दर वर्षी या दिवशी मला पुलंची ही भेट आठवते. चांगलं दोन अडीच तास पुलंच्या सहवासात घालवलेला हा वेळ मला आयुष्यभर पुरेल!
‘कवितेला चाली देऊन त्यांचा कार्यक्रम का करावासा वाटला?’ या त्यांच्या प्रश्नाला माझ्यातल्या नवख्या, अतिउत्साही आणि त्यांच्या कौतुकाने हुरळून गेलेल्या संगीतकाराने
- “मला काहीतरी वेगळं करायचं होतं” असं त्या वेळी भारी वाटणारं पण अतिसामान्य असं उत्तर दिलं तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले - “तू चांगलं कर. वेगळं आपोआप होईल.” हा मंत्र मी आयुष्यात विसरलो नाही.
याच भेटीत त्यांनी ‘बाई या पावसानं’ या अनिलांच्या कवितेला
मी दिलेली चाल ऐकून भरभरून दाद दिली. मला माहीत होतं की याच कवितेला त्यांचीही चाल आहे. मी हिम्मत करून विचारलं - “तुम्हाला कुठली चाल जास्त आवडली?”
क्षणभर ते शांत होते, मग पुलंच्या डोळ्यांत एक मिस्किल चमक आली आणि ते म्हणाले - “माझी!”
आम्ही सगळेच यावर मनमुराद हसलो.
पुढच्याच वर्षी
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे पुलंच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या साहित्यावर आणि संगीतावर आधारित पुलोत्सव करायचं ठरलं. नाटककार सुरेश खरे यांनी पुलंच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर सोपवली.
पण जेव्हा ते पुण्याला पुलं आणि सुनिताबाईंना कार्यक्रमाची माहिती द्यायला गेले तेव्हा सुनिताबाईंनी त्यांना सुचवलं की पुलंची नेहमीची गाणी घेण्यापेक्षा रेडिओसाठी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली आणि पुलंनी संगीत दिलेली ‘बिल्हण’ ही संगीतिका सादर करावी.
खरे काकांनी सुनिताबाईंची इच्छा माझ्याजवळ बोलून दाखवली. मी लगेच आव्हान स्वीकारलं! आणि खरोखर ते आव्हानच ठरलं कारण ५०च्या दशकात आकाशवाणीसाठी केलेल्या ‘बिल्हण’ला आता ५० वर्ष होऊन गेली होती आणि त्याचं स्क्रिप्ट कुणाकडेही नव्हतं, अगदी खुद्द पाडगांवकरांकडेही!
पाडगांवकरांकडे चौकशी केली असता ते मला म्हणाले - “तुला स्क्रिप्ट मिळालं तर मलाही दे. माझ्याकडे नाहीये!”
लालजी देसाईंकडे मूळ ‘बिल्हण’चं ध्वनिमुद्रण होतं पण त्याची प्रत इतकी सदोष होती की एका स्पीकरमधून फक्त ‘हिस्स’ असा आवाज येत होता. त्यामुळे शब्द नीट कळत नव्हते.
चार चार वेळा एक ओळ ऐकायची आणि संदर्भाप्रमाणे शब्द काय असेल असा अंदाज लावायचा, असा सगळा प्रकार सुरू होता. शेवटी आम्ही एकदा ते स्क्रिप्ट लिहून पूर्ण केलं. या सर्व प्रकारात खूप गमतीशीर गोष्टी उलगडल्या.
उदा. ‘शब्दावाचून कळले सारे’ हे मूळ ‘बिल्हण’मधलं गाणं जेव्हा पं. जितेंद्र अभिषेकींनी ध्वनिमुद्रित केलं तेव्हा ते-
“आठवते पुनवेच्या रात्री
लक्षदीप विरघळले गात्री”
- असं गायले. पण मूळ संगीतिकेच्या ध्वनिमुद्रणात (आणि मंगेश पाडगांवकरांच्या पुस्तकात) शब्द आहेत -
“आठवते पुनवेच्या रात्री
लक्षचंद्र विरघळले गात्री!”
मूळ संगीतिका आकाशवाणीत सादर झाल्यानंतर जवळजवळ ५० वर्षांनी आम्ही ती प्रथमच दादर माटुंगाच्या त्या सोहळ्यात सादर केली. लोकांना ती प्रचंड आवडलीसुद्धा!
याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आम्ही पुलंना आवडणाऱ्या कवींच्या मी केलेल्या रचना
सादर केल्या. अर्थात यात अनिलांचं ‘बाई या पावसानं’ही होतं आणि आम्ही या कवितेच्या दोन्ही चाली सादर केल्या. आधी पुलंची आणि पाठोपाठ माझी.
खरे काकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण पुलं आणि सुनिताबाईंना ऐकवलं.
पुन्हा एकदा ‘बाई या पावसानं’ची माझी चाल जेव्हा पुलंनी ऐकली तेव्हा
ते खरेकाकांना म्हणाले - “ही चाल (कौशलची) मी आधी ऐकली असती तर या गीताला मी चाल केलीच नसती!”
हे मी ऐकलं तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले. एवढ्या मोठ्या माणसाकडून मिळालेली ही केवढी मोठी दाद!
दोन दिवसांनी मला सुनिताबाईंचा फोन आला आणि त्या म्हणाल्या -
“तू ‘बिल्हण’ केल्याबद्दल - आणि नुसतं केल्याबद्दल नाही तर उत्तम केल्याबद्दल मला आणि भाईला तुला बक्षीस द्यायचं आहे. तू घरी येऊन जा.”
मी पुण्याला गेलो. पुलं आणि सुनिताबाई यांनी अगदी प्रेमाने माझं स्वागत केलं. ‘वटवट वटवट’ या पुलंनी लिहिलेल्या आणि संगीत दिलेल्या दुसऱ्या संगीतिकेची
ध्वनिफीत त्यांनी मला भेट दिली.
टेपचं तंत्रज्ञान कालबाह्य होऊन सीडी आली आणि आता तीही कालबाह्य होऊन अनेक वंर्ष लोटली. पण तरीही माझ्या कपाटाच्या एका कप्प्यात ‘वटवट ’ची बरीच घासलेली
टेप अजूनही आहे. टेप जुनी असली तरी पुलंच्या या आठवणी अगदी ४के अल्ट्रा एचडी मध्ये ताज्या आहेत आणि दर ८ नोव्हेंबरला माझ्या मनाच्या प्रोजेक्टरवर त्या प्रक्षेपित होतातच होतात.
*धागा समाप्त*

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kaushal S Inamdar| कौशल इनामदार

Kaushal S Inamdar| कौशल इनामदार Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ksinamdar

7 Nov
In Harry Potter's final book, Harry asks Dumbledore, "Is this real? Or has this been happening inside my head?"
To which Dumbledore replies - "Of course it is happening inside your head, Harry, but why on earth should that mean that it is not real?” 1/5
In a way, this affirmed my belief that reality is more multilayered than it appears. People perceive reality or even the truth into a low resolution, monolithic concept simply because it is so complex to grasp. 2/5
Art is that device which helps us look at this reality in high resolution. Dostoevsky's 'Crime & Punishment' or Van Gogh's 'Starry Night' or Kusumagraj's 'Pruthviche Premgeet' (The Earth's Lovesong) may be all fiction and by that 3/5
Read 5 tweets
12 Sep
I debated a lot whether to put up this post. But this being the #SuicidePrevention month, I thought I should put it up while protecting the identity of the person concerned. I got this message on FB yesterday. For those who don’t understand Marathi the message says -“I had 1/5
decided to put an end to my life yesterday. It’s not that I am a loser but I was tired of the treatment I was getting at home. I was set to commit the act. I thought I would listen to one song before I took the final step. Coincidentally it was your song that was playing 2/5
on @YouTube. The song was #Parwardigar from the movie Balgandharva. I am an electrical engineer in charge of building an operation theatre. Your song brought me back and I wanted you to know it.”
I have always maintained that music goes beyond entertainment, but here it 3/5
Read 5 tweets
6 Sep
Let me tell you the story of the Rishi who found a mouse and turned her into a girl. When the girl came of age he tried to get her married to the sun, but she felt he was to angry. He tried to get her married to the wind but he was too strong for her.
He tried to get her married to the mountain but she found him too still. But as they were climbing down the mountain she saw the king of mice running around the foothills. She fell in love with his playfulness and asked to be married off to him.
The Rishi smiled at the play of destiny and turned the girl back into a mouse.
Now let me retell this story to you in the modern context.
When I started off as a young composer, people were still recording on analogue equipment and digital was just making an entry.
Read 14 tweets
3 Apr
A long thread on creativity, its temporary absence and how to deal with it.
I don’t know how frogs hibernate. But an artist in hibernation is not pleasant business. The writers have a pretty name for it - writer’s block.
What a glamorous name for something messes with you completely! A musician doesn’t even have a pretty name for it. It is just a time when you can’t think.

When creative juices are in full flow, you are sort of heady and yet your level of alertness is extremely high.
Things come to you. Even a routine incident inspires a song within you. Nothing is more intoxicating than the spring of creativity.

The ebb doesn’t come all of a sudden. It comes in with the silent slither of a python and wraps around you with its slimy cold nothingness.
Read 15 tweets
27 Feb
#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली. मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या +
मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”
तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम +
आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली. +
Read 10 tweets
3 Jan
When I was in college, I had to answer a question on the difference between science and religion for a course known as the Foundation Course (FC - I don’t know if they still have it). The tilt of the text books was naturally biased toward science. My proclivity towards
Aristotelian logic made me biased towards science too and at that time I was an avowed atheist. As an answer to the above question I wrote all that was expected of me but as the last point I wrote something that was my own thought. I wrote - “Ultimately science and religion are
both instruments of war. Science provides the means, religion provides the motives.” My professor read out my answer in class and said to me, “you have just realised that there are answers beyond text books. I am not saying you’re right but I can say that you are on your way.”
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!