जर अभियांत्रिकी शाखेत आजच्या परिस्थितीला जास्त रसातळाला गेलेली कुठली शाखा असेल तर ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग !
वाईट नक्कीच वाटतं कारण मी देखील याच शाखेतून अभियांत्रिकी परीक्षा देऊन आज 'नावाला' इंजिनिअर म्हणून समाजात वावरतो आहे. (१/७)
एकेवेळी आपल्या देशाची आर्थिक बाजू शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या या क्षेत्राचा, मुळात म्हणजे क्षेत्राचा नाही त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांच्या वाईट काळ सुरू आहे. आज तुम्ही कुठल्याही शहराच्या MIDC परिसरात जाऊन या चित्र खूप दुःखद आहे. याला नक्की जबाबदार कोण ? प्रश्नच ! (२/७)
माझ्या मते याचे उत्तर आपल्याला या देशातील शिक्षण पद्धतीवर आणून सोडतो. अभियांत्रिकी क्षेत्रातील कोअर शाखा असून सुद्धा मेकॅनिकल शाखेमध्ये शिक्षण पद्धती खूप जुनाट आणि थिअरी प्रणालीवर वर अवलंबून आहे. २५-३० फुटी बॉयलर फक्त ३-४ इंची पुस्तकातील (३/७)
चित्रामध्ये पाहून शिकता येत नाही ही वास्तविकता आहे. शेकडो विद्यार्थी एका बॅच मध्ये असतात परंतु महाविद्यालयात साधे ३-४ लेथ मशीन ! आणि ती सुद्धा नीट न चालणारी. CNC मशीन तर अशी ठेवतात जणू काही संग्रहालयात मेणाचा पुतळा ठेवला आहे. त्यावर काम करणे तर सोडाच पण त्याला हात लावणेही.. (४/७)
कठीण असते आणि डिझाईन विभागात अजुन ही जुनाट सॉफ्टवेअर वापरली जातात. जी मुख्यतः महाविद्यालयातील शिक्षकांना देखील जमत नाहीत. हे चित्र या देशाच्या शिक्षण पद्धतीच आहे आणि हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. विद्यार्थी काय शिकणार ? कसा घडणार ? तो उगाच व्यवस्थेला बोट टोचत.. (५/७)
तो उगाच व्यवस्थेला बोट टोचत आणि त्याच्या / पालकांच्या महत्वकांक्षी स्वप्नांची चित्र रंगवत आपले शिक्षण पूर्ण करतो. आणि या एक सुशिक्षित पण अनाडी 'मेकॅनिकल अभियंता' म्हणून समाजात उभा राहतो ! संघर्षाची खरी सुरवात ही येथून होते, आज च्या या बिकट परिस्थिती 'हा' मुलगा नोकरी
(६/७)
शोधण्यासाठी अनेक तथाकथित कंपन्यांच्या 'गेट' वर फिरून चपला झिजवतो परंतु हाती येते ती निराशा.. कारण या क्षेत्रातील मालक /भांडवलदार / साहेब मंडळींनी आप-आपले दलाल या ठिकाणी व्यवस्थितरित्या पेरून ठेवले आहे. ज्यांना आपण 'प्लेसमेंट सेल' असं सुंदर नाव दिले आहे.
या ठिकाणी आधी जाऊन भेटावं लागत. आणि हो.. त्याची ही एक 'फी' आकारली जाते नंतर आपल्या 'पदवी'ची योग्य ठरेल ती किंमत मोजून आणि तरुणांच्या एका महिन्याच्या मेहनतीची दलाली 'आनंदाने' स्वीकारून ही मंडळी आपल्याला ९ ते १० हजारी या 'मात्तबर' पगारावर एक 'इंजिनिअर' म्हणून नोकरी देतात !
दुर्देवाने ही वस्तुस्थिती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेच्या मुलांची, आमच्या या शाखेतून आज अभियंते नाहीतर कामगार तयार होत आहेत याचे वाईट वाटते !
राज्यसभेत काय घडले? 🤔
व्हिडिओ नीट बघा व ऐका, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. उदयनराजेंच्या 'जय भवानी - जय शिवाजी' घोषणेनंतर काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी "This is not allowed" (00:13 - 00:16) असा आक्षेप घेतल्यानंतर सभापतींनी त्यांच्याकडे बघून ...(२)
त्यांना उद्देशून दिलेली प्रतिक्रिया आहे
(00:16 - 00:26) "It's not a house it's my chamber" (हे संसदेचे सत्र नसून आपण फक्त शपथविधी साठी एकत्र आलो आहोत, इकडे House म्हणजे संसदेचे सत्र, घर नाही!)
"He's a new member"
(ते नवीन सदस्य आहेत)
"And it is not going on record also"
...(३)
(आणि बाकीचे शब्द अभिलेखात जात नाही)
"It will be only oath (on record)"
(फक्त छापील शपथ अभिलेखात नोंदली जाईल)
या सगळ्याने confuse झालेल्या उदयनराजेंना उद्देशून त्यांच्याकडे बघून सभापती म्हणाले - (00:28 - 00:33)
"No other slogans are allowed in the house keep that in mind ...(४)