फडणवीस चुका मान्य करा..
होय फडणवीस आपण नुसतेच अपयशी मुख्यमंत्री नाही तर अपयशी राजकारणीसुद्धा आहात..
कारण..
● आपण नगरसेवकापासून अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतलीत पण कधी कोणाची जात काढली नाहीत कि कोणावर वैयक्तिक टीका केली नाहीत. असं कोणी करतं का?
● नैसर्गिक आपत्तीवेळी आपण +
घरात बसून केंद्राकडून पैसे हवेत असा घोष लावला नाहीत जरी आपल्याच पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी. उलट कायद्यात बदल करून नुकसानभरपाईची रक्कम वाढवून संबंधितांच्या खात्यात वर्ग केलीत. असं कोण करतं? जनतेला आशेवर झुलत राहायची सवय आहे. तसंच झुलवत ठेवायचं असतं देवेंद्रजी. +
हेच आपल्या राज्याने आत्तापर्यँत पाहिलंय आणि द्यायचं म्हटलंच तर रुपायातले १०-२०पैसे फेकायचे काही जणांच्या तोंडावर उपकार म्हणून.. तेही आपल्याला जमलं नाही.
● मुख्यमंत्री झाल्यावर बायकोला चार भिंतीच्या आडच ठेवायचं असतं. तिचं स्वतंत्र अस्तित्व नाकारायचं असतं, हा ह्या पुरोगामी +
महाराष्ट्रातील काही अतिहुशार विचारवंतांनी ठरवून दिलेला नियम आपण मोडलात. अजून मोडताय..
● टीका ही वरवरचीच करायची असते. त्याला अभ्यासाची जोड द्यायची नसते. वडाची साल पिंपळाला जोडून जर टाळ्या मिळत असतील आणि चहा-बिस्कीटवाले खुश होत असतील तर तेच करायचं असतं. हे बाजूला ठेवून, +
अभ्यासपूर्ण वक्तव्याची माळ लावून, आपण अजून एक गंभीर चूक केलीत. त्यातही खंड अजून नाही पडलेला.
● २०१४ पर्यंत दरवर्षी भारनियमन नित्यनेमाने आम्ही अनुभवले. किंबहुना आता त्यात खंड पडणार नाहीत अशीच आमची मानसिकता असताना आपण एका रुपयाचा वाढीव भार नं लावता हे भारनियमन कमी कसं केलं? जे
इथं अर्धशतक राजकारणात घालवून ज्यांना जमलं नाही ते आपण केलंत, ही अजून एक मोठी चूक.. आशेवर जनतेला झुलवायचं असतं, ती आशा पूर्ण नं करता..
● एवढे प्रकल्प, एवढ्या योजना आपण एवढ्या पारदर्शी पद्धतीने केल्या कि त्याचा इतर संबंधितांना भयंकर त्रास व्हावा?.. पुरावे हातात नाहीत, किंबहुना +
ह्या अश्या गोष्टींचे पुरावे नसतात म्हणून कोणाची नावे घेता येत नाहीत.. ह्या त्रासाचे काय?
● मराठवाडा, विदर्भ हा बाय-डिफॉल्ट दुष्काळीच आहे. हा तिथल्या जनतेचा फॉल्ट आहे. तिथे पाणी येऊच शकत नाही, तिथली परिस्थिती बदलूच शकत नाही, असे आत्तापर्यँतच्या शेतकऱ्यांचा तथाकथित कैवार +
घेणाऱ्या सरकारांचे म्हणणे असताना आपण "जलयुक्त शिवारामार्फत" तिथल्या लोकांच्या मनात आशेची किरणं जागवलीत, ह्यापेक्षा तर मोठी चूक असूच शकत नाहीये.
● देवेंद्रजी तुम्हाला सूड उगवता आला नाही.
● देवेंद्रजी तुम्हाला संस्थांना तुमच्या मनाने पाहिजे तसं, प्रसंगी कायद्याला वाकवून, वागवता +
आलं नाही.
● गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही म्हणत होता की "मी परत येईन". हे कितपत योग्य? जिथे इतर पक्ष केवळ मोक्ष मिळवण्यासाठीच निवडणूक लढवतात. पवारसाहेबांचे अध्यात्मिक राजकारण तर त्रिखंडात प्रसिद्ध आहे, प्रसंगी ते भिजलेसुद्धा. त्यामध्ये निवडणूक जिंकून परत येण्याचा +
लवलेशसुद्धा नव्हता नै? ठाकरे आणि गांधींबद्दल तर काय बोलावं? त्यांच्याबद्दल बोलताना मराठी भाषेतले ४८च्या ४८ वर्ण सुद्धा कमी पडतात, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
● राज्यातले चॅनेल्स तुमच्या विरोधात आग ओकताना त्यांना कुठे अडकवावे, असे आपण काही केल्याचे ऐकिवात नाही.+
किती चुका दाखवून देऊ अजून? हातात भिंग घेतले तर अजून कोपर्या कोपर्यात पडलेल्या चुका नक्कीच दिसतील.
"बहुमताने निवडून दिलेली युती" ही जनतेने निवडून दिलेली नव्हती तर त्यात मोडतोड करून "तीन पायांचे सरकार हा खरा जनतेचा आशीर्वाद" असतो. हे तुम्हाला कळत नाही, म्हणून कोरोनाच्या महामारीत +
आपण राज्यभर दौरे काढत होता. राज्याने पैसे कसे उभारावे ह्यासंदर्भातले कायदे, योजना, वेगवेगळे मार्ग आपण अजून सुचवता. त्याकडे घरकोंबड्याने का लक्ष द्यावे?
असल्या चुका जनता उघड्या डोळ्याने पाहात आहे. त्याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.. किंबहुना अधून मधून येत असेलच..+
बाकी काही हुशार, तत्वज्ञ, तटस्थ, विचारवंत, लोकशाहीवर प्रगाढ श्रद्धा वगैरे वगैरे असणाऱ्या जाणकार विश्लेषकांना ह्या पोस्टमध्येसुद्धा आपले कौतुकच दिसेल म्हणा. कदाचित त्यांना आपल्या अजून "असल्या" चुका माहित असतील.
बाकी.. देवेंद्रजी, ह्या चुका आपल्यापर्यंत किती पोहोचतील हे माहित नाही+
तरीही हे इथे लिहिण्याची एक चूक मी करत आहे..

धन्यवाद,
चेतन दीक्षित

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Chetan Dixit

Chetan Dixit Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @chetandixit9

22 Nov
(साहेब झोपेतून उठल्यासारखे वाटत होते.. आज कदाचित दहा ऐवजी नौच्याच आधी झोपतील)

● कितीवेळा संवाद साधला, मला माहित नाही पण तुम्ही खूप सहकार्य केले. (कधी? काय? कोणी? कुठे?)
● महाराष्ट्राने जर काही ठरवलं तर तो काहीही करू शकतो..
● लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.. +
( आजचा घरकोंबडा, कालचा बाण)
● तुम्ही माझं जे ऐकता त्याला तोड नाही.. (मटकीला मोड नाही)
● अजितदादा म्हणतात तसा कोरोना गर्दीत चेंगरून मरणार नाहीये.. (दादा नाराज होत नसतात)
● योग्य वेळी मी सगळं उघडत आहे..

(सतरा वेळा..किंबहुना)

एवढ्या संपलं? संपलं एवढ्यात? तढ्यावए लंपसं?+
वएढ्यात पलंसं? श्या.. हा धक्का भयंकर आहे.. आहे भयंकर हा धक्का.. धक्का आहे हा भयंकर.. कुठं गेले अभ्यंकर?

काहीसुद्धा मनोरंजन झालं नाही.. फार अपेक्षेने ह्या चिंतेच्या वातावरणात मनावर मनोरंजनाचे फवारे उडतील, म्हणून आज डोळ्यांची पापणी नं लवता फेसबुक लाइव पाहिलं. स्वाती नक्षत्रातले +
Read 5 tweets
20 Nov
मुंबई मनपा निवडणूक..

वर्ष २००७
शिवसेना - ८३
भाजपा - २८
राष्ट्रवादी - १४
काँग्रेस - ७३

वर्ष २०१२
शिवसेना - ७५
भाजपा - ३१
राष्ट्रवादी - १३
काँग्रेस - ५२

वर्ष २०१७
शिवसेना - ८४
भाजपा - ८२
राष्ट्रवादी - ९
काँग्रेस - ३१

हे आकडेच बोलके आहेत. मुंबईत भाजपा किती आणि कशी वाढत आहे, +
हे कळण्यासाठी ह्यापेक्षा वेगळं काही नकोय.

शिवसेना ७५ - ८४, मध्येच राहिली आहे. भाजपा २८ पासून ८२ पर्यंत गेली आहे. ह्यामध्ये काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झालीये. आणि नंतर त्यांनी मुसंडी मारली असलं काही झालं नाहीये. त्यांचा आलेख अधोगतीचाच दिसतोय. राष्ट्रवादी मुंबईत फारशी नाही. +
म्हणजे काँग्रेसचा जो परंपरागत मतदार आहे, ज्याला शिवसेना नको होती तो भाजपाला मतदान करतोय. आता शिवसेनेच्या ह्या दगाबाजीमुळे दुखावलेला त्यांचा मतदार नक्कीच भाजपाकडेच खेचला जाईल कारण तो काँग्रेस वा राष्ट्रवादीला मतदान करेल असं वाटत नाही. संपादक कितीही बोंबलले तरीही सेना म्हणजे +
Read 6 tweets
19 Nov
ही थ्रेड आवर्जून वाचा आणि मविआ समर्थकांच्या थोबाडावर फेकून मारा. भलेही तुमच्या नावावर ही थ्रेड खपवा. काहीही अडचण नाही. फक्त जनतेला काही गोष्टी विसरून चालणार नाहीये.. जनतेने ह्या गोष्टी विसरणे जनतेच्या भल्याचे नाही.

माजलेल्या सरकारचे हे एक जुने पाप आहे, जे नवीन स्वरूपात +
आपल्यातल्या बर्याचजणांना भेडसावत आहे..

"जेंव्हा ३५ लाख शेतकऱ्यांना वाढीव बिलं देण्यात आली होती.."

किती? तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना...

कोरोनाकाळात सर्वसामान्य जनतेच्या माथी वाढीव बिलं मारून ह्या शासनानं जो काही जिझियाच वसूल करण्याचा सपाटा लावलाय, त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्याच +
काळात झालेल्या एक भयंकर घोटाळ्याची आठवण झाली..

निमित्त होतं पवारसाहेबांच्या वाढदिवसाचं..

त्यासाठी महाराष्ट्र भारनियमनमुक्त करायचा होता..

त्यासाठीचा अनुशेष भरून काढणे गरजेचे होते. तोटा कमी झालाय हे दाखवायचं होतं. यासाठी तब्बल ३३ लाख शेतकऱ्यांना वाढीव बिलं पाठवण्यात आली +
Read 9 tweets
18 Nov
माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्ता घेत नाहीत का? असे बाणेदार प्रश्न विचारले आहेत..

मी त्यांच्याशी १००% सहमत आहे..

त्यांच्याच तर्कानुसार.. +
● वेळ जात नाही म्हणून मटका खेळणे चुकीचे नाही..
● उठसुठ सामन्यात हागणेही चुकीचे नाही..
● राज्य होरपळत असताना मुख्यमंत्र्यांनी घरकोंबडा होणे हेही चुकीचे नाही..
● हिंदुत्व गांधी-पवारांच्या वेशीवर टांगणेही चुकीचे नाही..
● दगाबाजी तर अजिबात चुकीची नाही..+
● सगळे विकासाचे प्रकल्प थांबवून त्याचा बोजा सर्वसामान्य प्रामाणिक करदात्यांवर टाकणेसुद्धा चुकीचे नाही..
● पैसे नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांचे पगार थकवताना सूडाच्या राजकारणापोटी बक्कळ पैसे सिब्बलांना देणे तर चुकीचे असूच शकत नाही..
● वीजबिलं भरमसाठ आणि अवाजवी वाढवून ती जनतेवर +
Read 6 tweets
10 Nov
#थ्रेड 👇
आपल्या चाय-बिस्कुट पत्रकारांचं एक भारी असतं पण..

काही झालं कि लगेच पवारसाहेबांची अशी प्रतिक्रिया रिपोर्ट करतात की जणू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पवारांनी बसवले.. युगंडातील पूरपरिस्थितीचे नियोजन हेच करतात.. स्पायडरमॅनच्या सूटमध्ये जाळं पण साहेबांनीच भरलं..+
ऍक्वामॅनला पोहायला पण साहेबांनीच शिकवलं.. आणि हॅरी पॉटरच्या बुडाखाली झाडू ह्यांनीच ठेवला..

काय तर म्हणे तरुण रक्ताला वाव द्यायचा म्हणून बिहार निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही, ह्या पाच खासदारांच्या तथाकथित सर्वात अनुभवी पक्षप्रमुखांनी.. +
बाकी बायडन आणि ह्यांचा भिजतानाचा फोटो वायरल करणाऱ्यांना एक कळत नाही की दोन्ही घटनेत पाऊस हाच कॉमन फॅक्टर आहे.. मग विजयाचं श्रेय पावसाला जातं की साहेबांना?

😂😂😂

पत्रकार एवढा साधा विचार करत नाहीत आणि मग चाय-बिस्कुट म्हटल्यावर राग येतो

😂😂😂

असो.. +
Read 4 tweets
5 Nov
#थ्रेड 👇

ठाकरेंना महाराष्ट्राने म्हणूनच स्विकारले नाही

बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या नावानं बोलताना उठसुठ महाराष्ट्राच्या अस्मितेची लेबलं लावणारे एक गोष्ट नेहमी विसरतात कि संबंध महाराष्ट्राने शिवसेनेला कधीही स्वीकारलेले नाहीये. कोणाची धाव कुठपर्यंत हे मराठी जनता जाणते..
बाळासाहेबांच्या सभेला गर्दी तूफान व्हायची पण त्याचे मतात परिवर्तन झाले नाही कारण मराठी जनतेला कुठे टाळ्या वाजवायच्या आणि कुठे मत द्यायचं हे कळतं.

काँग्रेस-राकाँला भक्कम पर्याय हा केवळ भाजपाचं देऊ शकला वा शकतोय.. गेल्या दोन विधानसभेत हे स्पष्ट सिद्ध झाले आहे. उगाच धसका घेऊन ऐंशी+
वर्षाचा माणूस राज्यभर फिरत नव्हता.. एवढं करूनपण जनतेने नाकारलेच आणि हे स्वतः त्यांनी मान्य केलेच होते.. असो.

शिवसेनेच्या राजकीय इतिहासाकडे लक्ष दिलं तर शेम्बड्या पोराला पण कळेल कि भाजपासारखा पक्ष सोबत होता म्हणून शिवसेना वाढली.. तत्वज्ञान नं झोडता आकड्यांकडे पहा.. +
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!