कॉ गोविंद पानसरेंच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचा उल्लेख केला की पोरांना इमोशनल करायला काही दांभिक माणसं शिवरायांचा एकेरी उल्लेख, आदर वगैरेसारख्या पाणचट गप्पा मारतात !
ही तीच लोकं असतात जी पानसरेंचा खून "त्या" एकेरी उल्लेखातून झाला अशी अफवा उठवून 1/n
मूळ कारस्थानी "सनातन संस्थेला" वाचवायचा केविलवाणा प्रयत्न करतात
अशाच काही दांभिक लोकांनी एकदा शिवाजी विद्यापीठाचं नावही बदलायची टूम उठवली
या भामटेपणाचा समाचार घ्यायला आम्ही "शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव" हा ब्लॉग लिहिला होता (लिंक miyodha.blogspot.com/2019/12/blog-p… ) 2/n
त्यातला काही भाग आणि आणखी काही उदाहरणे आज आपल्यापुढं मांडतोय...
आपल्या भगिनी हादग्यामध्ये गाणी म्हणतात - "शिवाजी अमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला..."
अनेक वर्षांपासून आपण घोषणा देतोय - "...जय शिवाजी"
3/n
३५० वर्षांपासून आपल्याकडे शिवरायांचे पोवाडे गेले जातात, "...त्यास नाही जाणीव शक्तीची, शिवाजी राजाच्या कारामतीची..."
या सर्वांमध्ये "शिवाजी" असा उल्लेख हा अति-आदर, भक्ती, हक्क आणि प्रेम या भावनांचा सुंदर मिलाफ असतो..!!
4/n
अगदी तसाच जो प्रबोधनकार ठाकरे यांच्या "दगलबाज शिवाजी" किंवा कॉ.गोविंद पानसरे यांच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तकांमध्येही आढळतो
हा उल्लेख अगदी तसाच आहे जसा आपण "भैरूबाच्या नावानं.. जोतिबाच्या नावानं..नाईकबाच्या नावानं चांगभलं किंवा उदे ग अंबे उदे" असं अगदी भक्तिभावानं म्हणतो!
5/n
मराठी भाषेमध्ये आई, देव आणि राजा यांचा उल्लेख अति-आदर आणि जिव्हाळ्यामुळेच एकेरी केला जातो
आता काही वर्षांपासून मराठी सिनेमा "बघतोस काय मुजरा कर" मधील सुपरहिट गाणं "माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं" यात शिवरायांचा उल्लेख "अहोजाहो" प्रकारे कसा करायचा हे कोणी सांगू शकेल का?
6/n
या गाण्यातला शिवरायांचा एकेरी उल्लेख हाही त्याच "अति आदर" प्रकारातच मोडतो
छत्रपती शिवराय ही आपली आई, प्रेरणा, शक्तिस्थळ आणि श्वास आहे त्यामुळे हक्काने आपसूकच शेकडो वर्षांपासून मराठी माणसं त्यांचा एकेरी उल्लेख अनेक ठिकाणी त्याच "आई" वरच्या हक्काने आणि प्रेमाने करतात
7/n
पण उगाचच ज्यांना ही संस्कृती, या प्रेरणेशी काहीही देणं घेणं नसतं ती लोकं ज्यावेळी त्यांच्या"आदरातीर्थी"उल्लेखाचा दांभिक अट्टाहास धरून नव्या पिढीतील अनेक पोरांना नको त्या वादात भरडून टाकतात त्यावेळी मात्र आपण कोणाच्या हातची बहुल बनत चाललोय याची कल्पना करू मन विषन्न होतं...
8/8
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव व वजन-मापं यावर नियंत्रण ठेवणारी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची शासन निर्मित संस्था"!
शेतकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, व्यापारी,खरीददार व राज्य शासन या सर्वांचा मेळ घालून मार्केट कमिट्या चालतात 2/n
यामध्ये मुख्यत्वे २ प्रकारचे व्यापारी असतात : आडते आणि खरीददार
बाजार समित्यांचे लायसन्स असणारे अनेक आडते असतात ज्यांच्याकडे प्रतिनिधी म्हणून शेतकरी आपला शेतमाल लावतो. कोणत्या अडत्याकडे आपला माल द्यायचा हे सर्वस्वी शेतकऱ्यावर अवलंबून असते. 3/n
31st special
👇 हे "विषारी पांडे"नं वाचलं नाही तरी चळवळीशी आत्मीयता असणाऱ्यांनी जरूर वाचावे !
हे आहेत "रज्जाक बादशाह मुल्ला", वय वर्षे ५२, रा कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
३६ वर्षांपूर्वी (१९८४ साली) कर्मसंयोगानं त्यांनी व्यवसाय निवडला फोटो फ्रेम बनवायचा, 1/n
थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं की अत्यंत भक्तिभावाने अनेक हिंदू बांधव त्यांच्याकडून देव-देवतांच्या फोटो फ्रेम बनवून घेऊ लागलेत
रज्जाक यांनी त्याक्षणी तीथूनपुढे आयुष्यभर शाकाहारी राहण्याचा निर्णय घेतला, 2/n
तेंव्हापासून तब्बल ३६ वर्षे कसल्याही मांसाहारी पदार्थाला त्यांनी चक्क साधा स्पर्शही केलेला नाही !
"माझ्या ग्राहकाच्या निगडित भावनांचा आदर एक व्यावसायिक म्हणून मी करायलाच हवा".. केवढा मोठा विचार ! केवढा मोठा त्याग !
3/n