आज 2021 ला भारता सारख्या विकसनशील देशात ,जागतिकीकरणाच्या स्पर्धेत तरुणाईला सार् जग आपल्या कवेत घ्यायचे आहे, जिथे विविध प्रकारच्या भाषा, पंथ,परंपरा ,वेशभुषा व प्रचंड भौगोलिक तफावत असलेले भुभाग आहे तिथे खरच राम मंदिर, हिंदू मुस्लिम, सावरकर, (1/25)
नेहरू ह्या चर्चा किती गैरलागू आहेत? एखादा विषय ५००० वर्षे मागे जाऊन चर्चा करणे,प्रत्येक गोष्टींना संस्कृती आणि आस्थेला जोडत त्यावर वातावरण तापवून निवडणूकांकरीता मैदान करत जिंकणे बस हेच एकमेव उद्दिष्ट. (2/25)
लक्षात ठेवा आपण वर्तमानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून भविष्यातील अडचणीत भर घातल आहोत.
भावनीक मुद्दे उपस्थित करून सरसकट सर्वच बाबतीत जनतेला मूर्खात काढण्याचा प्रकार सुरू आहे. (3/25)
चोवीस तास गरळ ओकणाऱ्या अपरिपक्व माध्यमातून सकाळ संध्याकाळ तेच ते मुद्दे उपस्थित करून लोकांना सतत अफूचा डोस देणं सुरू आहे. सुनियोजित पद्धतीने टिव्ही,वर्तमानपत्रे, (4/25)
सोशल मीडिया ही माध्यम् वापरत लोकांची माथी भडकावून निवडणूका जिंकायच्या एकदा निवडणूका जिंकून सत्तेत आले की पुढील पाच वर्षे जनतेच्या दैनंदिन जीवनात अतिशय आवश्यक असलेले मुद्दे बाजूला पाडायचे किंवा त्यांना ते आवश्यक आहे ह्याची जाणीव होऊच द्यायची नाही . (5/25)
निवडणूक जवळ आली की भारताचा विकास पहायला विदेशातून लोक येतील ,भारत विश्वगुरु म्हणून ओळखले जाऊ लागेल एक ना अनेक गोष्टी जे मनात येईल ते फेकत जायच कारण समोर बसलेल्या जनतेच्या कपाळावर आम्ही मठ्ठ आणि मूर्ख आहे हे गोंदलेलच आहे.
अरे नकोय हा फालतूपणा , (6/25)
चंद्रावर जायचं स्वप्न दाखवत बसू नका ,दैनंदिन जीवनात आवश्यक मुद्दयांवर मते मागा
दिवसाढवळ्या मायलेकी एकट्या घराच्या बाहेर पडू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ,बेरोजगारी, (7/25)
गुन्हेगारी वाढत आहे मग लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पोलिस भरती करण्यात येईल असे आश्वासन देऊन मत मागा,
द्यायचे झाले तर शुद्ध पाणी पुरवठा करा, नद्या नाले, (8/25)
तलावातील पाणी साफ(portable water) करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलला किंवा सत्तेत आल्यानंतर करू म्हणून मत मागा
दररोज प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस इतक्या घाण असतात की बाहेरून पाहिल्यावर आत प्रवेश करायची इच्छाच होत नाही. काहींची अवस्था आणखीन बिकट असते, speedometer, (9/25)
break Light, indicator कामच करत नाही,
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करून तूम्हाला स्वच्छ आणि वातानुकूलित सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल म्हणून मत मागा.
रस्ते सुरक्षा यंत्रणा सज्ज करा, (10/25)
माणूस सकाळी घरून कामावर निघताना संध्याकाळी घरी परत यायचा की नाही याची शाश्वती देता येत नाही, कारण पालिकेने आज कूठे खोदून ठेवले माहिती नाही,पावसामूळे किती मोठे खड्डे पडले दिसत नाही आणि सूचना फलक, road saftey , पूर्व सूचना , (11/25)
हे तर नियमावलीत असत पण ना कंत्राटदार ना अभियंते ना पोलिस कोणालाही कर्तव्य म्हणून जीव ओतून काम करायच नसत ते न केल्याने ,कामचुकारपणामूळे एखाद्या व्यक्तीला जीव गमवावा लागतो. (12/25)
हे सर्व काटेकोरपणे लक्ष ठेवून करून घेवू म्हणून मत मागा
हेल्मेट सक्ती करून वसुली करणे चालू आहे पण five wheeler Auto, pick up truck व इतर गाड्यांच्या बाहेर लोंबकळत असलेल्या लोखंडी सळ्या, (13/25)
बांबू (मंडप उभारण्यात लागणारे) नागरिकांचा जीव धोक्यात घालून निर्धास्त होऊन वावरताना दिसतात त्यांना तीथेच detained का करण्यात येत नाही, आज पर्यंत किती गाड्यांची टायर्स प्रमाणाबाहेर घासले गेले व ते वाहन रस्त्यावर चालणे धोकादायक आहे म्हणून कीती चालान कापले गेले असतील? (14/25)
कित्येक वाहनांची ब्रेक लाईट लागतच नाही कळणार कसं की ते थांबणार आहे ,यंत्रणेला जाग करण्यासाठी मत मागा.
कोणताही धार्मिक कार्यक्रम होणार असेल तर रस्त्याच्या आजूबाजूला कधीकधी तर रस्त्यावरच मंडप उभारण्यात येतात, अशावेळी एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर?
DJ, (15/25)
पोंगे त्वरित बंद करण्याच आश्वासन देऊन मत मागा,
आई,वडील सकाळी लहान मुलांना दुचाकीवरून शाळेत सोडायला जात असताना गाडीच्या मागे धावणारी कुत्रे, रस्त्यावर उभी असलेली गोमाता!!! (एकदाचा माणूस मेला तर चालेल) फूटपाथवर असणारी अतिक्रमणे ,पायी चालत जायच कुठून, (16/25)
फूटपाथ रिकामी करता येत नसेल तर रस्त्यावरुन चालत जाणार्याचा अपघात झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी. सर्व
पथदिवे , सिग्नल चालू स्थितीत राहील यावर मत मागा .
कित्येकांना महाविद्यालयात न जाता (७५% आवश्यक उपस्थिती नसताना ), (17/25)
प्रात्यक्षिके करायला प्रयोगशाळा नाहीत मग पदव्या कशा काय मिळतात ? प्रवेश घेतला म्हणजे विषय संपला!! कुठून देणार जागतिक स्पर्धेत टिकणारे अभियंते. मातृभाषेत वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण ह्या मुद्दयांवर मागा मत
पर्यावरण!!! या विषयावर काय मत मिळणार!! (18/25)
पर्यावरण तर सर्वात दुर्लक्षित विषय ,विकास हवाय मग कापा पाहिजे तेवढी झाडे, टप्प्याटप्याने जंगलातून आदिवासींना त्यांच्याच घरातून हाकलून देण्यात येत आहे
खरच जंगलांची काळजी घेतली असेल ,संरक्षण केल असेल तर फक्त आदिवासींनी, (19/25)
बिघडलेली eco- system परत स्थापित करण्यासाठी व वाढत्या जागतिक तापमानवाढ या विषयावर मत मागा
शेतकर्यांना तर फुकटे समजायची प्रथाच आली आहे , जगात कुठे शेतमाल विकायचा ,कोणती बाजारपेठ निवडायची, किती भावात विकायचा त्यांच त्यानाच ठरू द्या, (20/25)
२४ तास पाणी आणि वीज पुरवठा यावर मत मागा
शुद्ध दुध, शुद्ध तूप काय आहे हे, सर्व खाद्यपदार्थ शुद्धच विकायची असतात, भेसळयुक्त माल विक्रेत्यांना जहाल शिक्षा देऊ म्हणून मत मागा. (21/25)
जनतेला पूर्व सूचना न देता एखादा VIP येतोय म्हणून अचानक तासंतास वाहतूक व्यवस्था ठप्प करायची काय ही पद्धत, तुम्हीही सामान्य नागरिक म्हणून वावराना अरे माणूस म्हणून जन्माला आलो तर तस जगु तरी द्या. (22/25)
कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पाचे भूमीपूजन वा उदघाटन करण्यात जनतेचा पैसा व वेळ वाया जाऊ देणार नाही असे आश्वासन देऊन मत मागा
अख्खी system पोखरली गेली आहे, स्वाभिमान उरलेलाच
नाही, क्या कर सकते हैं यार अपन आम आदमी है, (23/25)
लिहिताना चुका झाल्या असल्यास क्षमा असावी!! साधारण, सर्वसामान्य नागरिकांना पडणारे प्रश्न मांडायचा एक प्रयत्न होता 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
देशातल्या शेतकऱ्यांचा जीव नवीन कृषिकायद्यांमुळे धसकला आहे. आंदोलने चालली आहेत. लोक थंडीवाऱ्याची, संसर्गाची पर्वा न करता गेला दीड महिना रस्त्यावर तळ ठोकून आहेत.
आज राजधानी दिल्लीत भारतीय प्रजासत्ताकातील सार्वभौम लोकांना प्रवेश बंद करण्यासाठी भली मोठी यंत्रणा कामी लागली आहे. (1/10)
रस्ते बंद करण्यात आले आहेत. देशाच्या बलशाली असण्याचे प्रदर्शन दिल्लीत या दिवशी होते. पण आज दिल्लीत लोकांच्या बळाचे प्रदर्शन होणार आहे.
हे या माज चढलेल्या सत्तांधाना अर्थातच चालणारे नाही. आज दिवसभरात काय होईल ते साशंक मनाने पाहात रहायचे आहे. (2/10)
आणि अशा या कसोटीच्या वेळी फोलपटी फोकनाड देशभक्तीचे ढोल पिटणारे रास्वसंघाचे लोक काय करीत आहेत माहीत आहे का?
संघाचे अनेक दुष्कार्यकर्ते लोक घरोघर जाऊन राममंदिरासाठी किमान शंभर रुपये तरी द्या. (3/10)
मै जल रही हूँ मां मुझको बचाओ ना
क्या घर से भी ना निकलूँ इतना बताओ ना
दर दोन चार दिवस जात नाही तर सामूहिक बलात्काराच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना पालकांना आपल्या दोन वर्षे वयाच्या मुली पासून तर ७० वर्षे वय असलेल्या स्त्रियांची काळजी वाटत असेल तर आश्चर्य वाटायला (1/14)
नको. खासकरून शाळा, कॉलेज मधे जाणाऱ्या मुलींचे पालक त्या घरी सुखरूप परत येत पर्यंत प्रचंड तणावाखाली राहत असतील. वासनांध नराधमांना वयाच काही घेणेदेणे नाही समोर दिसत ते स्त्रीच शरीर, एक भोगवस्तू. (2/14)
संस्कृतीचा पूळका आलेल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्त्रियांच्या पेहरावात आणि बलात्कार ह्याचा काहीही संबंध नाही तो गलिच्छ मानसिकतेचा किळसवाणा प्रकार आहे.
आपल्या पैकी प्रत्येकाला रस्त्यावर, खाजगी क्षेत्रात, (3/14)