कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'होळी उत्सव' साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा 'होळी उत्सव' यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने
दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या
परिस्थितीचा विचार करता या वर्षी दिनांक 29 मार्च 2021 रोजी चा 'होळी उत्सव' अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
यासाठी शासनाच्यावतीने मार्गदर्शन सुचना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
यामध्ये होळीचा सण साजरा करताना मोठया प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असते. लाकडे जाळणे तसेच यामुळे होणारे वायु प्रदुषणाचा विचार करता होळी पेटवण्यात येऊ नये.
धुलीवंदनाच्या दिवशी मोठया प्रमाणावर रंगाचा वापर करण्यात येतो त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे.
कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये तसेच “ माझे कुटूंब , माझी जबाबदारी " या मोहिमेअंतर्गत व्यैयक्तिकरित्या सुद्धा हा उत्सव करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाची
अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, साथरोग नियंत्रण अधिनियम, १८ ९ ७ व भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🚱शनिवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
टेमघर जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळ्यापूर्वी सबस्टेशनमधील कामे करणे, ट्रान्सफार्मरचे ऑईल फिल्टेशन करणे,मुख्य जलवाहिनीवर असलेली क्रॉस कनेक्शनवर होत असलेली गळती थांबविणे (1/4) @TMCaTweetAway
तसेच टेमघर जलशुध्दीकरण केंद्रात मुख्य जलवाहिनीवर असलेल्या झिरोवेलासिटी वॉलमधून होणारी गळती थांबविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. ही कामे करण्यासाठी शनि. दि. 06/06/2020 रोजी सका. 9.00 ते रवि. दि. 07/06/2020 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे (2/4)
🚱परिणामी घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर, ऋतूपार्क,सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्याचा काही भाग आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.(3/4)
#WaterCut
शुक्रवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
@TMCaTweetAway च्या पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळ्यापूर्वी सबस्टेशनमधील कामे करण्याकरिता #शुक्रवार दिनांक 29/05/2020 रोजी सकाळी 9 ते रात्रौ 9.00 वाजेपर्यत 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
#Thane#Update
परिणामी घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर ऋतूपार्क, सिध्देश्वर जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर, कळव्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहिल.
वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन उपनगर अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे.