतात ते खालीलप्रमाणे.

१) चांदीचा मंचक

२) लाकडी मंचक

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते.
उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते
@shivajirao29
Read 13 tweets
10 Oct
मित्रानो शनिवार रविवार आले कि सर्व जण आपल्या परीने २ निवांत दिवस कसे मजेत घालायचे याचे प्लॅनिंग करतात.
पण दुर्गप्रेमी आज कुठल्या किल्लयाचा ट्रेक करायचा हे खूप आधीच ठरवून
शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवार सकाळीच
आपल्या मोहिमेला सुरवात करतात
@Amruta39117837
चला आज आपण हि ट्रेक करून फिरून येऊया
अशा एका किल्ल्यावर ज्या किल्ल्याशी
माझ्या कॉलेज जीवनाच्या आठवणी निगडित आहेत
किल्ला म्हंटले कि त्याला भूगोल आणि इतिहास हा हवाच
नाही तर तो किल्ला कसला
@RajeGhatge_M
महाराष्ट्रातले बहुसंख्य किल्लयांना
मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत,
पण आपण आज चाललो आहोत त्या किल्ल्याला काही हजारो वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे.
या किल्ल्याचा संदर्भ श्री रामाचा पूर्वज असलेल्या
राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे
Read 27 tweets
6 Oct
"राहुल तेवतीया आणि २०२०"
दोन दिवसापूर्वी एक भन्नाट समीकरण वाचनात आले
ते आपल्यापुढे ठेवत आहे २७ सप्टेंबरला शारजा येथे झालेल्या IPL २०-२० खेळात रात्रीचे साडे अकरा वाजेपर्यंत राहुल तेवतीया हा खेळाडू साऱ्या क्रिकेट रसिकांच्या चेष्टेचा आणि रंगाचा धनी बनला होता
@gajanan137
मला हि आठवतंय कि डॉ आनंद रंगनाथन या नामवंत सन्मान्य व्यक्तीला हि ह्या राहुल बद्दल ट्विट करावंसं वाटलं होत कि हा नक्की करतोय काय १७ वि ओव्हर संपली २० बॉल खेळून सुद्धा त्याला एक हि चौकार व षटकार मारता आला नव्हता समालोचक म्हणत होते हा रिटायर्ड आऊट का होत नाही
@Amruta39117837
१७व्या ओव्हर नंतर त्याच्या टीम ची जिंकण्याची शक्यता होती
२% फक्त
अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्युट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला चाचपडणारा राहुल तेवतिया स्ट्राईकवर त्याच्याकडून शून्य आशा आणि मित्रानो चमत्कार घडला
Read 14 tweets
5 Oct
डोंबिवलीतील विलास सुतावणे यांची "विविसू डेहरा" ही संस्था गेली अनेक वर्षे पर्यटकांना देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या गाठी भेटी घडवून आणते. याबरोबरच सैनिकांच्या शौर्यावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करणे, निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची व्याख्याने आयोजित करणे, Image
दिवाळीमध्ये देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांना फराळ, सदिच्छा भेट म्हणून पोहोचवणे हे उपक्रम सातत्याने राबवत आहे.या वर्षी पण दिवाळी फराळ पोहोचता करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.यासाठी देशप्रेमी नागरिकांकडून सहभाग अपेक्षित आहे. कमीत कमी रक्कम रुपये पाचशे अपेक्षित आहे.
@smitprabhu
आपणास विनंती आहे की आपण या उपक्रमास हातभार लावावा.
Following are the bank details for transferring the donation for दीवाळी फराळ - सैनिकांसाठी.
ICICI Bank
Branch - Dombivli East
Name - VIVISU DEHRA
A/c no. - 095005500038
Current Account
IFSC code - ICIC0000950

@LimbuMirchi
Read 4 tweets
5 Oct
माणसं मनातली.....
मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....

काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच... Image
चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....

शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....
शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!