अगोदरच्या काळात बाबा बुवा लोक काहीतरी हातचालाखी करून त्याला चमत्कार दाखवून सर्वांसमोर विज्ञानाचा खून करायचे व लोक त्यांना देव समजून त्यांचा उधोउधो करायचे. तसे काही बाबा आजही बघायला भेटतात. म्हणून तर ट्रेन, बस, सार्वजनिक ठिकाणे या भोंदूबाबांच्या जाहिरातींनी गजबजून गेलेले दिसतात.
पण जसं जसं विज्ञान प्रगत होत गेलं तसा लोकांचा विज्ञानावर विश्वास वाढत गेला व या बाबांनी पण आपला पवित्रा बदलता घेतला. आजकाल हे बाबा लोक विज्ञानाने बनवलेल्या साधनांचा विज्ञानाची कत्तल करण्यासाठी सर्रास वापर करताना दिसतात.
काही जुन्या ग्रंथात, संस्कृतीत विज्ञान कसं प्रगत होत याबद्दल
अफवा पसरवतात, तर काही विज्ञानाची तोडमरोड करून आपला प्रॉपगंडा पसरवतात. यात त्यांचं महत्वाचं शस्त्र असत ते म्हणजे छद्मविज्ञान. छद्मविज्ञान हे वरून वरून विद्यानासारखच भासतं कारण यात हे लोक विज्ञानातील शब्द जसे की dimension, intensity, frequency,etc वापरताना दिसतात. काहीच शहानिशा
न करता याला भोळी बाबडी जनता बळी पडते. वैज्ञानिक शब्द वापरून, मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांचे नाव घेऊन त्यात आस्था व अध्यात्माची अशी काय खिचडी बनवतात की त्यात खरं काय आणि खोटं काय समजायला मार्ग राहत नाही व सामान्य माणस सहज फसतात.
राजकीय, व्यावसायिक फायद्यासाठी म्हणा किंवा प्रसिद्धी साठी म्हणा मोठे मोठे लोकं पण या असल्या बाबांचे समर्थन करताना दिसतात. कोणी काही प्रश्न उपस्थित केले तर संस्कृती चा सहारा घेऊन प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाच दोषी, सुंस्कृतीद्रोही, देशद्रोही ठरवल्या जातं.
यावर उपाय आहे तो 'वैज्ञानिक दृष्टिकोन'. वैज्ञानिक दृष्टिकोन इथे लहानपणापासून रुजवला गेला पाहिजे. विज्ञान फक्त पुस्तकांपुरत आणि परीक्षांपुरत सीमित राहता कामा नये.
" महाराष्ट्रातील कला " म्हणलं तर सर्वात आधी नाव येत त्या इथल्या जगप्रसिद्ध अश्या लेण्यांच . . . #महाराष्ट्रदिन निमित्ताने ओळख करून घेऊ इथल्या अद्वितीय अशा या कलेची 👇👇
१. अजिंठा (औरंगाबाद): अजिंठ्यातली लेणी चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत.एकूण ३० गुहांचा समावेश असणार्या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन बौद्धपंथीय लेणींचा समावेश आहे. या लेणी औरंगाबाद पासून जवळपास १०६ किमी तर जळगाव पासून ६० किमी
अंतरावर आहेत.
२. वेरूळ(औरंगाबाद) : औरंगाबाद पासून जवळपास ३० किमी दूर असलेल्या या जगप्रसिद्ध लेण्यांमध्ये १२ बौद्ध, १७ हिंदू व ५ जैन लेणी आहेत. येथील कैलासमंदिर स्थापत्यशास्त्राचा अदभूत असा नमुना आहे.
ताई चांगली शिकली उच्चशिक्षित झाली,
बालविवाह न करता वयाच्या पंचविशीत
२-४ पोरांना नापसंद करून ताई ने तिला आवडेल अश्या मुलाशी लग्न केलं,
एकपत्नीत्वाची तरतूद असल्याने ताईच्या जीवनाला स्थैर्य आहे,
घर सोडून सासरी आली पण आई वडिलांच्या संपत्तीत वारसा हक्क घ्यायला विसरली नाही,
उच्चशिक्षणाने ताई ला चांगली नौकरी आहे,
ताई पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून नौकरी करते व तितकंच वेतन घेते,
बोनस आणि PF मुळे ताई च बरं चाललंय,
ताई एक सुजाण कर्मचारी आहे ,
ताईला वुमन & चाईल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट, मॅटर्निटी बेनिफिट फॉर वुमन लेबर्स आणि वुमन लेबर वेल्फेअर फंड
सारखे कायदे माहीत आहेत.
म्हणूनच तर ताई सध्या गर्भवती आहे आणि घरी बसून पगार घेऊन चांगल्या पद्धतीने तिची व होणाऱ्या बाळाची काळजी घेते.
ताईच्या काही मैत्रीणींनीच नवऱ्यासोबत जमत नाही तर ताई त्यांना घटस्फोट, पोटगी, पुनर्विवाह वर चांगले सल्ले देते.