वडिलांबद्दल मला काय वाटते ? - थ्रेड

माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो
खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण तो वाटतो खरा! ते चेहऱ्यावरुन उग्र व गंभीर दिसत असले तरी ते अत्यंत मायाळू आहेत, याचा आम्हांला नेहमीच अनुभव येतो. एखादा जिन्नस मागितला की तो आम्हांला केव्हाही मिळतो. पण आम्हांलाच तो मागावा कसा अशी उगाच मनातल्या मनात भीती वाटते. आमची
आई नेहमी आजारी असायची. माझ्या आत्या व आमचे इतर संबंधी व नातलग यांच्याकडून मला कळले की, डाॅक्टर साहेब रायगडवर राहत असताना एकदा लोकांनी त्यांच्यावर अचानकपणे भाले, बर्च्या घेऊन जीव घेण्याच्या हेतूने हल्ला केला. डाॅक्टर त्यातून बचावले पण आईने त्याची विलक्षण दहशत घेतली.
महाडास चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची चळवळ भयंकर जोरात आली होती. श्री.ए.व्ही.चित्रे यांचा माझ्या वडिलांशी फार जिवाभावाचा संबंध आहे. महाडच्या या सत्याग्रहाच्या मोहिमेत त्यांनी पुढाकार घेतला होता. ऐन बाराच्या सुमारास त्यांच्या व्याख्यानाचा परिणाम लोकांच्या मनावर एवढा
विलक्षण झाला की, प्राण गेले तरी बेहत्तर पण चवदार तळ्यात उतरून पाणी पिणार अशी त्यांनी शपथ वाहिली. ते म्हणाले, "तुम्हांला उन्हामुळे तहान लागली आहे ना? चला माझ्याबरोबर, आपण सारेजण त्या तळ्यातले पाणी पिऊ या!" त्यानंतर जो हलकल्लोळ उडाला त्याचा परिणाम माझ्या आईच्या मनावर फार
झाला. ती अगोदरच अशक्त होती. आणि तशातून हिंदू लोक चिडून डाॅक्टरसाहेबांचा प्राण घेणार अशी तिच्या मनाने धास्ती घेतली. त्यामुळे पुढे तिला ताप येऊ लागला व तिने अंथरूण धरले ते अगदी कायमचेच! पुढे सतत आठ वर्षे ती क्षयाने आजारी होती. २७ मे १९३७ रोजी ती आम्हांला सोडून गेली.
लग्नात आई नऊ वर्षांची होती व आमचे साहेब सोळा वर्षांचे होते. आईचा स्वभाव फार कडक आणि करारी होता. तिला आम्ही वावगे वर्तन केलेले मुळीच खपत नसे. त्याचा तिला मनस्वी संताप येई. या तिच्या करडेपणामुळे तिला स्वतःला सुद्धा फार त्रास होत असे.
आईला आम्ही एकंदर पाच मुले झालो. पैकी मीच थोरला. माझ्या पाठीवर दोन भावंडे होती. तिसरी बहिण व तिच्या पाठीवर आणखी एक धाकटा भाऊ होता. पण मला वाटते ही सारी माझी भावंडे एक दोन वर्षांची असतानाच वारली. माझी आई अत्यंत धर्मभोळी होती. ती नेहमी उपासतापास
करायची. ती नेहमी पौर्णिमेचा उपवास करीत असे. आमचे घराणे कबीरपंथी असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला ओवाळण्याची आमच्या घरी चाल आहे. त्या प्रथेला अनुसरून ती पौर्णिमेच्या दिवशी कडक उपवास करीत असे.
डाॅक्टरसाहेब नेहमी विलायतेस जायचे. त्यांच्यासाठी आई किती तरी उपवास नवस करायची. आईला मुलांचे अतोनात प्रेम असे. ती स्वतः नेहमी मुलांची काळजी घ्यायची. पण पावसाळा आला की तिची व्यथा उचल घेत असे व मग ती अंथरूणाला खिळून राहायची. ती खूप प्रेमळ
असली तरी ती बरीच अबोल असावी असे मला आठवते. डाॅक्टरसाहेब एवढे विद्वान आहेत, त्यांच्या उच्च पदवीमुळे त्यांना फार मोठा मान मिळतो याचा आम्हा साऱ्यांनाच अभिमान वाटतो. पण लहानपणापासून त्यांचा आमच्या मनावर जो धाक बसला आहे तो कायमचा! त्यांच्यासमोर उभे राहण्याचे
धैर्यही आम्हांला होत नाही. तथापि आम्हांला काय पाहिजे असते ह्याची दुसऱ्याजवळ चौकशी करून डाॅक्टर आम्हांला त्या गोष्टी पुरवीत असत. डाॅक्टरांना एकच शोक आहे आणि तो म्हणजे कपड्यांचा. "मुंबईतील बॅरिस्टरांमध्ये अत्यंत उत्तम पोशाख केलेला मी एकटा आहे." असे ते नेहमी
म्हणतात. मी सुध्दा त्यांच्याप्रमाणे चांगला पोशाख करावा असा त्यांचा कटाक्ष असतो.
साहेबांची राहणी पहिल्यापासून अत्यंत साधी व स्वच्छ पण जरा अनियमितच! पण दिल्लीला गेल्यापासून मात्र त्यांच्या राहणीत विलक्षण सुसूत्रपणा आला. न्याहारी, दुपारचे जेवण, चहा, रात्रीचे जेवण
वगैरे अगदी वेळच्या वेळी होऊ लागले. तीच त्यांची सवय अजून कायम आहे. सकाळी अंघोळ केल्यावर नऊ वाजता ते न्याहारी करतात व कपडे करुन बरोबर दहा वाजता हायकोर्टात जातात. त्यांना मोटारीचाही फार शोक आहे. संध्याकाळी कामावरून परत आले की काही ना काही नवी पुस्तके ते
आपल्याबरोबर घेऊन आलेले आढळतात. दिल्लीला असताना ते माझ्याशी अत्यंत प्रेमळपणाने वागत असत. मला यंत्रकामाची लहानपणापासून भारी आवड. म्हणून पुस्तके वाचणे वगैरे गोष्टीकडे माझे फारसे लक्ष नाही.
माझे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले आहे. आरंभी एल्फिन्स्टन हायस्कूलात व पुढे प्रो.दोंदे यांचे
हायस्कूलात मी होतो. शाळेतील शिक्षणापेक्षा आपण एखादा छापखाना काढावा असे लहानपणापासून मला वाटे. पुढे साहेबांना ही गोष्ट पटली व त्यांनी मला छापखाना काढून देऊन माझी ही हौस पुरवली. पण साहेबांशी विरोध असलेल्या लोकांनी तो माझा छापखाना गेल्यावर्षी जाळून टाकला. आता
आमच्या नवीन छापखान्याची भव्य इमारत पुरी होत आलेली आहे. म्हणून मला आता फार हुरूप वाटू लागला आहे. साहेबांची सारी पुस्तके आणि त्यांची सारी वर्तमानपत्रे वगैरे माझ्या 'भारतभूषण' छापखान्यात छापली जावीत अशी माझी महत्वाकांक्षा आहे. या माझ्या छापखान्यात साहेब स्वतः फार लक्ष
घालतात. सकाळ संध्याकाळ माझा बहुतेक सारा वेळ या छापखान्यातच जातो. छापखान्याचे सारे शिक्षण मी स्वतःच काम करून शिकून घेतले आहे. डाॅक्टर साहेबांना कुत्र्यांची भारी आवड आहे. हल्ली त्यांच्यापाशी एक छानसा कुत्रा आहे. त्याचे नाव पीटर. हा पीटर रात्री त्यांच्या अंथरूणापाशीच झोपतो. दोन
वाजता एकदा व सकाळी सहा वाजता एकदा तो त्यांना हुंगून पुन्हा जागच्या जागी निजून राहतो.
त्याचप्रमाणे फाऊन्टनपेनचे त्यांना भारी वेड आहे. नवे चांगलेसे पेन दिसले की घातलेच ते त्यांनी आपल्या कोटाच्या खिशात! पण कधी कधी विसरभोळेपणाने आपली घड्याळे व पेने ते बाहेर कुठेतरी हरवून येतात.
साहेबांना बाजरीची भाकरी आणि कांदा मिळाला तर त्यांना इतर पक्वान्नांची मुळीच पर्वा वाटत नाही. त्यांना मुसंब्याचा रस आवडतो व ते तो रोज नियमाने घेतात. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते दूध घेतात. त्यांना भाज्या फारच आवडतात. पण जेवणाखाण्याकडे त्यांचे फारसे
लक्ष असते असे मला वाटत नाही. घरी असले म्हणजे त्यांचे जेवण ग्रंथालयातल्या एका कोपऱ्यात एक छोटेसे टेबल आहे, त्या टेबलावर वाढले जाते. ते जेवताना एखादा जिन्नस आवडला किंवा नाही आवडला, किंवा अधिक हवा आहे वगैरे काहीच बोलत नाहीत. पानावर वाढले ते
जेवायचे असा त्यांचा नेहमीचा परिपाठ आहे.
ते कधीकधी रात्रभर वाचत लिहीत बसलेले असतात. ते कामात असले म्हणजे माडीवर कोणाला सोडायचे नाही असा त्यांचा कडक नियम आहे. पण कोणीतरी भेटायला येतोच. पण त्यांना गंभीरपणे बसलेले पाहून पाहुणाच मुकाट्याने काही वेळाने परत जातो. त्यांचा
स्वभाव अत्यंत भिडस्त असल्याने आलेल्या माणसाला ते सहसा जा म्हणून सांगत नाहीत. पण असल्या माणसाचा त्यांना भारी राग येतो यात शंका नाही.
माझ्या हातून सुध्दा काहीना काही चांगली कामगिरी व्हावी असे मला नेहमी वाटत असते. कारण माझे वडील इतके विद्वान आणि जगप्रख्यात आणि मी- मी हा
असा! तरीपण मी काहीतरी करून दाखवीन!
- यशवंत भीमराव आंबेडकर
नवयुग, आंबेडकर विशेषांक, १९४७

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Apurv Jyoti Kurudgikar

Apurv Jyoti Kurudgikar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ApurvKurudgikar

13 Dec
या डोळ्यांनी रसिकांना जिंकल होत, चक्र चित्रपटातील भूमिका आज आहे काळजात घर करून शाबूत आहे, वडिलांनी लावलेला सिनेमा चेहरा आजवर स्मरणात आहे, 'जांभुळ पिकल्या झाडाखाली' गाण्यातला तो सावळा चेहरा आजगत स्मरणात आहे, आपल्याला जसं ग्यात होत आपल्याला जी व्यक्ती आवडते ती व्यक्ती केव्हाचेच हे
जग सोडून गेली आहे हे समजल्यावर मला जे वाटले ते त्यानंतर तसं अनुभव कधीच नाही आला आणि आयुष्य किती छोटं आहे याची जाणीव होते, स्मिता पाटील यांच्या आज स्मृती दिवस !! ❤️
सावळ्या रंगाने बॉलिवूडला भुरळ पडली ती एकमेव अदाकारा स्मिता पाटील होत्या, त्यांच्या काही निवडक माझ्या आवडते फोटोस.
Read 4 tweets
12 Dec
थ्रेड,
गॉडफादर सिनेमा सुरू होतो, सिनेमाच्या सुरुवातीला अगदी पाच मिनिटातच मरलोन ब्रांडो आपल्या नजरेचा, मनाचा ठाव घेतो. काहीसा म्हातारा झालेला, निवृत्तीकडे झुकलेला तरी आपल्या साम्राज्यावर एकहाती वर्चस्व ठेवलेला. लोक भेटतायेत. कुणी गिफ्ट देतंय, कुणी गाऱ्हाणं मांडतंय, कुणी फेवर
मागतंय. आलेला प्रत्येकजण भरल्या हातानेच परत जातोय. आणि, मग तो अजरामर संवाद
I will make him an offer that he cant refuse.
अफाट आत्मविश्वास दर्शवणारं ते वाक्य. दुनिया स्वतःच्या मर्जीनं नाचवण्याची धमक, जिद्द आणि जबर महत्त्वाकांक्षा ब्रांडोच्या डोळ्यांतून त्या डायलॉग डिलीवरी वेळी
दिसतो
गॉडफादर हा गुन्हेगारीपट होता म्हणून त्याचा संदर्भ घेऊन तुलना करणं चूक आणि अप्रस्तूत आहे. पण संदर्भ आत्मविश्वास आणि दूर्दम्य इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षेचा होता. ज्याचा प्रत्यय पुन्हा एकदा गेल्या वर्षी आला.
स्वतःचा पक्ष फुटला, सहकारी नामनिराळे झाले. पवार काहीही करू शकतात ही
Read 10 tweets
12 Dec
थ्रेड,
कहा जाता है कि पीपल या बरगद के नीचे फिर कोई दूसरा पेड़ नहीं पनपता। यह कहावत उन लोगों ने बनाई है जिनके अनुसार किसी बड़े महापुरुष के घर कोई दूसरा महापुरुष पैदा नहीं होता। औरों के बारे में तो नहीं मालूम मगर, भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर के बारे में यह कहावत झूठी लगती है।
इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि पुत्र यशवंतराव ही नहीं, पत्नी रमाबाई और घर-परिवार पर ध्यान देने की फुर्सत बाबा साहब के पास नहीं थी. उनके सतत सम्पर्क में रहने वाले, चाहे सोहनलाल शास्त्री हो या फिर नानक चंद रत्तु ;
के संस्मरणों से स्पष्ट है कि बाबा साहब के पास बिलकुल समय नहीं था. कई-कई बार तो रमाबाई के द्वारा भेजा गया टिफिन वैसे ही रह जाता था. खैर, हम बात भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर की कर रहे थे.
भैया साहेब यशवंतराव आंबेडकर का जन्म 12 दिस 1912 को हुआ था. उस समय भैयासाहेब के पिताजी अर्थात
Read 12 tweets
10 Dec
थ्रेड,
अमेरिकेतील निग्रो लोकांची गुलामगिरी नष्ट केली पाहिजे अशी भूमिका घेणारे जे काही अमेरिकन गोरे होते त्यात विल्यम लाईड गॅरिसन हा प्रमुख होता. त्यांनी आपली चळवळ बंद करावी म्हणून त्याला लाखो डाॅलर्स देण्याची लाच देऊ केली होती. पण ती त्याने स्वीकारली नव्हती. म्हणून त्याचा छापखाना
जाळला. त्याच्या पायाला दोर बांधून भर बाजारपेठेत कुत्र्याप्रमाणे फरफटीत नेले व खून करण्याची धमकी दिली.
परंतु गॅरिसन घाबरला नाही व स्वीकृत कार्यही त्यांनी सोडले नाही. गुलामगिरी नष्ट झालीच पाहिजे. याबद्दलचा प्रचार करण्यासाठी त्याने लिबरेटर नावाचे मुखपत्र काढले. आपले विरोधक व टीकाकार
यांना उद्देशून त्याने पत्राच्या पहिल्या पानावर ठकळ अक्षरात असा धमकीवजा संदेश लिहिला.
'तुम्ही मला विरोध का करता? निग्रोंचं दास्य मुक्ती करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्यकर्म आहे. या विषयावर मी कठोरसत्य व न्याय यांना डोळ्यांपुढे ठेवून लिहिन व बोलेन. आणि ते जळजळीत भाषेत, त्वेषाने आणि
Read 8 tweets
9 Dec
आंबेडकर - गांधी..

आंबेडकरी लोकांमध्ये महात्मा गांधी बद्दल जो राग आहे तो केवळ पुणे करारामुळे आहे, बा आंबेडकरांची मागणी होती स्वतंत्र मतदार संघाची, त्या मागणीचा विरोध म्हणून गांधींनी अन्नत्याग करून त्यांच्यावर दबाव आणला. खरंतर एम के गांधी समंजस व्यक्तिमत्व होतं. आंबेडकरांच्या आणि
गांधी यांचे संबंध त्यांच्या पत्रव्यवहारातून स्पष्ट होते एकमेकाच्या विरोधात मुळीच नव्हते त्यांचे स्वप्न भारताची प्रगती आणि समाज कसा सुधारावा याच्यावर त्यांचा सहमत प्रत्येक वेळी असायचं. एम के गांधी नक्कीच राष्ट्राला पुढे नेणारे एक विचारधारा होती, काही विचारांवर आंबेडकरांचे
त्यांच्यासोबत मतभेद असतील आणि होते ही त्यांचे मन भेद कधी नव्हते. दोघांचा अजेंडा राष्ट्र सक्षम बनवायचं हे होतं, गांधी विचारधारा भारताच्या भल्यासाठी होते याची जाण आंबेडकरांना होती. पंडित जवाहरलाल नेहरू ला संविधान लिहिण्यासाठी गांधींनी नाव सुचवलं ते आंबेडकर होत. गांधींना
Read 5 tweets
9 Dec
१८-१९ जुलै, १९४२, नागपूर येथील प्रसंग - थ्रेड

भाषण आटोपल्यानंतर संध्याकाळी, बाबासाहेब काही कार्यकर्त्यांसह लाला जयनारायण यांनी आयोजित केलेल्या स्वागतपार्टीत जाण्यासाठी निघाले. आम्ही समता सैनिक दलाचे स्वयंसेवक त्यांना रस्ता मोकळा करून देत होतो. बाबासाहेब मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ
आले. तितक्यात, फाटलेल्या-विटलेल्या जुनेऱ्यातील तीन चार वृध्द स्त्रिया त्यांना अचानक आडव्या झाल्या.
"आमचे आंबेडकरबाबा कुठं हायती जी?" एकीने किलकिल्या डोळ्यांनी पाहात बाबासाहेबांनाच विचारले. मी त्यांच्या बाजूलाच उभा होतो. त्या स्त्रियांचा प्रश्न आणि अवस्था पाहून बाबासाहेब क्षणभर
स्तब्ध झाले.
मीच आहे आंबेडकर बाबासाहेब शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाले.
त्या स्त्रिया बाबासाहेबांच्या एकदम पुढे आल्या. अंगावरील फाटक्या जुनेऱ्याच्या ओटीतून झेंडूच्या फुलांचे हार काढले. मोठ्या प्रेमाने आणि आदराने ते बाबासाहेबांच्या गळ्यात घालू लागल्या. बाबासाहेब त्यांच्यापेक्षा उंच
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!