ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांच्या घरात कोणाला डायबिटीस आहे अशा सर्वांना एक कळकळीची विनंती, कोरोनाला हलक्यात घेऊ नका. डायबिटीस असलेल्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्वरित आणि योग्य उपचाराने तो कमी होतो. त्यानंतर पोस्ट कोविड काही आजार मात्र होण्याची दाट शक्यता आहे.
त्यापैकी म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन अतिशय घातक आहे. कोरोना झालेल्या डायबेटिक व्यक्तीला जर चेहऱ्यावर सूज आली असेल तर एका दिवसाचा ही वेळ न घालवता त्वरित उपचार सुरू करा. हे इन्फेक्शन सुरुवातीला डोळ्यांच्या खाली, नाकात होतं आणि तिथून मग जलद गतीने प्रसार होतो. ह्यात दृष्टी जाणे
मेंदूकडे इन्फेक्शन झाले तर स्ट्रोक्स येणे असे गंभीर परिणाम होऊ शकतात. मेंदूला संसर्ग झाला तर प्रसंगी जीवही गमवावा लागू शकतो. सध्या माझ्या घरात एक रुग्ण ह्याने ग्रासलेला आहे. म्हणून पोट तिडकिने सांगतोय काळजी घ्या. फंगल इन्फेक्शनचे निदान झाले तर एकही दिवस न घालवता त्वरित उपचार सुरू
करा. आणि मुख्य म्हणजे जर रुग्ण कोरोना positive असेल तर कुठलाही दवाखाना उपचार करण्यास तयार होत नाहीय. शिवाय अँटी फंगल इंजेक्शन पण खूप महाग असतात. मग उपचाराविना संसर्ग वाढत जातो. ह्यासाठी सर्वात चांगले हेच राहील की आधीच कोरोनाची बाधा होऊ न देणे!
काळजी घ्या मित्रांनो. 🙏
डोळ्यातून वारंवार पाणी येणे, नाकातून स्त्राव येणे ही सुरुवातीची लक्षणे आहेत. ह्याकडे दुर्लक्ष करू नका. 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
" माझे सोन्यासारखे बाबा गेले रे..."
मित्राच्या तोंडून हे शब्द ऐकून आलेला राग कोणावर काढू? स्वतःला दोष देऊ की मी त्याची काहीच मदत करू शकलो नाही? का विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ज्यांच्यामुळे कोरोना पसरतो आहे? का आजवरच्या सर्व सत्ताधाऱ्यांना ज्यांनी पुरेशा वैद्यकीय सुविधा उभारल्या
नाहीत? का नागरिकांना ज्यांनी कधी दवाखाना, वैद्यकीय संशोधन केंद्रे ह्यासाठी कधी आंदोलने केलीच नाही? आपल्या जातीच्या महापुरुषांचा पुतळा उभारावा म्हणून प्रत्येक जातीने आंदोलने केली. पण एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे म्हणून कधी कोणी आंदोलन केले नाही. त्या फ्रान्स च्या
राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात आमच्याकडे आंदोलन झाले. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून. पाकिस्तानी हिंदूंना देशाचे नागरिकत्व द्यायचे का नाही ह्यावरून आपले लोक एकमेकांविरोधात उभे राहिले! पण मजाल कोणाची कोणी प्रत्येक जिल्हा- तालुक्यातील लोकांची सोय होईल असे इस्पितळ व्हावे म्हणून
सारखेच कंटेंट असलेले एकच औषध वेगवेगळ्या कंपन्या बनवतात. मग कंपनी बदलली की त्या औषधाची किंमत बदलते. काही कंपन्यांचे औषध 100रू ला असेल तर तेच औषध एखादी कंपनी 1000 रू ला विकते. मग डॉक्टरांनी आपल्या कंपनीचे औषध प्रिस्क्रीप्शन वर लिहून द्यावे यासाठी ह्या कंपन्या डॉक्टरांना विविध
भेटवस्तू, फॉरेन ट्रीप, ई. प्रलोभने देत असतात. एवढेच काय मागे ह्या गिफ्टच्या बदल्यात शरीरसुखासाठी मुलींची मागणी करणाऱ्या एका डॉक्टरला बेड्या ठोकल्या पोलिसांनी! अशी एकदम व्यवस्थित सामन्यांची पिळवणूक सुरू असते.
काही देशांमध्ये डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन वर औषधाच्या कंपनीचे नाव
लिहायला मनाई आहे. डॉक्टरांनी फक्त औषधांचे कंटेंट लिहायचे. मग रुग्णाला ते कंटेंट असणारे औषध ज्या कंपनीचे परवडेल तो ते घेईल. डॉक्टर फार्मा कंपन्यांचे प्रतिनिधी नसतात की ते त्या विशिष्ठ कंपनीचा फायदा व्हावा म्हणून त्यांचीच औषधे लिहून देतील. हा विचार असावा बहुधा त्यामागे.