माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्ता घेत नाहीत का? असे बाणेदार प्रश्न विचारले आहेत..

मी त्यांच्याशी १००% सहमत आहे..

त्यांच्याच तर्कानुसार.. +
● वेळ जात नाही म्हणून मटका खेळणे चुकीचे नाही..
● उठसुठ सामन्यात हागणेही चुकीचे नाही..
● राज्य होरपळत असताना मुख्यमंत्र्यांनी घरकोंबडा होणे हेही चुकीचे नाही..
● हिंदुत्व गांधी-पवारांच्या वेशीवर टांगणेही चुकीचे नाही..
● दगाबाजी तर अजिबात चुकीची नाही..+
● सगळे विकासाचे प्रकल्प थांबवून त्याचा बोजा सर्वसामान्य प्रामाणिक करदात्यांवर टाकणेसुद्धा चुकीचे नाही..
● पैसे नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांचे पगार थकवताना सूडाच्या राजकारणापोटी बक्कळ पैसे सिब्बलांना देणे तर चुकीचे असूच शकत नाही..
● वीजबिलं भरमसाठ आणि अवाजवी वाढवून ती जनतेवर +
लादण्याचा पराक्रम तर नोबेलच्या दर्जाचाच..
● शेजारच्या राज्यातील गुन्ह्याकडे लक्ष देताना आपण एका राज्याचे गृहमंत्री आहोत हे बिनदिक्कत विसरून आपल्या राज्यातील गुन्ह्यांकडे बिनधास्त डोळेझाक करणारा गृहमंत्री तर चूक करुच शकत नाही..

किनै?

अश्या असंख्य चुकांची जंत्री मांडता येईल +
ज्या आपण करुच शकत नाही, कारण, आपण सत्तेत असल्याच्या माजात आहात..

असहाय जरी असली तरी ही जनता, आपण मांडलेला नंगानाच, उघड्या आणि स्वतःच्याच कोट्यावधी डोळ्यांनी पहात आहे..

#सिंहासन_खाली_करो
#जनता_आती_है +
- सिंहासन खाली करताना आपल्या सर्वांची जी काही भयंकर भंबेरी उडणार आहे, ती पाहण्यास अत्यंत आसुसलेला एक मराठी माणूस - चेतन दीक्षित

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Chetan Dixit

Chetan Dixit Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @chetandixit9

19 Nov
ही थ्रेड आवर्जून वाचा आणि मविआ समर्थकांच्या थोबाडावर फेकून मारा. भलेही तुमच्या नावावर ही थ्रेड खपवा. काहीही अडचण नाही. फक्त जनतेला काही गोष्टी विसरून चालणार नाहीये.. जनतेने ह्या गोष्टी विसरणे जनतेच्या भल्याचे नाही.

माजलेल्या सरकारचे हे एक जुने पाप आहे, जे नवीन स्वरूपात +
आपल्यातल्या बर्याचजणांना भेडसावत आहे..

"जेंव्हा ३५ लाख शेतकऱ्यांना वाढीव बिलं देण्यात आली होती.."

किती? तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना...

कोरोनाकाळात सर्वसामान्य जनतेच्या माथी वाढीव बिलं मारून ह्या शासनानं जो काही जिझियाच वसूल करण्याचा सपाटा लावलाय, त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्याच +
काळात झालेल्या एक भयंकर घोटाळ्याची आठवण झाली..

निमित्त होतं पवारसाहेबांच्या वाढदिवसाचं..

त्यासाठी महाराष्ट्र भारनियमनमुक्त करायचा होता..

त्यासाठीचा अनुशेष भरून काढणे गरजेचे होते. तोटा कमी झालाय हे दाखवायचं होतं. यासाठी तब्बल ३३ लाख शेतकऱ्यांना वाढीव बिलं पाठवण्यात आली +
Read 9 tweets
10 Nov
#थ्रेड 👇
आपल्या चाय-बिस्कुट पत्रकारांचं एक भारी असतं पण..

काही झालं कि लगेच पवारसाहेबांची अशी प्रतिक्रिया रिपोर्ट करतात की जणू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पवारांनी बसवले.. युगंडातील पूरपरिस्थितीचे नियोजन हेच करतात.. स्पायडरमॅनच्या सूटमध्ये जाळं पण साहेबांनीच भरलं..+
ऍक्वामॅनला पोहायला पण साहेबांनीच शिकवलं.. आणि हॅरी पॉटरच्या बुडाखाली झाडू ह्यांनीच ठेवला..

काय तर म्हणे तरुण रक्ताला वाव द्यायचा म्हणून बिहार निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही, ह्या पाच खासदारांच्या तथाकथित सर्वात अनुभवी पक्षप्रमुखांनी.. +
बाकी बायडन आणि ह्यांचा भिजतानाचा फोटो वायरल करणाऱ्यांना एक कळत नाही की दोन्ही घटनेत पाऊस हाच कॉमन फॅक्टर आहे.. मग विजयाचं श्रेय पावसाला जातं की साहेबांना?

😂😂😂

पत्रकार एवढा साधा विचार करत नाहीत आणि मग चाय-बिस्कुट म्हटल्यावर राग येतो

😂😂😂

असो.. +
Read 4 tweets
5 Nov
#थ्रेड 👇

ठाकरेंना महाराष्ट्राने म्हणूनच स्विकारले नाही

बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या नावानं बोलताना उठसुठ महाराष्ट्राच्या अस्मितेची लेबलं लावणारे एक गोष्ट नेहमी विसरतात कि संबंध महाराष्ट्राने शिवसेनेला कधीही स्वीकारलेले नाहीये. कोणाची धाव कुठपर्यंत हे मराठी जनता जाणते..
बाळासाहेबांच्या सभेला गर्दी तूफान व्हायची पण त्याचे मतात परिवर्तन झाले नाही कारण मराठी जनतेला कुठे टाळ्या वाजवायच्या आणि कुठे मत द्यायचं हे कळतं.

काँग्रेस-राकाँला भक्कम पर्याय हा केवळ भाजपाचं देऊ शकला वा शकतोय.. गेल्या दोन विधानसभेत हे स्पष्ट सिद्ध झाले आहे. उगाच धसका घेऊन ऐंशी+
वर्षाचा माणूस राज्यभर फिरत नव्हता.. एवढं करूनपण जनतेने नाकारलेच आणि हे स्वतः त्यांनी मान्य केलेच होते.. असो.

शिवसेनेच्या राजकीय इतिहासाकडे लक्ष दिलं तर शेम्बड्या पोराला पण कळेल कि भाजपासारखा पक्ष सोबत होता म्हणून शिवसेना वाढली.. तत्वज्ञान नं झोडता आकड्यांकडे पहा.. +
Read 7 tweets
3 Nov
#थ्रेड 👇
"एका जागेचा खेळ आणि विधानसभेतील आगामी धोक्याचा केलेला बंदोबस्त.."

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांची निवडणूक होतीये..

तशी पहाल तर एकतर्फी..

भाजपाचे उत्तरप्रदेशात ३१२ आमदार.. राज्यसभेच्या एका जागेसाठी ३७ मते गरजेची. ८ जागा नक्कीच येतील. +
अजून काही जोड तोड केली तर नववी येणं पण अवघड नाही पण भाजपाने इथे वेगळा डाव टाकलाय..

समाजवादी पार्टीकडे ५४ आमदार म्हणजे त्यांची एक जागा नक्की..

बसपाकडे १९ आमदार म्हणजे जवळपास त्यांना १८ मते गरजेची..

खरी मेख इथेच..

नववा उमेदवार देण्याऐवजी भाजपा ८ वरच शांत बसली आणि एका जागेसाठी+
सपा-बसपा मध्ये काडी लावली..

ही काडी महत्वाची आहे..

पक्षीय बलाबल पाहता त्या एका जागेसाठी सपा आणि बसपा एकमेकांत भांडत बसणे २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी गरजेचं आहे. कारण उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकीत कैरोना सारख्या जागा केवळ सर्व विरोधक एकवटले म्हणून +
Read 6 tweets
13 Oct
शाहरुख, सलमान आमिर ह्यांनी रिपब्लिक, टाईम्स नाऊ विरोधात याचिका दाखल केलीये..

बॉलिवूडची प्रतिमा मलीन केली म्हणून..

शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश +
तक्रारदारांत आहे..

जेंव्हा "मी टू चळवळ" जोरात होती तेंव्हा ही प्रतिमा मलीन झाली नाही..

जेंव्हा अंडरवर्ल्ड सरळ सरळ बॉलिवूड चालवत होतं तेंव्हा ही मलीन नाही झाली..

जेंव्हा हरामखोर देशद्रोही संजय दत्त अटकेत गेला तेंव्हा त्याच्या अंडरपँटच्या रंगापासून ते बदललेल्या दाढीची +
वार्तांकन चवीने चघळली जात होती तेंव्हा त्याचे फलक हातात घेणाऱयांनी ही मलीन केली नाही..

सलमानच्यावेळी पण तेच..

पानमसल्याच्या आड गुटख्याच्या जाहिराती आणि म्युजीक सिडी वा सोड्याच्या आड व्हिस्की/बिअर ची ऍड करताना ही मलीन होत नाही..

कायदा नं वाचता आंदोलन करताना ही मलीन होत नाही.. +
Read 6 tweets
11 Oct
आजच्या फेसबुक लाईवचे सिनॉप्सीस..

१. मी बागुलबुवा नाही.. (मी तर घाबरट)
२. मी आपल्या हितासाठी संवाद साधत असतो.. (कि करमणुकीसाठी?)
३. कोरोना हा पाहुणा आहे. (शत्रू कि पाहुणा?)
५. आदित्यने मेट्रोसाठी अहोरात्र मेहनत घेतली.. (आदित्यने मेहनत घेतली.. कुणी नाही पाहिली) +
६. खोटी झाडं मी लावू नाही शकत. (खोटी सहानुभूती देऊ शकतो)
७. कोकणात आपण नुकसानभरपाई दिली, विदर्भात देतो आहोत. (लोकांनीच घेतली नसेल..)
८. कापूस येतोय येऊ द्या..(निःशब्द)
९. दोन कोटी दोन लाख थाळ्या.. (टाळ्या)
१०. पाहुण्याला दिली ओसरी.. पाहुणा हातपाय पसरी.. (आरोग्य लाजलं) +
११. तुम्ही कोणी घाबरू नका.. (तो ठेका मी घेतलाय)
१२. दीडशे वर्षाच्या इंग्रजांना आपण घालवू शकलो. कोरोनाला नाही घालवू शकणार? (पुन्हा एकदा निःशब्द)
१३. मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट. (राज ठाकरे ब्लॅकबेल्ट धारक नाहीत तर..ओके नोटेड.. थँक्स) +
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!