धागा...

अशीही एक वार्यावरची वरात!

शासनातील भ्रष्टाचार हे हिमनगाच्या टोकासारखे असतात. किंचीतश्या टोकाच्या दर्शनाने जनता हक्काबक्का होते, असा गरीब बापड्या राजकारण्यांचा समज असतो. लोणचं जसं मुरतं, तसा भ्रष्टाचार खोलपर्यंत मुरलेला आहे, हे चलाख जनता चांगलंच जाणते.

+👇
१/१४
आता या गोष्टी पासून कोणी अनभिज्ञ असेल, तर समजा त्याचे दुधाचे दात अजूनही पडलेले नाहीत. लोक एकतर खरंच दुधखुळे असतील किंवा राजकारण्यांनी लोकांबद्दल तसा समज करुन घेतला असावा. कालचा अख्खा दिवस, वेगवेगळ्या राजकारण्यांनी भ्रष्टाचारावर चर्वितचर्वण करण्यात घालवला.

+👇
२/१४
अबब! काय ते खंडणीचे आकडे आणि त्या पैशांच्या राशी कोणासमोर ओतल्या जाणार म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान गदारोळ! म्हणजे असलं अब्रमण्यम राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की काय? असं वाटण्याजोगी स्थिती! थोडक्यात, ऐतिहासिक घटनाच जणू!

+👇
३/१४
कधी कधी वाटतं, आपले राजकारणी कित्ती भोळे असतात नाही? त्यामानाने जनता खूपच चतुर म्हणायची की! तमाम जनतेला सगळी सरकारी खेकटं माहिती असतात; पण राजकारणी मात्र तेवढे अजाण! विरोधक दिवसभर सर्व माध्यमांवर राळ उडवून देतात आणि हे पाहत रिकामी जनता सुट्टीचा आनंद लुटते.

+👇
४/१४
गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास ही खाती म्हणजे दुभती गाय असते. जनतेला हे ठाऊक असतं बरं! कारण जनतेची इथे जेव्हा कधी कामं निघतात, तेव्हा त्यांनी इथल्या अनागोंदीचा अनुभव घेतलेला असतो. परंतु राजकारणी, मग ते विरोधक असोत वा सत्ताधारी, कित्ती ते भाबडे!

+👇
५/१४
बया, बया, बया, कोणालाच भ्रष्टाचार वगैरे गोष्टींची काय सुदीक कल्पना नसते. सगळं कसं सालस, निरागस, आमच्या काळात नाही हो असलं काही व्हायचं किंवा आम्ही नाही हो त्यातले, प्रकारचं! कैकदा असलं निष्कलंक, निष्कपट राजकारण पाहून गहिवरून येतं.

+👇
६/१४
खूप वरच्या अधिकारांच्या बदल्या म्हणजे चराऊ कुरणंच जणू! या नंदनवनात सगळे बागडून मोकळे झालेले असतात. परंतु आरोप करणारे राजकारणी असा काही आव आणतात, की वल्लाह! तसे सगळ्यांचेच हात दगडाखाली अडकलेले असतात म्हणून बेछूट असले तरी ते आरोप वाईच बेतानेच केले जातात.

+👇
७/१४
यासाठी विरोधक अनेक उपफळ्या तयार ठेवतात. या उपफळ्यांचं काम असतं, ममं म्हणून पंचपत्रीने त्या अमुक एक प्रसंगात उदीक सोडून पुजेची सुरुवात करणं. पुढे मग महत्वाची पात्रं पुजेच्या पाटावर बसून विगतशीर साधुवाण्याची गोष्ट तडीस लावतात. अशाने, कसला भारी माहौल तयार होतो माहितेय.

+👇
८/१४
रविवारचा दिवस! कोणी शाकाहार तर कोणी मांसाहारावर ताव मारत, कानावर आदळणार्या कोटींच्या कोटी गोष्टी सहज, नळी फुंकली सोनारे सारखी इकडून तिकडून सोडून, मस्त ताणून देतात. असली कांड जनतेला नवी नसतात म्हणून त्यांच्या तंबूत तशी शांतताच असते.

+👇
९/१४
एकूणच सर्व ठणाणा विरोधक व सत्ताधारी यांच्यातच रंगतो. आज विरोधक "खो" देतील, उद्या सत्ताधारी! यांचा हा "खोखो" अखंड सुरुच राहणार म्हणून जनता "खोखो" हसून घेते. एका डावात भोज्जा दिला की दुसरा डाव आणखी जोमात सुरु होतो. अशातर्हने सत्तेच्या संगीतखुर्चीचा खेळ रंगतदार होतो.

+👇
१०/१४
महागाईचा कळस, शिक्षणाची ऐशीतैशी, आरोग्य व्यवस्थेची दैना, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, आपल्या वेगवेगळ्या समस्यांसाठी जमेल तसा टाहो फोडतात आणि मग गपगार होतात. याबाबतीत मात्र राजकीय पटलावर स्मशान शांतता असते.

+👇
११/१४
जनतेचे प्रश्न तडीस लावले तर वृत्तवाहिन्यांवर हाईप मिळणार नसतो, संसदेत गदारोळ होणार नसतो, व्हाॅटस् अपवर सामुहिक वादविवाद रंगणार नसतात म्हणून मग सरकारातील दोन्ही बाजू आरोप-प्रत्यारोपांची एकच दंगल उसळून देतात आणि आपापलं राजकीय संवाद कौशल्य पणाला लावतात.

+👇
१२/१४
जनता काय हो, काल होते, आज आहेत आणि उद्याही असतील. सत्ता सुंदरीला वश करणं, हे जास्त गरजेचं. इतकं एक ईप्सित साध्य झालं की राजकारण कसं गुले गुलज़ार! बाकी सगळं गेलं खड्डयात! पुन्हा चार दिवसांनी, ऑफ द रेकॉर्ड, तुझ्या गळा माझ्या गळा, होणारच आहे. तोपर्यंत जोर लगा के हैशा!

+👇
१३/१४
डर सबको लगता है। गला सब का सूखता है। पर हर डर के आगे जीत हैं। म्हणून दोन्हीकडून झेपेल इतकेच आरोप केले जाणार आणि याचं फलित कुणीतरी एक लाॅलीपाॅप चोपत बसणार आणि जनतेला मिळणार ठेंगा 👎 चोपा नाहीतर मुडपा.

१४/१४

--- समाप्त 🙏

--- दुर्गा

२२.०३.२०२१

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 💝 DURGA 💝

💝 DURGA 💝 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Am_here_DURGA

26 Jan
धागा.....

शेतकरी आंदोलन आणि प्रजासत्ताक दिन

शेतकरी आंदोलनाला दोन महिने होतील. या दोन महिन्यांत शेतकर्यांचा संयम कौतुकास्पद! सरकार, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल, व्हाॅटस् अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविरोधात सगळ्या प्रकारची गरळ ओकून झाली.
१/१९
+👇
अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या निर्णयाबाबत ठाम राहिले. सरकारच्या साम, दाम, दंड, भेदाविरोधात उभं राहणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच शेतकर्यांचं विशेष अभिनंदन!शेतकरी आंदोलन...
Divert & Rule,
Divide & Rule,
Defame & Rule
असं तीन प्रकारे तोडण्याचा यत्न झाला.
२/१९
+👇
Divert & Rule : सरकारमधील नेते व प्रवक्ते यांनी शेतकर्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चायनीज एजंट, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल या आणि अशा अनेक उपाध्या देऊन आंदोलन बदनाम करण्याचं कुंभांड रचलं गेलं. परंतु शेतकरी याला पुरुन उरले आणि आंदोलन अधिक तेजाने तळपू लागलं.
३/१९
+👇
Read 19 tweets
13 Jul 20
धागा....

नेमकी कुठली धारावी?🤔

कालपासून धारावीतील कोरोना नियंत्रण, संघ स्वयंसेवकांचं काम, WHO कडून शाब्बासकी, असं बरंच काही वाचनात आलं. त्यावरुन बरेच वादंगही होत आहेत. अशावेळी भाईंदर पश्चिमेकडील धारावी आठवली. ही धारावी म्हणजे "धारावी देवी"चं स्थान!
+👇
इथे देवीला कोंबड्या, बकरे इ.चा नैवेद्य चढविला जातो. अर्थात बळी दिला जातो. या धारावीला लागूनच डोंगरी आहे. इथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा, केशवसृष्टी, रामरतन विद्यामंदिर, असं बरंच काही आहे. या शहराची महानगरपालिका (MBMC) व महापौर भाजपचा आहे.
+👇
तेव्हा कालपासून गाजत असलेलं "धारावी" हे ठिकाण बहुतेक इथलं असू शकतं.😄 नामसार्धम्यामुळे असं झालं असावं. नीट खात्री करुन घ्यावी. उगीच कोरोना काळात श्रेयवादाच्या लढाईवरुन वादंग नको.😉😝 तर सांगायची गोष्ट अशी, की भाईंदर शहरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे.
+👇
Read 5 tweets
11 Jul 20
धागा......

लालबाग गणेशोत्सव आणि राजकारण!

जुन्या मुंबईतील कामगारबहुल भाग आणि आत्ताच्या मुंबईचा एक श्रीमंत भाग म्हणजे लालबाग! बस, रेल्वे, मोनोरेल मार्गे पश्चिमेकडे कुलाब्यापासून दहिसर व पूर्वेकडे मुलुंडपर्यंत जोडला गेलेला हा विभाग म्हणजे गणेशोत्सवाची पंढरीच जणू!

+👇
अनेक नामांकित गणेशोत्सव मंडळांची इथे मांदियाळी! पैकी गणेश गल्ली, लालबागचा राजा व चिंचपोकळी (चिंतामणी) ही तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सगळ्यात जास्त प्रसिद्ध! यातही पुन्हा लालबागचा राजा हा मानबिंदू! लालबागमध्ये पारशी लोकांची "हिल्ला टाॅवर" व अग्यारी देखील तितकीच ख्यातनाम!

+👇
थोडक्यात सांगायचं, तर लालबाग बहुभाषिक सुध्दा आहे. अशा या लालबागमध्ये शिवसेनेच्या उदयापूर्वी काॅम्रेड कृष्णा देसाई व त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीची निरंकुश सत्ता होती. सेनेच्या उदयानंतर कृष्णा देसाईंची हत्या झाली आणि ही संधी समजून, बाळासाहेबांनी याठिकाणी मराठीची तुतारी फुंकली.

+👇
Read 16 tweets
1 Jul 20
#LalbaugchaRaja स्वातंत्र्योत्तर काळापूर्वीपासून लालबागच्या बाजारातील व्यापारी व मासळी बाजारातील कोळी भगिनींनी मिळून हा गणेशोत्सव सुरु केला. आजही गणपतीच्या मिरवणुकीत या दोन वर्गांना महत्त्वाचं स्थान असतं. २००२ पूर्वीपर्यंत ह्या गणपतीचं दर्शन सहजसोपं होतं.
+👇
किंबहुना कुठलेही पडदे वा कनाती लावून इथलं गणेश दर्शन बंदिस्त केलं गेलं नव्हतं. परंतु २००३ नंतरच्या काळात या भागातील चाळींचं प्रचंड मोठ्या प्रमाणात पुर्नविकासाचं काम मोठमोठ्या विकासकांनी हाती घेतलं आणि इथे गगनचुंबी इमारती आकार घेऊ लागल्या.
#LalbaugchaRaja
+👇
त्यामुळे इथल्या जागांना हिरेमाणकांचे भाव आले. मग इथला मूळ मुंबईकर गिरणी कामगार मध्यमवर्गीय मराठी समाज या जागा विकून रातोरात करोडपती झाला. दूरच्या पूर्व व पश्चिम उपनगरात मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. या कालावधीत इथे अमराठी लोकांचं प्राबल्य खूप वाढलं
#LalbaugchaRaja
+👇
Read 14 tweets
29 Jun 20
दोन वर्षांपूर्वी आर्थर रोड जेलमध्ये मंजुषा शेट्ये या महिला कैद्याला कोठडीतच इतर महिला कैद्यांसमोर अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यात ती दगावली. त्यावेळी चार महिला पोलीस कर्मचारी व एका फायरब्रँड महिला जेलरचं नाव संशयाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. आज जे चेन्नईत झालंय, तेच होतं.
+👇
त्यावेळी याविरुद्ध इतर महिला कैद्यांनी जेलच्या गच्चीत येऊन रस्त्यांवरुन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आवाज उठविला होता. तेव्हा हे प्रकरण खूप गाजलं होतं. त्यावेळी त्या महिला कैद्यांचं नेतृत्व, शीना बोरा प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी करत होती.
+👇
म्हणून त्याकडे काहीसं तुच्छतेने पाहिलं गेलं. माध्यमांनी प्रकरण बऱ्यापैकी तापवलं. त्या महिला पोलिसांचं निलंबन, जेलरची बदली, चौकशी आयोग आणि न्यायालयीन खटला, यापलिकडे सदर केसमध्ये काय प्रगती झाली ते गुलदस्त्यातच राहिलं.
+👇
Read 8 tweets
26 Jun 20
धागा.....

मध्यमवर्गीय आर्थिक विवंचना, नैराश्य, आत्महत्या आणि बरंच काही.....

मागील काही दिवसांत मध्यमवर्गीय कुटुंबातून सामुहिक वा एकल, अशा आत्महत्येच्या अनेक बातम्या कानावर पडत आहेत. एकामागोमाग येणाऱ्या या बातम्या ऐकून मन विषण्ण होतं.
+👇
लाॅकडाऊनच्या काळात गेलेल्या नोकऱ्या, बुडालेले व्यवसाय, संपलेली बचत आणि कर्ज फेडीसाठी मागे लागलेले तगादे, यामुळे आलेलं नैराश्य आणि त्यातून जीवन संपविण्याकडे वाढलेला कल! सद्यस्थितीत या मध्यमवर्गीय आत्महत्यांची अशी ढोबळ वर्गवारी करता येईल.
+👇
मध्यमवर्ग तसा चिवट! परंतु सध्याची अडचणीची परिस्थिती त्याच्याही हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. एखाद्या धनिकाने आत्महत्या केली तर, "सगळं असूनही का?" म्हणून लोक हळहळतात. शेतकऱ्याने आत्महत्या केली तर, "अग्गाई, काय बापड्याच्या नशीबाचे भोग", म्हणून लोक अश्रू ढाळत चर्चा करतात.
+👇
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!