देशातल्या शेतकऱ्यांचा जीव नवीन कृषिकायद्यांमुळे धसकला आहे. आंदोलने चालली आहेत. लोक थंडीवाऱ्याची, संसर्गाची पर्वा न करता गेला दीड महिना रस्त्यावर तळ ठोकून आहेत.
आज राजधानी दिल्लीत भारतीय प्रजासत्ताकातील सार्वभौम लोकांना प्रवेश बंद करण्यासाठी भली मोठी यंत्रणा कामी लागली आहे. (1/10)
रस्ते बंद करण्यात आले आहेत. देशाच्या बलशाली असण्याचे प्रदर्शन दिल्लीत या दिवशी होते. पण आज दिल्लीत लोकांच्या बळाचे प्रदर्शन होणार आहे.
हे या माज चढलेल्या सत्तांधाना अर्थातच चालणारे नाही. आज दिवसभरात काय होईल ते साशंक मनाने पाहात रहायचे आहे. (2/10)
आणि अशा या कसोटीच्या वेळी फोलपटी फोकनाड देशभक्तीचे ढोल पिटणारे रास्वसंघाचे लोक काय करीत आहेत माहीत आहे का?
संघाचे अनेक दुष्कार्यकर्ते लोक घरोघर जाऊन राममंदिरासाठी किमान शंभर रुपये तरी द्या. (3/10)
हे मंदिर म्हणजे राष्ट्रनिर्माण आहे तुम्ही सहभागी व्हा असे सांगून पैसे गोळा करीत आहेत. मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये शिरून वर्गणी गोळा करायची आणि ज्वर चढवायचा हे यांचे जुनेच गणित आहे. इतर पक्षांमध्ये घुसलेले मंदबुद्धीही आजकाल रामाच्या देवळासाठी पैसा गोळा करत आहेत. (4/10)
ठिकठिकाणी मोठेमोठे फ्लेक्स लागले आहेत. सुप्रीम कोर्टाने जर ही जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली आहे तर मग या सगळ्या बेहिशेबी पैसा गोळा करण्याची जाबाबदारीही केंद्रावर येते. पण सैंय्याच भये कोतवाल तर आता काय... (5/10)
तर हे वर्गण्या गोळा करणारे काकाकाकू आणि त्यांची पिलावळ असे घरोघरी-दारोदारी जाऊन राममंदिर बांधण्याचे महत्त्व आधीच अकलेचा आणि माहितीचा उजेड असलेल्या लोकांना सांगत आहेत. संघात सामील व्हा, मुलांना पाठवा हा दिव्य संदेशही दिला जातोय. (6/10)
संघात जाऊन आणखी कुठलेकुठले (विषपेरणीचे) ज्ञान मिळेल हे सुद्धा सांगितले जातेय. थोडक्यात, राममंदिराच्या निमित्ताने पुन्हा एकदा लोकशाहीविरोधी संघटना वाढवण्याचे कंत्राट मिळाले आहे.
यात सेल्फीही घेतल्या जात आहेत. डेटा गोळा होतोय. कुणी वर्गणी दिली, कुणी नाही दिली, कोण भांडले, (7/10)
कोण अलगद फसले... सारा डेटा नंतर कधीतरी एखाद्या वर्षात वापरता येणार आहे...
आपल्या भोवती असे लोक दिसले तर त्यांचा प्रखर विरोध करायला हवा. हाकलून देणारे कमीच असतील. पण ध्रुवीकरण होतच असेल तर होऊन जाऊ द्या. (8/10)
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पिकनिक म्हणून हिणवणारांच्या संघटनेचे राममंदिर आम्हाला नको. (9/10)
आज 2021 ला भारता सारख्या विकसनशील देशात ,जागतिकीकरणाच्या स्पर्धेत तरुणाईला सार् जग आपल्या कवेत घ्यायचे आहे, जिथे विविध प्रकारच्या भाषा, पंथ,परंपरा ,वेशभुषा व प्रचंड भौगोलिक तफावत असलेले भुभाग आहे तिथे खरच राम मंदिर, हिंदू मुस्लिम, सावरकर, (1/25)
नेहरू ह्या चर्चा किती गैरलागू आहेत? एखादा विषय ५००० वर्षे मागे जाऊन चर्चा करणे,प्रत्येक गोष्टींना संस्कृती आणि आस्थेला जोडत त्यावर वातावरण तापवून निवडणूकांकरीता मैदान करत जिंकणे बस हेच एकमेव उद्दिष्ट. (2/25)
लक्षात ठेवा आपण वर्तमानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून भविष्यातील अडचणीत भर घातल आहोत.
भावनीक मुद्दे उपस्थित करून सरसकट सर्वच बाबतीत जनतेला मूर्खात काढण्याचा प्रकार सुरू आहे. (3/25)
मै जल रही हूँ मां मुझको बचाओ ना
क्या घर से भी ना निकलूँ इतना बताओ ना
दर दोन चार दिवस जात नाही तर सामूहिक बलात्काराच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना पालकांना आपल्या दोन वर्षे वयाच्या मुली पासून तर ७० वर्षे वय असलेल्या स्त्रियांची काळजी वाटत असेल तर आश्चर्य वाटायला (1/14)
नको. खासकरून शाळा, कॉलेज मधे जाणाऱ्या मुलींचे पालक त्या घरी सुखरूप परत येत पर्यंत प्रचंड तणावाखाली राहत असतील. वासनांध नराधमांना वयाच काही घेणेदेणे नाही समोर दिसत ते स्त्रीच शरीर, एक भोगवस्तू. (2/14)
संस्कृतीचा पूळका आलेल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्त्रियांच्या पेहरावात आणि बलात्कार ह्याचा काहीही संबंध नाही तो गलिच्छ मानसिकतेचा किळसवाणा प्रकार आहे.
आपल्या पैकी प्रत्येकाला रस्त्यावर, खाजगी क्षेत्रात, (3/14)