... माझा एक वर्गमित्र आयुर्वेदिक डॉक्टर झाला... चांगली नाडी परीक्षा आहे... औषधे पण लागू पडतात... नेहमी गप्पा मारताना आयुर्वेदाची महती सांगतो... कावीळ या रोगावर ॲलोपॅथीत औषध नाही... आयुर्वेदात हमखास औषध आहे हे अभिमानाने सांगतो... अनेक आजार आयुर्वेदाने समूळ बरे करता
+
येतात असा त्याचा ठाम दावा असतो... त्याची तो रुग्णांच्या नावानिशी उदाहरणे देखील देतो... ॲलोपॅथीत या रोगांची लक्षणे तात्पुरती शमवली जातात असा त्याचा ठाम दावा असतो...
... एकदा मी त्याला सहज एखादा स्वस्त सुंदर टिकाऊ आयुर्वेदिक इलाज सुचव म्हणून मस्करीत विचारले... तो म्हणाला... तुला
+
कधी पार्टीत जेवण जास्त झाले आणि आता आपल्याला अपचन होणार असे जर वाटत असेल तर... दोन मोठे ग्लास उसाचा रस पिऊन बघ... दोन्ही ग्लास लागोपाठ प्यायचे... खाल्लेले अन्न तर पचतेच पण चार सहा तासांनी परत चुरचुरून भूकही लागते... मी दोन चार वेळा हा प्रयोग करून बघितला... अनुभव खूप चांगला आहे...
अगदी त्याने सांगितल्याप्रमाणे जेवलेलं तर जिरतच पण परत चांगली भूकही लागते... आपणही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही...
... आयुर्वेद हे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेलं अमुल्य धन आहे... त्यावर अधिक संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधाराने औषधे तयार केली गेली तर आपण त्याचं स्वागत
करायला हवं... कारण एक कोणतेही दुष्परिणाम नसलेले, गोरगरिबांनाही आर्थिकदृष्ट्या परवडणारे, देशाच्या जनतेला सहज उपलब्ध होणारे व रोग समूळ उखडून काढणाऱ्या उपचार पद्धतीचे दालन आपल्यासाठी अखिल मानव जातीसाठी खुले होणार आहे...
... असाच एक यशस्वी प्रयोग या देशात पतंजली या नावाने बाबा रामदेव
यांनी केला आहे... आयुर्वेदावर आधारित टूथपेस्ट, साबणापासून विविध रोगांवरच्या औषधांपर्यंत पतंजलीने आयुर्वेदाचा ठोस प्रसार केला आहे... कोरोना रोगावर त्यांनी कोरोनील हे आपले औषध आणले... सर्वांनी नाही तरी अनेकांनी त्याचा फायदा घेतला... अनुभवांती ती एक चांगली उपचार पद्धती असल्याचे
+
देशाने स्वीकारले आहे... कोणतीच उपचार पद्धती १००% रुग्णांना लागू होत नाही... फायदेशीर ठरत नाही आणि प्राणही वाचू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे... आर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपथिक औषध घेऊन आपल्याला कोरोनाची लागण झाली नाही असे सांगणारे हजारो समाज बांधव आपल्याला भेटतील...
... रामदेव बाबा
भगवी कफनी घालतात... योगाचा प्रसार करतात... आयुर्वेदाचा प्रसार करतात... याचा अर्थ ते भाजपचे एजंट आहेत... या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून आणि द्वेषातून महाराष्ट्र सरकारने पतंजलीच्या कोरोनीलवर महाराष्ट्रात बंदी घातलेली आहे... देशातील लाखो लोकांनी घेतलेल्या कोरोनिलच्या फायद्यापासून
महाराष्ट्राची जनता वंचित राहिली आहे...
आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालू शकत नाही... कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या सरकारी यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत...
+
WHO ला मार्गदर्शन करण्याच्या बाता घरच्याच वृत्तपत्राला घरच्याच संपादकाला दिलेल्या घरगुती मुलाखतीत मारायला ठीक आहेत...
पण वास्तव भयाण आहे... एका उद्योगपतीकडे पन्नास डॉक्टर्सची याचना करणाऱ्या दळभद्री महाराष्ट्र सरकारने कोरोनिल वरची बंदी ताबडतोब उठवावी...
+
ज्यांचा विश्वास असेल ते घेतील... ज्याच्या त्याच्या इच्छेवर, श्रद्धेवर सरकारने हा प्रश्न सोडून द्यावा... त्याला दुराग्रहाने हकनाक आडकाठी करू नये... प्रसंग बाका आहे... मिळेल त्या मार्गाने या जीवघेण्या रोगातून सुटका करून घेण्यातच शहाणपण आहे...
+
... अन्यथा आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी दयनीय अवस्था असलेली महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही...
निर्बंधांचे काटेकोर पालन न झाल्यास लॉकडाऊन चे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते.
त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की “उद्धवजी,समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब,स्थलांतरीत मजूर आणि छोट्या
+
उद्योजकांचं होतं.मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”
कालच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता आनंद
+
महिंद्रांना टोमणा दिला की “मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा
+
...एक राजा होता... त्याचं राज्य ऐसपैस होतं... मात्र राजा कधीही राजवाड्यातून बाहेर पडायचा नाही... पण सगळ्या राज्याची खबर ठेवायचा... राज्याची बित्तंबातमी मिळवण्याचा राजाने एक सोपा मार्ग अवलंबला होता... रोज राजाची दाढी करायला, केस कापायला, नखं कापायला एक नाभिक यायचा... राजा
त्या नाभिकाला राज्याची हालहवाल विचारायचा... नाभिकाचा हा कार्यक्रम रोज सकाळी साधारण तासभर चालायचा...
... ह्या नाभिकाची राजाकडे रोज सकाळी सकाळी उठबस असल्यामुळे... राज्यातले इतर मंत्री, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, उद्योगपती, व्यापारी हे नाभिकाला आपली हजामत करायला बोलवत...
+
त्यांचा हेतू हजामत करून घेण्यापेक्षा... राजाचा आज मूड कसा आहे, राजाला भेटायला कोण येणार आहे, राजाच्या डोक्यात पुढील योजना काय आहेत, राजा ुठे दौर्यावर जाणार आहे का... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजाच आपल्याबद्दल मत कसं आहे हे जाणून घेण्याचा असे... नाभिक आपल्या मगदुराप्रमाणे
+
... काँग्रेसची रचना ही साधारणत: मधमाशांच्या पोळ्यासारखी आहे... अनेक मधमाशा मध गोळा करत असतात... काही पोळं बांधत असतात... काही त्या पोळ्याचं रक्षण करत असतात... अशी अनेक कामे मधमाशांनी वाटून घेतलेली असतात... साधारणत: मधमाशांमध्ये कामगार माशा आणि सैनिक माशा अशी
+
ढोबळ मानाने वर्गवारी असते... कामगार माशा या अनेक प्रकारची श्रमाची कामे करत असतात आणि... सैनिक माश्या पोळ्याचं रक्षण करत असतात... मात्र सगळ्या मधमाशांचं ध्येय एकच असतं ते म्हणजे... "राणीमाशी"चे रक्षण...
... ज्या क्षणी राणीमाशीच्या जीवाला किंवा अस्तित्वाला धोका निर्माण होतो त्या
+
क्षणी... सैनिक माशा हल्ला करणाऱ्यावर जीवाच्या आकांताने तुटून पडतात... डंख मारून आक्रमकाला पार नामोहरम करतात... जर सैनिक माशांची ताकद कमी पडते आहे असे वाटले तर... कामगार माशा आपली भूमिका बदलून सैनिक माशा होतात... "डंख" हे निसर्गाने मधमाशांना प्रदान केलेले एक अमोघ अस्त्र आहे...
+
पत्रास कारण की काल आपल्या लाइव्ह कार्यक्रमात "डॉक्टर आणि नर्सेस कुठून आणायच्या?" या तुमच्या हाताशेमुळे मी मनापासुन व्यथित झालो आहे. तेरा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने एवढे अगतिक व्हावे हे माझ्या
+
मनाला पटलं नाही म्हणून हा पत्रप्रपंच.
माझ्या कुवती प्रमाणे या समस्येवर तोडगा सुचवण्यापूर्वी एकच विचारावसं वाटतं की कोरोना काळात मनुष्यबळाची कमतरता जाणवल्यामुळे न्यायालयायाच्या आदेशाने निलंबित असलेले पोलिस अधिकारी सचिन वाजे आपण सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण परत पोलीस
+
दलात घेतलेत, विधीमंडळात सचिन वाजेवर आरोप झाल्यानंतर त्यांची पाठराखण केलीत... अगदी त्याच न्यायाने आपल्याला डॉक्टर आणि नर्स ही उपलब्ध झाले असते हे आपल्याला सुचलं कसं नाही
कुशल मनुष्यबळाची जर एवढीच कमतरता वाटत होती तर राज्यात नुकतेच सेवानिवृत्त झालेले डॉक्टर आणि नर्सेस यांना आवाहन
... अकबर बादशहाने एक पोपट पाळला होता... त्या पोपटाला बादशहा स्वतःच्या हाताने मिरची पेरू खायला घालायचा... त्याच्याशी गप्पा मारायचा... बादशहाचा हा अत्यंत लाडका पोपट होता... त्या पोपटाच्या देखभालीसाठी अकबराने एक खास नोकर ठेवला होता... एक दिवस बादशहाने जाहीर केलं... हा पोपट
+
मेल्याची जो बातमी घेऊन येईल त्याचा मी शिरच्छेद करीन...
... निसर्ग नियमाने काही वर्षांनी तो पोपट मेला... नोकराचा थरकाप उडाला... पोपट मेल्याची बातमी अकबर बादशहाला जाऊन सांगितली तर तो आपला शिरच्छेद करेल... नोकराने धावत जाऊन बिरबलाचे पाय धरले आणि... पोपट मेल्याची बातमी अकबर बादशहाला
सांगण्याची विनंती केली...
... बिरबलच तो... त्याने बादशहाला सांगायला सुरुवात केली... खावींद.... आपला पोपट सकाळ पासून डोळे उघडत नाहीये... पाणी पीत नाही... अकबर बादशहाने बिरबलाला विचारले म्हणजे नेमकं काय झालंय.... बिरबल म्हणाला... माहित नाही मालक... पण आपला पोपट आज मिरची पेरू खात
+
...१९६२ च्या चीन युद्धात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला होता... चीनने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली होती... पंडित नेहरू यांचे निधन झाले होते... एक लहान मूर्तीचा, गांधी टोपी घालणारा, धोतर नेसणारा, आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेचे कोणतेही वलय नसलेला लाल बहादुर शास्त्री नावाचा
+
काँग्रेसवाला भारताचा पंतप्रधान झाला होता... चीन युद्धात पराभव झाल्यामुळे मनाने खचलेली भारतीय सेना आणि भारताचे नेतृत्व आपल्याशी काय युद्ध करणार... हीच वेळ आहे भारताला ठेचण्याची अशी दुर्बुद्धी पाकिस्तानला झाली आणि... १९६५ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं...
... पाकिस्तानी
+
राज्यकर्त्यांचा भारताच्या पंतप्रधानांबद्दलचा अंदाज साफ चुकला... युद्धाचा इतिहास व शेवट आपण सगळे जाणताच त्यामुळे... तो सांगण्याच्या विस्तारात जात नाही पण... देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी युद्धकाळात भारतीय जनतेला आठवड्यातून एक दिवस एक वेळ उपवास करण्याचे आवाहन केले...
+