विभाग नियंत्रण कक्ष- रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत स्त्रोत
बृहन्मुंबई महानगरपालिकेशी थेट संबंध नसलेले, परंतु रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणाऱ्या नागरिकांनी देखील विभाग नियंत्रण कक्षाशीच संपर्क साधावा.
नियम व निर्धारित प्रक्रियेनुसार कार्य करणे सर्वांच्याच हिताचे आहे.
केवळ एका हेल्पलाईन क्रमांकावर भार येऊ नये यासाठी रुग्णशय्या वितरण प्रणालीचे विकेंद्रीकरण करण्यात आले होते.
विभाग नियंत्रण कक्षाशी संपर्क न झाल्यास आपण १९१६ या मध्यवर्ती क्रमांकावर तक्रार करू शकता.
मात्र लक्षात असू द्या, फक्त आणि फक्त विभाग नियंत्रण कक्षाकडेच रुग्णशय्या वितरित करण्याचे अधिकार आहेत.
असे असले तरी, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, गंभीर रुग्णांसाठी, त्यांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असल्यास, महानगरपालिका/सरकारी/खासगी रुग्णालयात 'वॉक-इन बेड' ची विनंती करता येईल
तथापि, रुग्णालयाने रुग्णाची परिस्थिती तपासल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. विभाग नियंत्रण कक्षास तसे कळवून माहिती अद्यावत करणे आवश्यक असेल.
आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रुग्णशय्या रिक्त असतानाही त्या नाकारल्या जाण्याचे कोणतेही कारण नाही.
विभाग नियंत्रण कक्ष आपल्याला नक्की रुग्णशय्या उपलब्ध करून देईल.
अथवा, रुग्णशय्या रिक्त नसल्यास आपल्याला तसे सूचित करण्यात येईल. तसेच पर्यायी व्यवस्था किंवा रुग्णशय्या उपलब्ध होताच आपणास तातडीने कळवण्यात येईल.
आपणांस प्रियजनांची काळजी असणे स्वाभाविक आहे. मात्र आमची कुटुंबीयांना नम्र विनंती आहे की, कृपया एखाद्या रुग्णाला 'आयसीयू' ची आवश्यकता आहे किंवा नाही, याचा निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या.
'आयसीयू' सुविधा फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येते.
वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णाच्या घरी जाऊन डॉक्टरांनी योग्य तो सल्ला देण्याची सुविधा आता सुरू झाली आहे
रुग्णशय्येची गरज असलेले इतरही रुग्ण असल्यामुळे आपल्याला कदाचित काहीशी प्रतीक्षा करावी लागू शकते. मात्र रुग्णशय्या वितरणाचे सर्व अधिकार विभाग नियंत्रण कक्षाकडे प्रदान केलेले आहेत
त्यांच्या सेवेबद्दल आपण असमाधानी असल्यास आपण तक्रार नोंदवू शकता.
नागरिकांना नम्र विनंती आहे की, कृपया रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्त अधिकृत मार्गाव्यतिरिक्त इतर मार्गांचा अवलंब करू नये. अन्यथा त्यातून गोंधळ निर्माण होतो.
उपलब्ध रुग्णशय्या वितरित करत असताना आवश्यकतेनुसार रुग्ण शय्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आम्ही सतत करत आहोत.
कृपया नियमांचे पालन करून सहकार्य करा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
We appreciate concern of individuals & groups not related to BMC offering help to citizens tweeting to us, but citizens must know that even they will reach out to us to ask for beds. Please follow protocols in the interest of all
Bed allocation system was decentralised since a single helpline, with innumerable calls, could not have taken the load alone & it would only increase wait time for citizens. If a War Room does not respond as per need, escalate complaint to 1916. Only War Rooms can allocate beds.
#Mumbaikars , if stranded in the #MumbaiRains please follow this thread, for a list of shelters, you could make home till the water recedes. We will make sure you are taken good care of. #ThreadOfCare#AtMumbaisService
CSMT – Manhardas Municipal School , Borha Bazar, CSMT
Kurla – Kamagar nagar Municipal School, Kurla (E)
Moreshwar Patankar School, Pipe Road, Kurla (W)
Ghatkopar – Jay Maharashtra Ganesh maidan School, Ghatkopar (W) #ThreadOfCare
Pant Nagar School no 3, Ghatkopar (E)
Sainath Nagar Marathi School No 2, Ghatkopar (W)
KBarve Nagar Marathi School,Ghatkopar (W)
Chembur – Chembur Station Uppar Marathi School, Chembur (W)