स्व.अण्णासाहेब पाटील आणि शालिनीताई पाटील यांच्यापासून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा लढा आज तो पूर्णपणे विझला.याला कारणीभूत असलेलं किंवा कायस्वरूपी ज्याचा आरक्षण देण्याला कायम विरोध होता असे एक नाव कायम चर्चेत राहिलं.ज्याचा अदृश्य हात हा आरक्षणा विरोधात होता.एक व्यक्तीमुळे लाखो
विद्यार्थी हक्क असून प्रवेशासाठी लाईन मध्ये उभे राहिले आणि इथून पुढे राहतील.कित्येक विद्यार्थी अधिकारी पदाची पात्रता असून आज कुठेतरी शिपाई आहेत.मार्क मिळवून अनुदानित शिक्षणाला पात्र असलेले विना-अनुदानित शिक्षण घेऊन त्यांचा हक्क गमावला.आरक्षणासाठी लढा दिलेले,ज्या हुतात्म्यांनी
आपले प्राण गमावले,कित्येक घर पोरकी झाली,आपल्या घरातील कर्ताधरता माणूस गमावला या सगळ्याच बलिदान व्यर्थ झालं,या सगळ्याला कोण जबाबदार?आपणच निवडून दिलेले नेते का? ज्यांनी आपल्या समाजाच्या नावा खाली मते खाल्ली आशा सर्व लोकांना आता त्यांना त्यांची लायकी/त्यांची जागा दाखवून देयची वेळ
परवा बातम्यांमध्ये उद्या सकाळी १०.३० मराठा आरक्षणाचा निकाल लागणार अशी बातमी ऐकली. 'आम्ही फार उत्तम रित्या आमची बाजू मांडली. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने देखील आमचे अभिनंदन केले.' असे अशोक चव्हाण यांचे स्टेटमेंट सुद्धा ऐकले. .
पण पवार कुटुंबीयांपैकी यावर कोणीही भाष्य केले नाही. मराठा आरक्षणाची मागणी ३० वर्ष जुनी आहे. पण पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या पवारांनी मराठा आरक्षणावर काहीही काम केले नाही. २०१४ ला सत्ता गेल्यावर मात्र पवार खडबडून जागे झाले. आणि मराठा समाजाला संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी मराठा
मूक मोर्चाचा वारू फडणवीस यांच्या अंगावर सोडून दिला.
फडणवीस यांनी त्यांचे काम केले. परंतु नायायालयीन लढाईत मराठा आरक्षण टिकले नाही. कोणी कितीही म्हणाले तरी देशाला जातीनिहाय आरक्षणापेक्षा केवळ आर्थिक निकर्षांवर आधारित आरक्षणाची गरज आहे. आरक्षण आहे म्हणून एखाद्या ७० टक्के वाल्या