खूप दिवस झालं याविषयी स्पष्टपणे बोलावं असं वाटायचं , पण ह्या आठवड्यात माझ्या काही ट्विटवर आलेले रिप्लाय पाहून लिहिणं बंधनकारकच झालं आहे, असं मला वाटलं म्हणून हा थ्रेड लिहिण्याचा केलेला प्रयत्न.
2/ झालं असं की, मी अगोदर साधूंच्या लंगोटचा मास्क म्हणून होणाऱ्या चेष्टेचा विरोध केला व त्यानंतर रामनवमीला प्रभु श्रीरामांचे काही व्यक्तीगुण सांगितले होते. यामुळे काही काँग्रेसी मित्रांनी आपण काँग्रेसी असल्याने आपण धर्मावर सार्वजनिकरित्या बोललंच नाही पाहिजे अशा सूचना मला केल्या.
3/ मला वाटलं की, हे अर्धवट अभ्यासू आहेत त्यामूळे कदाचित असं बोलत असतील .पण, दरवेळेस असं काही वेगळं लिहिलं की, मी ट्विटरवरील प्रसिध्द अशा काही "अभ्यासू" मित्रांना ते ट्विट पाठवत असतो व एरव्ही ते लगेच रिट्विट करतात , परंतु ह्यावेळेस बहुतांश जणांनी ते लाईक सुद्धा केलं नाही.
4/ हिंदूंबद्दल फक्त भाजपाने बोलावे आणि आपण धर्मनिरपेक्ष असल्याने धर्मापासून दूर रहावे, असे मत असणाऱ्या काँग्रेसी लोकांना ईथे सांगण्याची गरज भासते की, काँगेसची धर्मनिरपेक्षता म्हणजे काही नास्तिकवाद, निरीश्वरवाद किंवा अज्ञेयवाद नव्हे.
5/ त्यांना समजावून सांगण्याची दोन कारणे आहेत असं मला वाटतं.एक, हिंदु आणि हिंदुत्व यामधील फरक ह्या लोकांना करता येत नाही. दोन, धर्मनिरपेक्षता (secularism) हा शब्द वापरताना पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता यामध्ये फरक आहे, हेही कदाचित त्यांना माहिती नसावे.
6/ हिंदुत्व ही सावरकरांनी आणलेली संकल्पना पुढे आरएसएस/भाजपा हे वापरत आहेत. ह्यांचे हे हिंदूत्व हिंदू धर्मातील 'वसुधैव कुटुंबकम', अहिंसा , प्रेम अशा शिकवणी मानत नाही. याऊलट, आरएसएसच्या या हिंदुत्वाने द्वेषापोटी गांधीजींची हत्या केली आणि गोध्रा सारखे हत्याकांड घडवून आणले.
7/ ज्याप्रमाणे ISIS ची आतंकवादी विचारधारा म्हणजे मुस्लीम धर्म होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, RSS ची हिंदुत्वाची विचारधारा ही हिंदू धर्म नाही होऊ शकत. हिंदू आणि हिंदुत्व समजून घेण्यासाठी शशी थरूर यांची 'Why I Am A Hindu' आणि 'The Hindu Way' ही दोन पुस्तके वाचा छान लिहिली आहेत.
8/ पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेत धर्म ही संकल्पना पूर्णतः राजकीय व्यवस्थेच्या बाहेर ठेवण्यात आली. पण, भारतीय धर्मनिरपेक्षता ही राजकीय व्यवस्थेला धर्मापासून दूर न ठेवता तीच प्रत्येकाला इतरांचे हक्क जपून स्वत:च्या धर्माचा आचार , विचार आणि प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार देते.
9/ काँगेसची धर्मनिरपेक्षता हि आपल्या देशाच्या संविधानातील कलम २५ ते २८ च्या अंतर्गत दिलेल्या धर्मस्वातंत्र्याशी अनुसरून आहे. म्हणजेच ,धर्म हि जरी वैयक्तिक बाब असली तरी मी हिंदू आहे, हे सार्वजनिक आयुष्यात इतरांच्या मूलभूत हक्कांच्या अधीन राहून मी सांगू शकतो / त्यावर बोलू शकतो.
10/ आपल्या देशात मी हिंदू किंवा मुसलमान आहे असं कुणी म्हणालं, तर तो धर्मनिरपेक्षतेचा विरोधक आहे असं म्हणणं चुकीचं आहे. शेवटी एवढंच सांगतो की, आपण स्वतःला काँगेस विचारधारेचे पाईक मानत असू तर आपल्याला काँगेसचे विचार पण अवलंबावे लागतीलच 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
हे बघा केंद्राच्या वित्त मंत्रालयाच्या 2010-11 च्या वार्षिक अहवालात Mumbai IFSC ही केंद्र सरकारच्या Capital Markets Division चा एक भाग म्हणून अधिकृतरित्या नोंद दिसते.