ब्राह्मणांना सध्या बरे दिवस आलेत !
ममता दीदींनी आपला सेक्युलरीझम बाजूला ठेवून नुकतंच स्वत:ला शांडिल्य गोत्री हिंदू ब्राह्मण म्हणून जाहीर करून टाकलं. त्यावरून आठवलं. फार वर्षांपूर्वी अब्दुल रेहमान अंतुले ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली
होती; की 'मी मूळचा चित्तपावन ब्राह्मण असून माझं मूळ आडनांव करंदीकर!' आता इतक्या वर्षांनी परवा फारूख अब्दुल्लाही म्हणाले, "आम्ही तीन पिढ्यांपूर्वीचे काश्मिरी पंडितच !" राहुल गांधी यांनी तर गेल्या निवडणुकांच्या वेळीच आपण 'जानवेधारी ब्राह्मण' असल्याचा दावा केला होता.
दरम्यान गेल्या महिन्यात ओवेसीही मूळचे ब्राह्मणच असल्याची बातमी झळकली होती; पण ती खरी की खोटी हे कळलं नव्हतं. तेवढ्यात आजच्या 'लोकसत्ता' मध्ये माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांनीही सांगून टाकलंय, की 'चारशे वर्षांपूर्वी आम्ही चित्तपावन ब्राम्हण होतो व ब्राह्मणी पद्धतीनेच आजही
राहतो!' (हे कळल्यावर परमवीर प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे सोपवायला पवार तयार झाले असते काय हा प्रश्न पडतो.) याच अंकात सरस्वती सन्मान विजेते दलित लेखक शरणकुमार लिंबाळे यांनीही 'आपले सर्व प्रकाशक व अनुवादक ब्राह्मणच असल्या'चं आवर्जून सांगितलंय.
एकंदरीत ब्राम्हणांविषयी बरं बोलण्याचे किंवा स्वत: मूळ ब्राह्मण असल्याचं जाहीर करण्याचे दिवस हल्ली आलेले दिसतात. आता फक्त प्रकाश आंबेडकरच काय ते उरले आहेत. आपण मूळचे ब्राह्मण असल्याचं उद्या त्यांनी जाहीर केलं तर नवल वाटायला नको. (तशीही त्यांची पत्नी ब्राह्मणच आहे!)
#WA

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with रश्मी वैद्य सराफ

रश्मी वैद्य सराफ Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rashmi_shrikant

13 Nov 20
*Humility and Humbleness...*

Cricketer Rahul Dravid was awarded with a Doctorate degree by the University of Bangalore, which Rahul Dravid gracefully returned.

Not only did he give back the degree, but he also gave a wonderful speech, he said "My wife is a doctor, she has
spent countless sleepless nights and days to get this degree... My mother is a professor of arts, she has waited a long fifty years for her degree with perseverance... I worked hard to play cricket, but I didn't study that much, so how come I accept this degree?"
Einstein was offered the Prime Ministership by the Israeli government in 1952. Einstein politely said, “I am an inexperienced student of physics. What do I understand about the governance and administration of a state...?”
Read 8 tweets
9 Nov 20
#दिवाळीचा_फराळ_आणि_आयुर्वेद
छान आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली आहे. आणि त्यात आता सगळ्यांना दिवाळीचे वेध लागले आहेत. घरोघरी दिवाळीचे फराळाचे पदार्थ तयार करणे सुरू झाले आहे. या दिवाळी फराळाबद्दल आयुर्वेद काय सांगतो ते बघू या.
या काळात शरीरातील तिन्ही दोष (कफ वात पित्त) Image
समप्रमाणात असतात. जठराग्नी प्रदीप्त असतो. "खाल ते पचवाल" अशी स्थिती असते. यावेळी पचण्यास जड असा आहार दिला गेला नाही तर वाढलेला जठराग्नी शरीरधातूंचेच पचन करण्याची शक्यता असते व त्यामुळे दौर्बल्य येऊ शकते. या दिवसांत स्निग्ध,मधुर,आंबट तसेच तेला तुपात तळलेले
पदार्थ खाणे आवश्यक असते म्हणून दिवाळीत लाडू, करंज्या,शेव,चकली, चिरोटे,अनारसे,चिवडा इ. पचण्यास जाड पण अतिशय रुचकर पदार्थ केले जातात.

त्यामुळे मित्रांनो, छान दिवाळीची मजा लुटा, बिनधास्तपणे फराळाचे पदार्थ झोडा! ( चावून चावून खाणे व भरपूर व्यायाम करणे मात्र विसरू नका)
Read 4 tweets
30 Sep 20
*महाभारतातील सुरस कथा*
*कच- देवयानी*
कच हा देवगुरू बृहस्पतिंचा पुत्र.संजीवनी विद्या शिकण्यासाठी दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे गेला.त्यांना आपल्या येण्याचं खरं खरं कारण सांगितलं( गुरूंपासून कधीही काहीही लपवू नये कर्णासारखं). शिष्यभाव पत्करून आलेल्यास विद्यादान करणं हे गुरूंचं कर्तव्य
असल्यामुळे शत्रुपक्षाचा असूनही शुक्राचार्य तयार झाले. "तुला वर्षभर येथे राहावे लागेल" असे त्यांनी त्यास सांगितले. तो राहू लागला.त्याचे शिक्षण सुरू झाले. तो स्वर्गातून आला होता, संगीत विद्येत निपुण होता. शुक्राचार्य म्हणाले,"माझी पुत्री देवयानी हिला तू संगीत शिकव". तो तिला संगीत
शिकवू लागला. ती त्याच्यावर भाळली, प्रेम करू लागली. त्याला गोसेवेचेही काम गुरूंनी दिले होते. तो रोज जंगलात गायी चरायला नेत असे. आपल्या शत्रूला आपल्या गुरूंनी संजीवनी विद्या शिकवावी ही बाब दैत्यांना रुचली नाही.तो एकदा गायी घेऊन जंगलात गेला असता दैत्यांनी त्याला मारून टाकले
Read 10 tweets
30 Sep 20
*सुदर्शनजी आणि मी*
नुकतीच (१५ सप्टेंबर) रा.स्व.संघाचे ५वे सरसंघचालक यांची ८ वी पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने एक आठवण ..
९२-९३ सालची गोष्ट.आम्ही अमरावतीला होतो.श्रीकृष्ण पेठ या भागात वरच्या मजल्यावरचं एक मोठ्ठं घर आम्हाला क्वार्टर म्हणून मिळालं होतं.तो भाग खास काँग्रेसचा गड!
तिथे माझा दादा जो त्यावेळी ११-१२वित होता त्याने बाल संघ शाखा सुरू केली आणि भरपूर संख्येत मुलं जामवण्यात त्याला यश आले होते. त्या गोष्टीचं संघातील सगळ्यांनाच कौतुक होतं. त्यावर्षी अमरावतीत संघाचा काही कार्यक्रम होता.त्यासाठी सुदर्शनजी जे तेव्हा अखिल भारतीय शारीरिक शिक्षा प्रमुख
होते( बहुतेक)ते येणार होते.त्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या घरी करण्यात आली.घरात नुसती गडबड उडाली होती.मी मात्र तो ३१डिसेंबरचा दिवस असल्यामुळे मला रात्रीचा दूरदर्शनवरील मनोरंजनाचा कार्यक्रम पाहता येणार नाही या दुःखात होते!
ते ३१ला दुपारी आले.आईने औक्षण वगैरे करून त्यांचे स्वागत
Read 8 tweets
25 Sep 20
*अब्बक्का महादेवी*
मंगलोरपासून सुमारे १२-१४ किमी अंतरावर असलेलं एक छोटंसं संस्थान"उल्लाळ". तिथली राणी होती अत्यंत शूर व धाडसी *हिरिया (थोरली) अबक्का चौटा*!
सोळाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांच्या वसाहतवादी शक्ती बळावल्या होत्या. त्यांनी कालिकत, दिव-दमण बेटे,मुंबई व गोवा काबीज १/७
केले .पुढे त्यांनी मोर्चा वळविला मंगलोर कडे. त्यांना ते फार सहज हस्तगत होईल असे वाटले होते पण राणी अब्बकाने त्यांना प्रखर लढा दिला. जवळपास पुढील ४० वर्षे ती त्यांचे हल्ले यशस्वीपणे परतवून लावत राहिली.पण अखेर ती पराजित झाली आणि तिला खंडणी आणि जाचक अटी मान्य कराव्या लागल्या. पण २/७
आपले स्वातंत्र्य गमावल्याची खंत तिला अखेरपर्यंत राहिली.
तिची मुलगी *अब्बक्का महादेवी* हिने आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. तिने सिंहासनावर बसताच पोर्तुगिजांना खंडणी देणे बंद करून टाकले. तिच्या या धाडसाचे आजूबाजूच्या संस्थानिकांनीच काय परंतु खुद्द तिच्या ३/७
Read 8 tweets
8 Jul 20
Dr. Dhananjay Kelkar, M.D. Deenanath Mangeshkar hospital, Pune answering questions on the yogic practice of "जलनेति". He claims "जलनेति" to be an extremely effective "precautionary measure" against Chinese virus infection.
Watch full video 👇
Those who know this "Shuddhi kriya" are advised to do it twice everyday. It's very simple!! Here , he explains it 👇
Don't rush watch full video first.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!