श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या राजकीय खेळया आणि त्यांचे परिणाम
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ह्यांचा उदय झाला तो स्व श्री गोपीनाथ मुंडे ह्यांच्या मुळेच
मुंडे गडकरी वादाचा फायदा झाला फडवणीसांना 2014 मध्ये मुंडे गडकरी दिल्लीत स्थिर होत असल्याने मुंडे नी गडकरींना शह देण्यासाठी
देवेंद्रजीं ना भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष केले गेले त्याचा देवेंद्रजीं नी योग्य वापर केला संधी च सोन केले पण नशीब जोरावर होतं आणि महाराष्ट्राचे 2014 मध्ये मुख्यमंत्री होऊ शकणारे गोपीनाथ मुंडे ह्यांचे दुर्देवी दुःखद निधन झाले देवेंद्रजीं ना आणणारे मुंडे हयात न्हवते दिल्लीत मोदी शहां
दोघे स्थिरावले होते देवेंद्रजीं नी दोघांच्या अपेक्षेप्रमाणे मेहनत केली आणि यशस्वी
झाले नागपूर संघाचे आशीर्वाद मिळाले आणि झाले मुख्यमंत्री पण वरिष्ठ दुखावले गेले ते प्रामुख्याने एकनाथ खडसे
मनीष भंगाळे ह्याच्या आरोपाने खडसेंचा काटा काढला गेला एक वरिष्ठ धक्याला लावले गेले होते
अर्थात सर्व काही हातात घेतल्या नंतर खंडसें ना बाजूला केले गेले पक्ष संगठण आणि मुख्यमंत्री पदाची ताकत एकहाती आलेली होती पुढील लक्ष होते पंकजा मुंडे कारण बरेच त्यातील एक म्हणजे पंकजा ताईंचे ते एक वाक्य "" मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री "" त्यांच्यावर अंकुश लावला गेला तो धनंजय मुंडे
ह्यांना हाती धरून त्यांना चिक्की घोटाळ्या संदर्भात रसद दिली गेली
पंकजा मुंडे भोवती चक्रव्यूह रचला गेला होता 2019 मध्ये निवडून न येण्यामागे फडवणीसच होते हे उघड आहे त्यांनी धनंजय वापर केला आणि मुंडे संस्थान खालसा केलं ज्याला करावं गुरू तिथूनच व्हावे सुरु
आता वेळ होती गृहमंत्री पदाची स्वप्न बघणाऱ्या विनोद तावडेंची पाच वर्षांत पद्धतशीर पणे पंख छाटले गेले मंत्रिपदाच्या जवाबदाऱ्या कमी होत गेल्या आणि शेवटी तिकीट कापून घरी बसवले राजकारणात गॉड फादर नसल्याने तावडेंची विकेट गेली फक्त गृहमंत्री व्ह्यायला आवडेल एव्हढ्या वाक्याने घात केला
प्रकाश मेहतां हे मुंडे समर्थक आणि त्यात वरिष्ठ राज्यात वरिष्ठ आणि पर्याय नकोच म्हणून मेहतांचा राजिनामा घेतला गेला चौकशी मध्ये दोषी अढळले नाहीत तरीही परत मंत्रिमंडळात वगळले गेले आणि एक मुंडे समर्थक हटवले गेले आता मुंडे गडकरी ऐवजी फडवणीस गडकरी सुरू झाले होते त्यातपुढे होते बावनकुळे
बावनकुळे हे गडकरी समर्थक त्यांना शेवटच्या क्षणापर्यन्त ताठकळत ठेवले शेवटच्या दिवशी बावनकुळे फडवनिसांच्या भेटीला गेले त्यांना तिथे अडकून ठेवले कामठी मतदारसंघात बावनकुळे समर्थक फॉर्म भरण्यासाठी एकत्र होत होते पण शेवटच्या क्षणी फडवणीसांनी त्यांना त्यांच्या सोबत ठेवले ते स्वतः चा
फॉर्म भरण्या साठी बावनकुळे चेक मेट केले गेले त्यांच्या जागी जिल्हापरिषद सदस्य सावरकर ह्यांना तिकीट दिले गेले म्हणजे त्यांना आधी पासून तयार करून ठेवले गेले होते बावनकुळे हे गाफील राहिले आणि फडवणीस शिकारी झाले होते सावज शिकार झाली ती चंद्रशेखर बावनकुळे ह्यांची
दिल्लीच्या ताकती चा
रंग दिसायला लागला होता देवेंद्रजी च्या एकएक खेळी यशस्वी होत होत्या कारण नियोजन बद्ध कारभार निवडणूक एकतर्फी दिसत होती 2019 लोकसभा 303 खासदार आलेले होते शिवसेना परत खिंडीत आलेली होती त्यात तोडफोड जोरात सुरू केली
राणे
हर्षवर्धन पाटील
पद्मसिंह पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
मधुकर पिचड
छत्रपती उदयनराजे
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे
अजूनही खूप जे येतील ते NCP आणि काँग्रेस ला खिंडार पडायचे काम जोरात सुरू केले गेले होते त्या साठी लागणारी सर्व ताकत दिल्ली देत होती आता महाराष्ट्र भाजपा फक्त फडवणीस ह्यांच्या नियंत्रणात आलेली होती
स्वकीय शांत आणि विरोधक नामोहरम अशी अवस्था
फडवणीसांनी जे जे ठरवले ते ते होत होते
आता मित्र पक्ष 2014 मध्ये सर्वात डोईजड झाले होते ते कट्टर मुंडे समर्थक महादेव जानकर
रासप ला 3 जागा दिल्या त्यांचे उमेदवार पण घोषित केले कुल आणि बोर्डीकर ह्यांना शेवटच्या क्षणी भाजपा चा AB फॉर्म दिला आणि दोन्ही उमेदवार भाजपा चे झाले
रासपला एक जागा राहिली म्हणजे मंत्रिपद द्यायचे कारण नाही असा विश्वासघात झाला होता जानकर आजून सावरलेले नाहीत धनगर आरक्षण 100 दिवसात देऊ म्हटले होते 2014 मध्ये 5 वर्ष खेळवत काढले पण दिले नाही आता त्यांच्या जागी पडळकर ह्यांना भाजपा मध्ये घेतले आहे म्हणजे मुंडे समर्थक नामोहाराम
खडसे बावनकुळे मेहता आणि तावडे ह्यांना हटवले गेले म्हणून नागपूरच्या 12 पैकी 5 जागा कमी झाल्या हे खरं आहे फडवणीसांनी निवडणुकी नंतर शिवसेनेला परत झुलायला ठेवले मागच्या वेळी शरद पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता ह्या वेळेस शिवसेना परत फरपटत येणार ह्या अविर्भावात मिरवत होते
पण शिवसेना ह्या वेळेस मागील चूक करायला तयार न्हवती NCP सोबत चर्चा सुरू झाल्याचे पाहून फडवणीसांनी अजीत पवार ह्यांना घेरलं शरद पवार शेवटची खेळी खळत होते त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती bjp आणि ncp वाटाघाटी सुरू झाल्या आणि अचानक फडवणीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ते पवारां सोबत
खेळ फडवणीसांचा संपला होता आणि शरद पवारांचा सुरू झाला होता एका दिवसात सर्व बंडखोर माघारी आणत फडवणीसांनी खेळलेली सर्व खेळी धुळीला मिळाली स्वतः फक्त हुशार आणि बाकीचे मूर्ख असे राजकारणात चालत नाही एकहाती पाच वर्षे सत्ता भोगून अपमानास्पद पायउतार व्हावे लागले ते फक्त अहंकारी स्वभावानेच
सर्व बहुजन नेत्यांना हटवुन भाजपा ही बहुजनांची राहिली नाही अशी प्रतिमा परत झाली शेठजीं भडजी चा पक्ष अशीच ओळख राहिली आहे त्यात
लाड
दरेकर
महाजन
ह्यांच्या घोळक्यात स्वतः ची उंची कमी करून घेतली पक्षाचे नुकसान मोठे झाले आता समीकरण बदलायला लागली आहेत फडवणीसांनी bjp चे अतोनात नुकसान केलं
अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण खरी करून दाखवली कमी वयात नशिबाने मुख्यमंत्री पद मिळाले होते जास्त हुशारी जास्त चातुर्य जास्त अहंकार जास्त उन्मात सोबत्यांचाच विश्वासघात मित्रपक्षांना दिलेले धोके हे भविष्यात bjp ला महागात पडनार आहे
पुन्हा येईन
जय हिंद जय महाराष्ट्र
ज्यांनी ज्यांनी माझा हा प्रयत्न लाईक केला रिट्विट केला त्या सर्वांचे खूप खूप आभार आपण दिलेल्या प्रोत्साहना मुळे नवीन ऊर्जा मिळाली ह्या पुढे ही साखळी तुटू देणार नाही
सुरवात करण्यासाठी एका मित्राचे धन्यवाद ज्यांनी मला थोडं डिवचले म्हणून माझ्या हातून हे लिहिले गेले
ही सुरवात आहे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आज मला भाजपा ला समर्थन केल्याची मनापासून लाज वाटते ह्यांच्या नालायक लोकांनी आख्या NDA च अस्तित्व संपऊन टाखले ज्यांनी ज्यांनी ह्यांना साथ दिली सोबत घेतले त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणले भाजपा ने
उदाहरण द्याचेच झाले तर प्रामुख्याने
शिवसेना
शिरोमणी अकाली दल
JDU
जयललिता ची AIADMK
जेंव्हा NDA स्थापित केली गेली तेंव्हा पासून ज्यांनी ज्यांनी BJP ला मदत केली त्यांचे अतोनात नुकसान केले BJP ने
सगळ्यात आधी शिकार झाले ते जॉर्ज आणि शरद यादव तेंव्हा bjp ने नितीश ला समर्थन दिले आणि दोघांना संपवले आज नितीश ला संपवत आहेत
अकाली दल ला सुद्धा अशीच वागणूक दिली ते पण गेले
सुरवातीची bjp ही अटल अडवाणी ह्यांची होती त्यांची नियत चांगली होती आजची bjp ही मोदी शहा ह्यांच्या सारख्या टोळ बहीऱ्यांची आहे ज्यांना प्रचंड माज आहे ते सर्वसमावेशक नाहीत त्यांना फक्त हुजरे आणि चाटेच पाहिजे
त्यांनी मम आत्मन म्हणायचे आणि बाकीच्यांनी स्वाहा म्हणायचे एवढेच सूरु आहे