परवा बातम्यांमध्ये उद्या सकाळी १०.३० मराठा आरक्षणाचा निकाल लागणार अशी बातमी ऐकली. 'आम्ही फार उत्तम रित्या आमची बाजू मांडली. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने देखील आमचे अभिनंदन केले.' असे अशोक चव्हाण यांचे स्टेटमेंट सुद्धा ऐकले. .
पण पवार कुटुंबीयांपैकी यावर कोणीही भाष्य केले नाही. मराठा आरक्षणाची मागणी ३० वर्ष जुनी आहे. पण पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या पवारांनी मराठा आरक्षणावर काहीही काम केले नाही. २०१४ ला सत्ता गेल्यावर मात्र पवार खडबडून जागे झाले. आणि मराठा समाजाला संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी मराठा
मूक मोर्चाचा वारू फडणवीस यांच्या अंगावर सोडून दिला.
फडणवीस यांनी त्यांचे काम केले. परंतु नायायालयीन लढाईत मराठा आरक्षण टिकले नाही. कोणी कितीही म्हणाले तरी देशाला जातीनिहाय आरक्षणापेक्षा केवळ आर्थिक निकर्षांवर आधारित आरक्षणाची गरज आहे. आरक्षण आहे म्हणून एखाद्या ७० टक्के वाल्या
मुलाला प्रवेश मिळत असेल आणि आरक्षण नाही म्हणून एखादा ८० टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी त्यापासून वंचित रहात असेल तर तेही चुकीचेच.
मुळात पवारांच्या १५ वर्षाच्या सत्तेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काय केले? हा प्रश्न पवारांना कोणीही विचारत नाही.
महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. विविध आकडेवारीनुसार मराठा समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्केच्या आसपास आहे. याच समाजाने महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतजमीन धारण केलेली आहे. याच समाजाचे सर्वाधिक आमदार विधानसभेत आणि राज्यसभेत असतात. आजवर मराठा समाजाचे
१८ मुख्यमंत्री झाले आहेत. ब्राम्हण समाजाचे केवळ दोन मुख्यमंत्री झाले आहेत. आणि मराठा मूक मोर्चा कुणाच्या काळात निघाला तर फडणवीसांच्या काळात?
मुळात आरक्षणाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजायची एवढेच राजकारण पवार करत करत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या रेट्यावर आपण २०१९ च्या विधानसभेला
फार मोठी मजल मारू अशी साहेबांना अशा होती. युतीतील बेबनाव आणि मोक्याच्या क्षणी आलेला पाऊस यांनी पवारांना थोडासा आधार दिला. अन्यथा त्यांची पुन्हा धूळधाण झाली असती.
फडणवीसांच्या काळात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.
वेळोवेळी मोर्चे काढले गेले. मग गेल्या वर्षभरात हे मराठा आरक्षणाचे आंदोलक आणि समर्थक कोणत्या बिळात लपून बसले आहेत. उलट मराठा आरक्षणाच्या काही मोहरक्यांनी साहेब मराठा आरक्षणावर योग्य रीतीने काम करत आहेत अशी विधाने केली होती. मुळात पवारांनी त्यांच्या दहा पिढ्यांची सोय केलेली आहे.
उरलेली मंडळी देशोधडीला लागली तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही. मराठ्यांना आरक्षण देणे तर दूरच उलट पवार कुटुंबीयांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या विरोधातच भूमिका घेतली आहे. पण जातीचे कातडे डोळ्यावर ओढलेल्या मराठ्यांना पवारांचे राजकारण दिसेल तर खरे. @RajeGhatge_M @SS_Nationalist
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
स्व.अण्णासाहेब पाटील आणि शालिनीताई पाटील यांच्यापासून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा लढा आज तो पूर्णपणे विझला.याला कारणीभूत असलेलं किंवा कायस्वरूपी ज्याचा आरक्षण देण्याला कायम विरोध होता असे एक नाव कायम चर्चेत राहिलं.ज्याचा अदृश्य हात हा आरक्षणा विरोधात होता.एक व्यक्तीमुळे लाखो
विद्यार्थी हक्क असून प्रवेशासाठी लाईन मध्ये उभे राहिले आणि इथून पुढे राहतील.कित्येक विद्यार्थी अधिकारी पदाची पात्रता असून आज कुठेतरी शिपाई आहेत.मार्क मिळवून अनुदानित शिक्षणाला पात्र असलेले विना-अनुदानित शिक्षण घेऊन त्यांचा हक्क गमावला.आरक्षणासाठी लढा दिलेले,ज्या हुतात्म्यांनी
आपले प्राण गमावले,कित्येक घर पोरकी झाली,आपल्या घरातील कर्ताधरता माणूस गमावला या सगळ्याच बलिदान व्यर्थ झालं,या सगळ्याला कोण जबाबदार?आपणच निवडून दिलेले नेते का? ज्यांनी आपल्या समाजाच्या नावा खाली मते खाल्ली आशा सर्व लोकांना आता त्यांना त्यांची लायकी/त्यांची जागा दाखवून देयची वेळ