गोव्यामध्ये एके सकाळी एक स्कूटर वरून चाललेल्या माणसाला कारने जाणाऱ्या मुलाने टक्कर दिली.तो मुलगा रागाने कारच्या बाहेर आला आणी म्हणाला मी गोवा कमिशनरचा मुलगा आहे.त्यावर स्कुटर वरील माणूस त्याला हसत हसत म्हणाला मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे. ती व्यक्ती
मनोहर गोपाल कृष्ण प्रभू पर्रीकर यांची आज जयंती.अफाट प्रतिभा आणी असंख्य व्यक्तिमत्वाचे पैलू.पहिला आयआयटी आमदार,पहिला आयआयटी मुख्यमंत्री.त्यांच्या साधेपणा,सच्चेपणा ह्याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नसेल.गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेले पण एक साधा नेता म्हटल्यावर तेच समोर येतात
सरकारी ताकत हातात असून तिचा वापर फक्त आणी फक्त लोक कल्याणासाठी करणारा,व्हीव्हीआयपी सेवा नाकारणारा मंत्री.आजच्या जमान्यात नगरसेवक झाल्यावर लक्झरी गाड्या घेऊन फिरणाऱ्या नेत्यांमध्ये,गोव्यात स्कूटरवर कार्यालयात जाणारा मुख्यमंत्री वेगळाच.
विमानात इकॉनॉमी क्लासने प्रवास करणारा,गोव्याच्या बाहेर रिक्षा,पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणारा संरक्षणमंत्री.खिशात फोन असताना फुकट असलेला ऑफिसचा फोन आपलाच समजून बायकोला आज संध्याकाळी जेवायला काय करणार म्हणून घरी फोन करणाऱ्या नोकरदारांच्या जमान्यात
संविधानिक पदावर असून त्याचा फायदा न घेता स्वतःच्या खाजगी कॉलचे पैसे स्वतःच्या खिशातून भरणारा,आप्तेष्टांच्या लग्नात मंत्री म्हणून खास सेवा न मागता जेवणाच्या रांगेत उभा राहणारा माणूस हाडाचा स्वयंसेवक. मुख्यमंत्री असताना जनतेची हालहवा जाणण्यासाठी टपरीवर जाऊन चहा पिणारा,
मुख्यमंत्री निवासात न राहता स्वतःच्या घरातच राहून दुसऱ्यांसारखं बोलून न दाखवता करून दाखवणारा आम आदमी नेता.कॅन्सरच्या लढाईत शेवटच्या क्षणी गोव्याच्या सभागृहात बजेट मांडणारा मुख्यमंत्री.अडीच वर्षाच्या संरक्षणमंत्री पदाच्या कारकिर्दीत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक आणी भारतीय
वायुसेनेला राफेल.मुख्यमंत्री पदाच्या सुरुवातीच्या काळात पत्नीने साथ सोडल्यावर सर्व विसरून झोकून देणारा मुख्यमंत्री.
मनोहर पर्रीकर जी एक जोश होता जो शेवटच्या श्वासापर्यंत नाही थांबला आणी त्यानंतरही त्यांचे सिद्धांत दीपस्तंभ आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त सादर प्रणाम!🙏🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बाबरी मशीद बरोब्बर २८ वर्षांपूर्वी पाडली गेली आणी गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्रीराम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.पण अजूनही खूप लोकांना कोर्टाचा निर्णय पटलेला नाही त्यामध्ये प्रामुख्याने तीन कारणं.
एक वर्ग ज्यांनी कोर्टाचा १०४५ पानी निकाल पाहिला नाही, दुसरा वर्ग जाणूनबुजून एका समाजाचं तुष्टीकरण करण्यासाठी सत्याकडे दुर्लक्ष करत आहे,तिसरा वर्ग मीडियाने आणी तुष्टीकरण करणाऱ्या नेत्यांनी तयार केलेल्या इमेजमुळे.
माझे बरेचशे मित्र ह्या तिसऱ्या प्रकारात मोडतात त्यामुळे त्यांनी निकाल विस्तृत वाचायची तसदी घेतली नाही.जर हि अवस्था उच्चशिक्षित शिकलेल्या तरुणांची असेल तर बाकीच्यांच काय? मुळात १. राम मंदिर हा आस्थेचा आणि भावनेचा विषय आहे पण कोर्टाने खरोखरचं त्याआधारे निर्णय दिला आहे का?
शिवसेनेच्या नेत्याला अजान अचानक गोड वाटू लागली आहे. असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मी देखील वेगवेगळ्या प्रार्थनास्थळांना ह्या आधी भेट दिलेली आहे. पण ज्या भारत देशात आपण राहतो तिथे सर्व धर्मांचा आदर केला जातो,अजान चा विषय निघाला आहे तर खरोखर ती आदराची भावना दुसऱ्या
धर्मासाठी इस्लाम धर्मात आहे का?अजान जाणूनबुजून इंग्रजीमध्येही टाकत आहे कारण मराठी मध्ये एखाददोन शब्द मिस होऊ शकतात."अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर"-(Allah is almighty and the greatest)म्हणजे अल्लाह सर्वात मोठा आहे. तुम्ही कधी हिंदूंच्या प्रार्थनेत ऐकलंय का ईश्वर सर्वात मोठा आहे?
"अश-हदू अल्ला इलाहा इलाहा अल्लाह"-(I Bear witness that there is no one who should be prayed other than allah) म्हणजे मी साक्षी देतो दुसरं कोणीही पूजा आणि उपासना करण्यायोग्य नाही एक अल्लाह सोडून. म्हणजे बाकी धर्मात जी पूजा केली जाते त्याला काही अर्थ नाही का?
मराठ्यांना शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजत नसेल तर अवघड आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी गंभीर आहे असं वाटत त्यांना. मराठ्यांचं हातचं आरक्षण हे बारामतीला गहाण पडलेल्या मराठा नेत्यांनीच घालवलं आहे. वैयक्तिक स्वार्थ हा समाजाच्या पुढे त्यांना जास्त महत्वाचा वाटतो.
ज्या व्यक्तीने शालिनीताईंना मराठा आरक्षण मागितल्यावर पक्षातून काढलं तो खरोखर मराठ्यांचं हित जपेल का? आयुष्य जाती जातीमध्ये भांडण लावून स्वतःचं भविष्य सुरक्षित केलं, सर्व काही हातात असताना काही नाही केलं तो व्यक्ती तुम्हाला झुलवू शकतो पण न्याय देऊ शकत नाही.
दुसरीकडे मुका मोर्चा म्हणून हिणवणारे मुख्यमंत्री पदी बसलेत म्हटल्यावर अपेक्षा कसली आहे. फडणवीसांनी शिव्या खाऊन देखील मराठा समाजाला साथ दिली पण जातीच्या द्वेषात अडकवून मराठा नेत्यांनी त्यांची बायको काढली तरीही फडणवीसांनी तोल ढळून न देता सर्वाना सोबत घेऊन हायकोर्टात आरक्षण टिकवलं.