@LetsReadIndia #वाचन
आजच #कृष्णायन ही पुस्तक वाचली.
"माणूस होऊन जगलेल्या, ईश्वराची भावकथा!"
हे लेखिकेने (काजल ओझा वैद्य) एका वाक्यात केलेलं वर्णन आहे.
देव सुद्धा जेव्हा माणसाचा जन्म घेतात तेव्हा त्यांना ही सगळेच सुख-दुःख भोगावे लागतात मग ती त्यांची इच्छा असो वा नसो.
असं म्हणतात की मृत्यूच्यावेळी आपल्याला आपण केलेल्या सर्वच गोष्टी आठवत राहतात आणि त्याच बरोबर काही ठराविक माणसांना भेटायची इच्छा पण असतेच आणि हेच सगळं श्रीकृष्णाच्या बाबतीत पण होतंय.
त्याला पण भेट आणि मुक्ती हवीये राधा, रूक्मिणी आणि द्रोपदी कडून.
प्रेयसी, पत्नी आणि सखी या तिन्ही नात्यांना पुरेपूर न्याय दिला होता कृष्णानं.
म्हणूनच आज सुद्धा तिघींना समान महत्व आहे. मनुष्याचा जन्म घेतल्यामुळे मृत्यूच्या वेळेस होणारे सगळे त्रास कृष्णाला सहन करावे लागताते आणि सामान्य माणसासारखं त्यालाही वाटतंय की आपण कुठे चुकलो तर नाही ना.
पुस्तकाची भाषा अतिशय सरळ आणि सोपी आहे. काहीकाही प्रसंग खुप छान लिहिलेत.
त्यातला एक आवडलेला प्रसंग:-
एकदा रूक्मिणी कृष्णाला सोन्याची बासरी देते आणि ती पाहून कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेव्हा रूक्मिणीला कळतं बासरी म्हणजेच राधा आणि ती सतत कृष्णा बरोबर आहेच.
पुस्तक वाचनीय आहे आणि मुख्य म्हणजे एकदा वाचायला घेतल्यावर सोडता येत नाही.
अनुवाद प्रा. सुधीर कौठाळकर यांनी केलंय.
कृष्णाचं देवपण आपण खुप वेळा वाचलंय आता एकदा त्याचं माणूसपण पण वाचायला, अनुभवायला हरकत नसावी.
आणि त्याच्या देवपणापेक्षा माणूसपण वरचढ ठरलय हे मात्र नक्की ❤️
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh