दिनकरराव जवळकर आणि र. धो कर्वेंच्या वादग्रस्त खटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवलेल्या तिसर्या खटल्याबाबत खूपच कमी जणांना ठाऊक आहे. तर खटला चालला होता फिलीप स्प्रॅट या ब्रिटिश लेखकावर! फिलीप स्प्रॅट ( २६ सप्टेंबर १९०२ - ८ मार्च १९७१ ) हा ब्रिटिश लेखक होता. (1/11)
फिलीप हा कम्युनिस्ट होता, फिलीपला ब्रिटिश आर्म ऑफ कम्युनिस्ट इंटरनॅशनल ने भारत आणि मॉस्को येथे कम्युनिझमचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलं होतं. फिलीप हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक मनबेंद्रनाथ रॉय यांचे मित्र आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सभासद होते. (2/11)
भारतीय कम्युनिस्ट चळवळीत चैतन्य उत्पन्न करण्यासाठी ते भारतात आले. फिलीप स्प्रॅट यांनी 'इंडिया अँड चायना' या मथळ्याखाली 'नॅशनल हेरॉल्ड' मधुन लेख लिहीण्याचं कार्य केलं. या लेखांचं संपादन 'क्रांती' या नियतकालिकाचे संपादक श्री मिरजकर यांनी प्रसिद्ध केलं होतं. (3/11)
लंडन पार्लमेंटचे सदस्य 'शापूरजी सकलातवाला' यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. ब्रिटिश सरकार हे कम्युनिस्टविरोधी होतं त्यामुळे 'इंडिया अँड चायना' या पुस्तकावर फिलीप स्प्रॅटचं नाव न छापता 'By An Internationalist' असं टोपणनाव छापण्यात आलं. (4/11)
१९२७ च्या २४ जानेवारी पासून ते २ फेब्रुवारी या कालावधीत लिहील्या गेलेल्या लेखांच 'इंडिया अँड चायना' हे पुस्तक होतं. मुंबईतील कामगार वस्तीत राहुन जिद्दीने आणि ध्येयाने काम करणारे फिलीप स्प्रॅट हे केंब्रिज विद्यापीठाचे दुहेरी पदवीधर होऊन गेले होते. (5/11)
अर्थातच ब्रिटीश सरकारचा कम्युनिझम ला विरोध असल्या कारणाने, सरकारने या पुस्तकावर खटला दाखल केला. ब्रिटिश सरकारने या पुस्तकाच्या १३ प्रती जप्त केल्या. न्यायाधीश फॉसेट यांच्या न्यायालयात २८ नोव्हेंबर १९२७ रोजी त्यावेळी फिलीप यांचं वय फक्त २५ वर्षे इतकंच होतं. (6/11)
आणि त्यावेळी फिलीप स्प्रॅट यांचं वकीलपत्र होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सहकारी श्री भुलाभाई देसाई यांच्याकडे. एक २५ वर्षीय ब्रिटीश कम्युनिस्ट कामगारांच्या प्रश्नासाठी चळवळ आणि आपल्या लेखांतून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय असा युक्तिवाद डॉ. (7/11)
बाबासाहेब आंबेडकर आणि देसाई यांनी न्यायाधीश फॉसेट यांच्या समोर केला. सामाजिक परिवर्तनाचा युक्तिवाद साधत बाबासाहेबांनी ह्या खटल्याचा निर्णायक निकाल आपल्या बाजूने जिंकला. या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी भरगच्च गर्दी झाली होती. (8/11)
१५ सप्टेंबर १९२७ रोजी अटक झालेले फिलीप २८ नोव्हेंबर १९२७ रोजी निर्दोष मुक्त झाले. निर्दोष मुक्त झाल्यानंतर फिलीप स्प्रॅट यांनी सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि श्री देसाई या दोघांचेही आभार मानले. (9/11)
तर बाबासाहेबांच्या जीवनात असे तीन वादग्रस्त न्यायालयीन खटले होते आणि ते लढतेवेळी बाबांनी जयपराजयाची तमा बाळगली नव्हती. या तिन्ही खटल्यातून एक कार्यक्षम आणि विद्वान वकिल म्हणून डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिभेचं दर्शन घडतं. (10/11)