मै जल रही हूँ मां मुझको बचाओ ना
क्या घर से भी ना निकलूँ इतना बताओ ना
दर दोन चार दिवस जात नाही तर सामूहिक बलात्काराच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना पालकांना आपल्या दोन वर्षे वयाच्या मुली पासून तर ७० वर्षे वय असलेल्या स्त्रियांची काळजी वाटत असेल तर आश्चर्य वाटायला (1/14)
नको. खासकरून शाळा, कॉलेज मधे जाणाऱ्या मुलींचे पालक त्या घरी सुखरूप परत येत पर्यंत प्रचंड तणावाखाली राहत असतील. वासनांध नराधमांना वयाच काही घेणेदेणे नाही समोर दिसत ते स्त्रीच शरीर, एक भोगवस्तू. (2/14)
संस्कृतीचा पूळका आलेल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्त्रियांच्या पेहरावात आणि बलात्कार ह्याचा काहीही संबंध नाही तो गलिच्छ मानसिकतेचा किळसवाणा प्रकार आहे.
आपल्या पैकी प्रत्येकाला रस्त्यावर, खाजगी क्षेत्रात, (3/14)
सार्वजनिक ठिकाणी वावरताना बहूतेक पुरुषांच्या नजरा स्त्री कडे कशा खिळल्या असतात याचा प्रत्यय येत असेल .
बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे प्रत्येक सर्व सामान्य आणि सभ्य भारतीयांच्या मनात प्रचंड चीड निर्माण होत असून सोशल मीडियावर आपल्या उद्विग्न भावना व्यक्त करताना दिसत आहे. (4/14)
राग अनावर होत असल्याचे मुख्य कारण न्याय मिळण्यास होणारा उशिर आणि जी शिक्षा होणार ती कदाचित जनभावने नुसार कमी आहे. कायद्याची भीती वाटत नाही का? एवढे का निर्ढावले आहेत अपराधी,कारण आपण पकडले जाणार नाहीच , (5/14)
समजा अटक झाली तर न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही पळवाटा शोधून निसटता येईल. जर गुन्हा सिद्ध झाला तर वरच्या न्यायालयात दाद मागणार तिथेही शिक्षा कायम ठेवली तर वयाचा दाखला देऊन दयेची याचिका करणार , (6/14)
"Justice delayed is justice denied"
मग विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे न्यायव्यवस्थेला डावलून न्याय मिळवता येईल का?
कदाचित शक्य आहे!! (7/14)
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे स्वातंत्र्य सेनानींमधे प्रामुख्याने दोन गट पडले होते मवाळ भूमिका असलेले आणि जहाल गट. (8/14)
आजची परिस्थिती पाहता समविचारी तरुणांनी आपले सर्वस्व पणाला लावत एकत्र येऊन जहाल गट स्थापन करून ह्या नराधमांना धडा शिकवायची वेळ आली आहे का?
की सरकारने स्वतः पुढाकार घेत , (9/14)
जसे राजकारणात राजकीय विरोधक आणि शत्रुराष्ट्र विरोधी कारवाया करताना विविध पातळीवर कार्यरत असलेल्या गुप्तहेर संघटनांमार्फत शत्रूंचा नाश करत असतात तसा वापर करून नराधमांना धडा शिकवावा.
अनेक conspiracy theories नुसार कित्येक नेते,न्यायधीश, साक्षीदार, (10/14)
वा ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे झालेले खून, अचानक झालेले अपघात पाहता त्याचे खरे मारेकरी शोधून काढायला अजून तरी यश आलेले नाही.
मग संरक्षण विभागात कार्यरत असलेले The Defence Intelligence Agency,Research and Analysis Wing , (11/14)
पोलिस ईत्यादी यंत्रणा वापरून आरोपींना न्यायालयात जायच्या आधीच एखाद्या अपघातात किंवा इतर मार्गाने ह्या बलात्कारी नराधमांचा "वध" करु शकत नाही का? सहज शक्य आहे!!
कदाचित शक्य नाही कारण ह्याचा वापर सरकारच्या विरोधात उठलेल्या प्रत्येक आवाजाला दाबण्यासाठी होऊ शकतो . (12/14)
शेवटी सभ्य समाजात जगत असताना भविष्यात येणार्या पिढीला आदर्श घालून द्यायचा असेल तर
जलदगतीने न्यायालयाने गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी व नागरिकांचा विश्वास कायम ठेवावा एवढीच अपेक्षा
आज 2021 ला भारता सारख्या विकसनशील देशात ,जागतिकीकरणाच्या स्पर्धेत तरुणाईला सार् जग आपल्या कवेत घ्यायचे आहे, जिथे विविध प्रकारच्या भाषा, पंथ,परंपरा ,वेशभुषा व प्रचंड भौगोलिक तफावत असलेले भुभाग आहे तिथे खरच राम मंदिर, हिंदू मुस्लिम, सावरकर, (1/25)
नेहरू ह्या चर्चा किती गैरलागू आहेत? एखादा विषय ५००० वर्षे मागे जाऊन चर्चा करणे,प्रत्येक गोष्टींना संस्कृती आणि आस्थेला जोडत त्यावर वातावरण तापवून निवडणूकांकरीता मैदान करत जिंकणे बस हेच एकमेव उद्दिष्ट. (2/25)
लक्षात ठेवा आपण वर्तमानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून भविष्यातील अडचणीत भर घातल आहोत.
भावनीक मुद्दे उपस्थित करून सरसकट सर्वच बाबतीत जनतेला मूर्खात काढण्याचा प्रकार सुरू आहे. (3/25)
देशातल्या शेतकऱ्यांचा जीव नवीन कृषिकायद्यांमुळे धसकला आहे. आंदोलने चालली आहेत. लोक थंडीवाऱ्याची, संसर्गाची पर्वा न करता गेला दीड महिना रस्त्यावर तळ ठोकून आहेत.
आज राजधानी दिल्लीत भारतीय प्रजासत्ताकातील सार्वभौम लोकांना प्रवेश बंद करण्यासाठी भली मोठी यंत्रणा कामी लागली आहे. (1/10)
रस्ते बंद करण्यात आले आहेत. देशाच्या बलशाली असण्याचे प्रदर्शन दिल्लीत या दिवशी होते. पण आज दिल्लीत लोकांच्या बळाचे प्रदर्शन होणार आहे.
हे या माज चढलेल्या सत्तांधाना अर्थातच चालणारे नाही. आज दिवसभरात काय होईल ते साशंक मनाने पाहात रहायचे आहे. (2/10)
आणि अशा या कसोटीच्या वेळी फोलपटी फोकनाड देशभक्तीचे ढोल पिटणारे रास्वसंघाचे लोक काय करीत आहेत माहीत आहे का?
संघाचे अनेक दुष्कार्यकर्ते लोक घरोघर जाऊन राममंदिरासाठी किमान शंभर रुपये तरी द्या. (3/10)