🙏🏼 #चांगदेव_खैरमोडे_लिखित #डॉ_भीमराव_रामजी_आंबेडकर #१_ते_१२_खंड❣️

❣️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं काम जगाला माहित करून देणारा माणूस, चरित्रकार चांगदेव खैरमोडे हे होय..बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा, विचारसरणीचा आणि कष्ट करण्याच्या तळमळीचा खैरमोडे यांच्यावर प्रचंड प्रभाव पडलेला होता.
तो त्यांच्या वैचारिक जडणघडणीस आणि वैयक्तिक विकासास पोषक ठरला असल्याने त्यांनी त्याच काळात तबाबासाहेबांचं चरित्र लिहिण्याचा मनाशी निश्चय केला होता. बाबासाहेबांच्या प्रेरणेनेच त्यांनी काही लेखन करण्यास सुरवात केली होती.इंग्रजी साहित्यात महत्त्वपूर्ण 👇
योगदान दिलेल्या डॉ. सॅम्युअल जॉन्सन यांच्या जेम्स बॉस्वेलने लिहिलेल्या प्रसिद्ध चरित्राच्या धर्तीवर डॉ. आंबेडकरांचं चरित्र लिहिण्याचं खैरमोडे यांनी ठरवलं होत.बॉस्वेलने २० वर्षांहून अधिक काळ अफाट काम करून आपल्या विलक्षण स्मरणशक्तीच्या जोरावर डॉ. जॉन्सन यांची भाषणं रोजच्या रोज 👇
क्रमवार लिहून ठेवली. याच धर्तीवर खैरमोडे यांनीही बाबासाहेबांची वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली भाषणं, बाबासाहेबांची पत्रं, बाबासाहेबांच्या ग्रंथांतून निवडलेले उतारे, त्यांच्या सहका-यांनी तसेच अनुयायांनी लिहिलेली पत्रं,👇
संस्थांचे अहवाल इत्यादी गोष्टींचं परिश्रमपूर्वक संकलन केलं होत.

बाबासाहेब स्वत:ही त्यांना गप्पांच्या ओघात स्वत:बद्दल माहिती सांगत होते आणि त्यांच्या चरित्रलेखनाच्या संकल्पाला 'तूच माझं चरित्र नीट लिहू शकतोस' असं म्हणून प्रोत्साहनही देत असत.
त्या दरम्यानच्या काळातच खैरमोडे यांनी आपलं बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईत ब्रिटिश सचिवालयात ते नोकरी करू लागले. तिथे वरच्या ग्रेडमध्ये नोकरी मिळवणारे ते पहिले अस्पृश्य व्यक्ती ठरले होते..
तिथे त्यांना जातिव्यवस्थेचा खूप अन्याय सहन करावा लागला होता.
त्या वेळी बाबासाहेबांच्या कामाची निकड व त्यासाठीचा त्यांचा संघर्ष त्यांना अधिक पटला. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचं काम समाजासमोर आलं पाहिजे, या एकाच ध्येयाने त्यांनी अपार मेहनत घेत आपलं अवघं आयुष्य या चरित्रलेखनाच्या कामी समर्पित केलं..
डॉ.बाबासाहेबांच्या चरित्रलेखनाला १९२३ मधे त्यांनी सुरवात केली आणि १९७१ मध्ये त्यांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी चरित्रलेखनाचं काम पूर्ण केल होत. 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र' या नावाने ते १५ खंड प्रसिद्ध झालेत. यातील पहिला खंड १९५२ साली बाबासाहेब जिवंत असतानाच प्रसिद्ध झाला.
संकल्पित १५ खंडांपैकी पहिले ५ खंड खैरमोडे यांच्या हयातीत प्रसिद्ध झाले होते .
या काळात त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. सहाव्या खंडाचं काम सुरू असतानाच १८ नोव्हेंबर १९७१ला खैरमोडे यांचं हृदयविकाराने निधन झालं. खैरमोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या उच्चशिक्षित पत्नी 👇
द्वारकाबाई खैरमोडे यांनी पुढील खंडांच्या संपादनाचं जिकिरीचं काम स्वत:कडे घेतलं आणि अनेक अडचणींवर मात करत परिश्रमपूर्वक जिद्दीने ते पार पाडलं. पुढील खंड प्रकाशित करण्याची जबाबदारी आधी सुगावा प्रकाशन व नंतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने घेतली आणि हे काम पूर्णत्वास नेलं.
अस्पृश्यांना गुलामगिरीच्या जोखडातून वर काढून त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी राजकीय, सामाजिक लढा देत त्यासाठी व्यापक चळवळ उभी केलेली. अस्पृश्यांना गुलामगिरीच्या जोखडातून वर काढून त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी राजकीय, सामाजिक लढा
हे सगळं काम मुद्द्या-पुराव्यानिशी जगापुढे मांडण्यासाठी खैरमोडे यांनी सुमारे ९ हजार पानांचा चरित्रलेखनाचा हा प्रपंच प्रकल्प मोठ्या आत्मीयतेने हाती घेऊन व्यापक दस्तावेजीकरणाच्या रूपात सिद्ध केला.
या खंडांतून बाबासाहेबांच्या चरित्रातील कुलवृत्तान्त, जन्म, कुटुंब, शिक्षण,
परदेशातील शिक्षण,भारतात पुनरागमन, जीवनकार्याचा आरंभकाळ, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, अस्पृश्यांची चळवळ, हिंदी गोलमेज परिषदेतील विचारमंथन, अस्पृश्यांच्या राजकीय-सामाजिक हक्कांचा जाहीरनामा, सामाजिक चळवळीच्या प्रगतीचा इतिहास, व्हाइसरॉय मंत्रिमंडळ, महात्मा गांधींशी मतभेद,
जॉइंट पार्लमेंटरी समितीतील कार्य, धर्मांतराची घोषणा, भारताच्या राज्यघटनेची निर्मिती, बाबासाहेबांची घटनेवरील भाषणं, हिंदू कोड बिल, नेहरू मंत्रिमंडळातील राजीनामा, याचबरोबर बाबासाहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं प्रचंड कार्य यांचा सविस्तर परामर्ष खैरमोडे यांनी घेतलाय. 👇
हे चरित्रखंड केवळ बाबासाहेबांच्या कार्याची आणि चळवळीची नोंद किंवा वर्णन नाही तर खैरमोडे यांनी त्या अनुषंगाने विचारदर्शनही घडवलंय, भाष्यं केलीत आणि प्रसंगी चिकित्साही केलीय. या चरित्रखंडात थक्क करून सोडणारी माहिती खच्चून भरलेली असून जिज्ञासूंनी हे खंड ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत
खैरमोडे यांनी साकारलेलं बृहद्चरित्र हे मराठी साहित्यविश्वाला त्यांनी दिलेलं मौलिक योगदान मानलं जातं. या चरित्रग्रंथाविषयी ज्येष्ठ चरित्रकार न. र. फाटक यांनी म्हटलंय, 'खैरमोडे यांनी लिहिलेले चरित्र हे केवळ आंबेडकर या व्यक्तीचे चरित्र नसून, अखिल महाराष्ट्राच्या 👇
अर्वाचीन इतिहासाचे एक नवे अंग स्पष्टपणे जनतेच्या निदर्शनास आणणारे एक महत्कार्य आहे.
या चरित्रग्रंथाचे प्रसिद्ध झालेले खंड जो कोणी आस्थेने दृष्टीखाली घालील त्याला खैरमोडे यांच्या क्लेशकारक परिश्रमांची सहज कल्पना करता येईल. 👇
त्यात आलेला पत्रव्यवहार हा कालांतराने महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या इतिहासाचे बहुमोल साधन समजला जाईल. त्यांच्या चरित्रलेखनाने मराठी चरित्र साहित्यात उत्तम प्रकारची भर पडलीय.'
खैरमोडे यांनी साकारलेलं बाबासाहेबांचं चरित्र हे अनेक अर्थांनी मौलिक आहे. 👇
मराठी साहित्यविश्वातलं ते एक महत्त्वाचं संचित आहे. बाबासाहेब समजून घेऊ पाहणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हे चरित्रखंड दिशादर्शक आहेत. त्यासाठी या सर्व पिढ्या खैरमोडे यांच्या सदैव ऋणात राहतील...

हे एकूण १२ चरित्र खंड आपण उपक्रमात घराघरात सवलतीत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत 👇
त्यामुळे कोणालाही हे खंड घरपोच हवे असतील तर ७०६६४९५८२८ या व्हाट्सअप्प क्रमांकावर सम्पर्क करून मागवू शकता..
मूळ किंमत -३४९० असून सवलतीत #३००० मध्ये घरपोच मिळेल..❣️

#जय_भीम❣️ 🙏🏻

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with आंबेडकरवादी मदत समुह भारत

आंबेडकरवादी मदत समुह भारत Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!