लोकसभेच्या वेळी राज ठाकरे "लाव रे तो व्हिडिओ" माध्यमातून सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. तेव्हा कोणी विचार तरी केला होता का, की पुढे जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील. त्याकाळात राज व साहेबांच्या मैत्रीची पारायणं केली जात.
+👇
१
त्यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थकांनी राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन नाचायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. पुढे राज ठाकरे भाजपच्या बाजूला झुकले, तर त्याचा एवढा गवगवा, इतका रागराग का केला गेला वा अजूनही केला जातोय. राज ठाकरेंना आपलं राजकारण करु द्यात की👍 अडचण काय आहे.
+👇
२
राज ठाकरेंच्या राजकारणाचं पुढे काय होईल, न होईल, हे त्यांचं ते बघतील की, तुम्ही का उगं अंगाची लाही लाही करुन घेत आहात. तसंही बाहेर निसर्ग आग ओकतोय, तेवढं पुरेसं नाही का? तुमचे नेते जर खरोखरीच पावरबाज असतील, तर फिकर नाॅट! तुम्हाला इतकं तणतणायची काही गरज नाही. बरोबर ना?
+👇
३
कुठल्याही समर्थकांनी आपापल्या नेत्यांसाठी कितीही रान हेलपायचं ठरवलं तरी ते नेते पुढे जाऊन तुम्हाला पुसटशी ओळख दाखवतील का? याचा एकदा विचार करा आणि आधी स्वतःचा उत्कर्ष साधा. ही सगळी मंडळी एखाद्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र आली तर त्यांच्यात किंचितही हेवेदावे नसतात.
+👇
४
सगळे कसे मस्त मजा करतात आणि दुसर्या दिवशी याच राम्या डोक्याच्या समर्थकांच्या जीवावर स्वतःचा पक्षीय अजेंडा रेटतात. खुळे समर्थक मात्र बेंबीच्या देठापासून एकमेकांविरोधात बोंबलत असतात. राजकारण वाईट नाही, पण त्यासाठी नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचणं थांबवा.
+👇
५
तुमच्या पक्षाला काही एक विचारसरणी असेल, तर तिच्यासाठी भांडा. नेत्यांच्या आंधळ्या लांगूलचालनामुळे चांगली नाती धुळीला मिळतात. हेच नेते एकमेकांसोबत हास्य विनोद करताना दिसले की नंतर समर्थक खजील होताना पाहिलेत. कोणतीही राजकीय असामी कायमस्वरुपी एकमेकांचे शत्रू वा मित्र नसतात.
+👇
६
मग समर्थक तरी का एकमेकांच्या जीवावर उठलेले असतात? तसंही समर्थकांविना कोणत्याही नेत्याची किंमत शून्य असते. तेव्हा समर्थकांनी आपलं अस्तित्व आधी जपा, जसं तुमचे नेते जपतात. उगीचच भविष्यातील राजकारणाचे आडाखे बांधून एकमेकांचा कुलोध्दार करण्यापेक्षा आपापल्या कामधंद्याचा विचार करा.
+👇
७
नेते इथेच असणार आहेत. त्यांच्या घरातील एखाद्या मंगलप्रसंगी तुम्ही पाहुण्यांवर अत्तर शिंपडायलाही तिथे नसणार आहात, हे ध्यानात ठेवा. कारण समाजमाध्यमांवर अगोदरच तुमची रितसर बोळवण केली गेलेली असते. म्हणून कडवे, कट्टर, प्रेमी समर्थक हो, जागे व्हा आणि आपापल्या कामाला लागा.
+👇
८
यह राजनिती नहीं आसां, बस इतना समझ लो।
समर्थकों के लिए बस यह आग का दरिया है और सिर्फ उन्हे ही तैर के जाना हैं।
९
समाप्त 🙏
--- दुर्गा
३०.०३.२०२१
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शासनातील भ्रष्टाचार हे हिमनगाच्या टोकासारखे असतात. किंचीतश्या टोकाच्या दर्शनाने जनता हक्काबक्का होते, असा गरीब बापड्या राजकारण्यांचा समज असतो. लोणचं जसं मुरतं, तसा भ्रष्टाचार खोलपर्यंत मुरलेला आहे, हे चलाख जनता चांगलंच जाणते.
+👇
१/१४
आता या गोष्टी पासून कोणी अनभिज्ञ असेल, तर समजा त्याचे दुधाचे दात अजूनही पडलेले नाहीत. लोक एकतर खरंच दुधखुळे असतील किंवा राजकारण्यांनी लोकांबद्दल तसा समज करुन घेतला असावा. कालचा अख्खा दिवस, वेगवेगळ्या राजकारण्यांनी भ्रष्टाचारावर चर्वितचर्वण करण्यात घालवला.
+👇
२/१४
अबब! काय ते खंडणीचे आकडे आणि त्या पैशांच्या राशी कोणासमोर ओतल्या जाणार म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान गदारोळ! म्हणजे असलं अब्रमण्यम राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की काय? असं वाटण्याजोगी स्थिती! थोडक्यात, ऐतिहासिक घटनाच जणू!
शेतकरी आंदोलनाला दोन महिने होतील. या दोन महिन्यांत शेतकर्यांचा संयम कौतुकास्पद! सरकार, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल, व्हाॅटस् अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविरोधात सगळ्या प्रकारची गरळ ओकून झाली.
१/१९
+👇
अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या निर्णयाबाबत ठाम राहिले. सरकारच्या साम, दाम, दंड, भेदाविरोधात उभं राहणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच शेतकर्यांचं विशेष अभिनंदन!शेतकरी आंदोलन...
Divert & Rule,
Divide & Rule,
Defame & Rule
असं तीन प्रकारे तोडण्याचा यत्न झाला.
२/१९
+👇
Divert & Rule : सरकारमधील नेते व प्रवक्ते यांनी शेतकर्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चायनीज एजंट, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल या आणि अशा अनेक उपाध्या देऊन आंदोलन बदनाम करण्याचं कुंभांड रचलं गेलं. परंतु शेतकरी याला पुरुन उरले आणि आंदोलन अधिक तेजाने तळपू लागलं.
३/१९
+👇
कालपासून धारावीतील कोरोना नियंत्रण, संघ स्वयंसेवकांचं काम, WHO कडून शाब्बासकी, असं बरंच काही वाचनात आलं. त्यावरुन बरेच वादंगही होत आहेत. अशावेळी भाईंदर पश्चिमेकडील धारावी आठवली. ही धारावी म्हणजे "धारावी देवी"चं स्थान!
+👇
इथे देवीला कोंबड्या, बकरे इ.चा नैवेद्य चढविला जातो. अर्थात बळी दिला जातो. या धारावीला लागूनच डोंगरी आहे. इथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा, केशवसृष्टी, रामरतन विद्यामंदिर, असं बरंच काही आहे. या शहराची महानगरपालिका (MBMC) व महापौर भाजपचा आहे.
+👇
तेव्हा कालपासून गाजत असलेलं "धारावी" हे ठिकाण बहुतेक इथलं असू शकतं.😄 नामसार्धम्यामुळे असं झालं असावं. नीट खात्री करुन घ्यावी. उगीच कोरोना काळात श्रेयवादाच्या लढाईवरुन वादंग नको.😉😝 तर सांगायची गोष्ट अशी, की भाईंदर शहरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे.
+👇
जुन्या मुंबईतील कामगारबहुल भाग आणि आत्ताच्या मुंबईचा एक श्रीमंत भाग म्हणजे लालबाग! बस, रेल्वे, मोनोरेल मार्गे पश्चिमेकडे कुलाब्यापासून दहिसर व पूर्वेकडे मुलुंडपर्यंत जोडला गेलेला हा विभाग म्हणजे गणेशोत्सवाची पंढरीच जणू!
+👇
अनेक नामांकित गणेशोत्सव मंडळांची इथे मांदियाळी! पैकी गणेश गल्ली, लालबागचा राजा व चिंचपोकळी (चिंतामणी) ही तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सगळ्यात जास्त प्रसिद्ध! यातही पुन्हा लालबागचा राजा हा मानबिंदू! लालबागमध्ये पारशी लोकांची "हिल्ला टाॅवर" व अग्यारी देखील तितकीच ख्यातनाम!
+👇
थोडक्यात सांगायचं, तर लालबाग बहुभाषिक सुध्दा आहे. अशा या लालबागमध्ये शिवसेनेच्या उदयापूर्वी काॅम्रेड कृष्णा देसाई व त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीची निरंकुश सत्ता होती. सेनेच्या उदयानंतर कृष्णा देसाईंची हत्या झाली आणि ही संधी समजून, बाळासाहेबांनी याठिकाणी मराठीची तुतारी फुंकली.
#LalbaugchaRaja स्वातंत्र्योत्तर काळापूर्वीपासून लालबागच्या बाजारातील व्यापारी व मासळी बाजारातील कोळी भगिनींनी मिळून हा गणेशोत्सव सुरु केला. आजही गणपतीच्या मिरवणुकीत या दोन वर्गांना महत्त्वाचं स्थान असतं. २००२ पूर्वीपर्यंत ह्या गणपतीचं दर्शन सहजसोपं होतं.
+👇
किंबहुना कुठलेही पडदे वा कनाती लावून इथलं गणेश दर्शन बंदिस्त केलं गेलं नव्हतं. परंतु २००३ नंतरच्या काळात या भागातील चाळींचं प्रचंड मोठ्या प्रमाणात पुर्नविकासाचं काम मोठमोठ्या विकासकांनी हाती घेतलं आणि इथे गगनचुंबी इमारती आकार घेऊ लागल्या. #LalbaugchaRaja
+👇
त्यामुळे इथल्या जागांना हिरेमाणकांचे भाव आले. मग इथला मूळ मुंबईकर गिरणी कामगार मध्यमवर्गीय मराठी समाज या जागा विकून रातोरात करोडपती झाला. दूरच्या पूर्व व पश्चिम उपनगरात मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. या कालावधीत इथे अमराठी लोकांचं प्राबल्य खूप वाढलं #LalbaugchaRaja
+👇
दोन वर्षांपूर्वी आर्थर रोड जेलमध्ये मंजुषा शेट्ये या महिला कैद्याला कोठडीतच इतर महिला कैद्यांसमोर अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यात ती दगावली. त्यावेळी चार महिला पोलीस कर्मचारी व एका फायरब्रँड महिला जेलरचं नाव संशयाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. आज जे चेन्नईत झालंय, तेच होतं.
+👇
त्यावेळी याविरुद्ध इतर महिला कैद्यांनी जेलच्या गच्चीत येऊन रस्त्यांवरुन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आवाज उठविला होता. तेव्हा हे प्रकरण खूप गाजलं होतं. त्यावेळी त्या महिला कैद्यांचं नेतृत्व, शीना बोरा प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी करत होती.
+👇
म्हणून त्याकडे काहीसं तुच्छतेने पाहिलं गेलं. माध्यमांनी प्रकरण बऱ्यापैकी तापवलं. त्या महिला पोलिसांचं निलंबन, जेलरची बदली, चौकशी आयोग आणि न्यायालयीन खटला, यापलिकडे सदर केसमध्ये काय प्रगती झाली ते गुलदस्त्यातच राहिलं.
+👇