#दिवाळीचा_फराळ_आणि_आयुर्वेद
छान आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली आहे. आणि त्यात आता सगळ्यांना दिवाळीचे वेध लागले आहेत. घरोघरी दिवाळीचे फराळाचे पदार्थ तयार करणे सुरू झाले आहे. या दिवाळी फराळाबद्दल आयुर्वेद काय सांगतो ते बघू या.
या काळात शरीरातील तिन्ही दोष (कफ वात पित्त) Image
समप्रमाणात असतात. जठराग्नी प्रदीप्त असतो. "खाल ते पचवाल" अशी स्थिती असते. यावेळी पचण्यास जड असा आहार दिला गेला नाही तर वाढलेला जठराग्नी शरीरधातूंचेच पचन करण्याची शक्यता असते व त्यामुळे दौर्बल्य येऊ शकते. या दिवसांत स्निग्ध,मधुर,आंबट तसेच तेला तुपात तळलेले
पदार्थ खाणे आवश्यक असते म्हणून दिवाळीत लाडू, करंज्या,शेव,चकली, चिरोटे,अनारसे,चिवडा इ. पचण्यास जाड पण अतिशय रुचकर पदार्थ केले जातात.

त्यामुळे मित्रांनो, छान दिवाळीची मजा लुटा, बिनधास्तपणे फराळाचे पदार्थ झोडा! ( चावून चावून खाणे व भरपूर व्यायाम करणे मात्र विसरू नका)
संदर्भ - "आपले सण आणि आयुर्वेद"
प्रा. वैद्य य. गो.जोशी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rashmi Vaidya Saraf

Rashmi Vaidya Saraf Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rashmi_shrikant

30 Sep
*महाभारतातील सुरस कथा*
*कच- देवयानी*
कच हा देवगुरू बृहस्पतिंचा पुत्र.संजीवनी विद्या शिकण्यासाठी दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे गेला.त्यांना आपल्या येण्याचं खरं खरं कारण सांगितलं( गुरूंपासून कधीही काहीही लपवू नये कर्णासारखं). शिष्यभाव पत्करून आलेल्यास विद्यादान करणं हे गुरूंचं कर्तव्य
असल्यामुळे शत्रुपक्षाचा असूनही शुक्राचार्य तयार झाले. "तुला वर्षभर येथे राहावे लागेल" असे त्यांनी त्यास सांगितले. तो राहू लागला.त्याचे शिक्षण सुरू झाले. तो स्वर्गातून आला होता, संगीत विद्येत निपुण होता. शुक्राचार्य म्हणाले,"माझी पुत्री देवयानी हिला तू संगीत शिकव". तो तिला संगीत
शिकवू लागला. ती त्याच्यावर भाळली, प्रेम करू लागली. त्याला गोसेवेचेही काम गुरूंनी दिले होते. तो रोज जंगलात गायी चरायला नेत असे. आपल्या शत्रूला आपल्या गुरूंनी संजीवनी विद्या शिकवावी ही बाब दैत्यांना रुचली नाही.तो एकदा गायी घेऊन जंगलात गेला असता दैत्यांनी त्याला मारून टाकले
Read 10 tweets
30 Sep
*सुदर्शनजी आणि मी*
नुकतीच (१५ सप्टेंबर) रा.स्व.संघाचे ५वे सरसंघचालक यांची ८ वी पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने एक आठवण ..
९२-९३ सालची गोष्ट.आम्ही अमरावतीला होतो.श्रीकृष्ण पेठ या भागात वरच्या मजल्यावरचं एक मोठ्ठं घर आम्हाला क्वार्टर म्हणून मिळालं होतं.तो भाग खास काँग्रेसचा गड!
तिथे माझा दादा जो त्यावेळी ११-१२वित होता त्याने बाल संघ शाखा सुरू केली आणि भरपूर संख्येत मुलं जामवण्यात त्याला यश आले होते. त्या गोष्टीचं संघातील सगळ्यांनाच कौतुक होतं. त्यावर्षी अमरावतीत संघाचा काही कार्यक्रम होता.त्यासाठी सुदर्शनजी जे तेव्हा अखिल भारतीय शारीरिक शिक्षा प्रमुख
होते( बहुतेक)ते येणार होते.त्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या घरी करण्यात आली.घरात नुसती गडबड उडाली होती.मी मात्र तो ३१डिसेंबरचा दिवस असल्यामुळे मला रात्रीचा दूरदर्शनवरील मनोरंजनाचा कार्यक्रम पाहता येणार नाही या दुःखात होते!
ते ३१ला दुपारी आले.आईने औक्षण वगैरे करून त्यांचे स्वागत
Read 8 tweets
25 Sep
*अब्बक्का महादेवी*
मंगलोरपासून सुमारे १२-१४ किमी अंतरावर असलेलं एक छोटंसं संस्थान"उल्लाळ". तिथली राणी होती अत्यंत शूर व धाडसी *हिरिया (थोरली) अबक्का चौटा*!
सोळाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांच्या वसाहतवादी शक्ती बळावल्या होत्या. त्यांनी कालिकत, दिव-दमण बेटे,मुंबई व गोवा काबीज १/७
केले .पुढे त्यांनी मोर्चा वळविला मंगलोर कडे. त्यांना ते फार सहज हस्तगत होईल असे वाटले होते पण राणी अब्बकाने त्यांना प्रखर लढा दिला. जवळपास पुढील ४० वर्षे ती त्यांचे हल्ले यशस्वीपणे परतवून लावत राहिली.पण अखेर ती पराजित झाली आणि तिला खंडणी आणि जाचक अटी मान्य कराव्या लागल्या. पण २/७
आपले स्वातंत्र्य गमावल्याची खंत तिला अखेरपर्यंत राहिली.
तिची मुलगी *अब्बक्का महादेवी* हिने आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. तिने सिंहासनावर बसताच पोर्तुगिजांना खंडणी देणे बंद करून टाकले. तिच्या या धाडसाचे आजूबाजूच्या संस्थानिकांनीच काय परंतु खुद्द तिच्या ३/७
Read 8 tweets
8 Jul
Dr. Dhananjay Kelkar, M.D. Deenanath Mangeshkar hospital, Pune answering questions on the yogic practice of "जलनेति". He claims "जलनेति" to be an extremely effective "precautionary measure" against Chinese virus infection.
Watch full video 👇
Those who know this "Shuddhi kriya" are advised to do it twice everyday. It's very simple!! Here , he explains it 👇
Don't rush watch full video first.
Read 4 tweets
21 Jun
#आंतर्राष्ट्रीय_योग_दिवस_2020
आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी माझे योगगुरू प. प.श्री.जनार्दन स्वामी यांचा व त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पू. स्वामीजी हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवठी या गावचे!
ते दशग्रंथी वैदिक ब्राह्मण होते. तसेच त्यांना आयुर्वेद व ज्योतिष या शास्त्रांचेही असाधारण ज्ञान होते. प्रथम पासूनच ते विरक्त होते.त्यांनी नर्मदा परिक्रमा करीत असताना संन्यास दीक्षा घेतली. सिद्धपूर येथे एका अज्ञात योग्याकडून शास्त्रोक्त योगविद्या शिकले व पुढे योग प्रचार व प्रसार
याच कार्याला त्यांनी वाहून घेतलं. अनेक रोगी योगोपचाराने बरे केले.
"शारीरिक व मानसिक आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत" असे ते म्हणत.त्यांनी योग प्रचार व प्रसारासाठी भारतभर भ्रमण केले.ते शाळांमधून योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवत, विद्यार्थ्यांना योगाभ्यासासाठी प्रेरित करत.
Read 11 tweets
30 Apr
#thread
एक खूप सुंदर गोष्ट - *दान*
सनातन वैदिक हिंदू धर्मात दानाचे अत्यंत महत्त्व वर्णन केले आहे.हे एक असे पुण्यकर्म आहे ज्याचे फळ तत्काळ मिळते.
वैशाखात भर मध्यान्ही एकदा महाकवी कालिदास पायीच रस्त्याने काही अगत्याच्या कामाने निघाले होते. त्यांना राजा भोजाने पालखीचा मान दिला
असूनही ते पायी निघाले होते. त्यांना रस्त्याने जाताना एक म्हातारा माणूस अनवाणीच जाताना दिसला. ऊन खूप होते. त्यांना त्याची दया आली. त्यांनी विचारले , "बाबा, एव्हढ्या उन्हात असे अनवाणीच कुठे निघालात?" तो म्हातारा म्हणाला,"माझ्याकडे चपला नाहीत". कालिदासांनी लगेच आपल्या चपला काढून
त्याला दिल्या. तो अत्यंत समाधानाने आशीर्वाद पुटपुटत निघून गेला. हे समोर निघाले. समोरून राजाच्या हत्तीला नदीवर आंघोळ घालून परतत असलेल्या माहुताने त्यांना येताना बघितले. त्याने त्यांना ओळखून हत्तीवर बसण्याची विनंती केली. ते हत्तीवरील अंबारीत येऊन बसले व
पुढे निघाले.
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!