काल न वापरलेली औषधें परत करायला मेडिकल गेलो हिशेब चालूच होता .तेवढ्यात एक मुलगा म्हताऱ्या आई ला कपड्यावरून मध्यमवर्गीय च वाटत होते .मेडिसिन घायला आले मुलाने फाईल दिली किती बिल होईल सांगा म्हणला .उत्तर आले चार हजार मुलगा म्हणाला देऊन टाका तर आई नि सांगितले हजार चे करा वाटले तर
परत येऊ .सगळे आयुष्य पोरा बाळा न करता संसारकरता खर्ची घालवलेल्य आई ने तिथेच मुलाला चार शब्द सुनावले महिनाभराच्या किराणा इतक्या गोळ्या घेतात का कधी ?😡मी मेडिकल मालकाला दोस्तच माझा नजरेने खुणावले त्याने आजी ला औषधें चार हजाराची घेऊन जा बाकी परत करा मी घेईन असे सांगितले
कमीत कमी दोन अडीच ची तरी घेऊन जा सगळे डोस मी ऍडजस्ट करून देतो नाहीतर चार चे घेऊन जा आणि परत द्या काळजी करू नका आजी आणि मेडिसिन दिले. मी डुलत डुलत काठी टेकवून नाराजीनेच औषधे घेऊन जाणाऱ्या आजी च्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत होतो .मला आई आठवली कॅरी बॅग भरून औषधे आणले की आई आधी
विचारणार इतके औषधे ? किती ला आणली रे ? तुला काही व्यवहार समाजतात का रे 😡 आपली काळजी तिने सगळे औषधे घ्यावीत तर तिची काळजी याचे पैसे आपल्यामुळे खर्च होत आहेत .आजी आणि आई च्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना एक सारखी च मुलं कमावतात आणि आपण औषधात पैसे उडवतो.तुमची आई पण अशीच वागते का ??
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गुरुदक्षिणा 🌹🙏
इयत्ता पाचवी चित्रकलेचा तास गुरुजी नि पांढऱ्या ड्रॉईंगपेपर वर रेखाटन करून दिलेले हत्ती चे चित्र दिले सोबत रंग पण दिलेत आणि रंगवायला सांगितले.चित्रकलेचे गुरुजी माझ्या आजोबांचे शिष्य घरी पिढया न पिढया चित्रकला आणि मूर्तिकार यांचा वारसा.कदाचित त्यामुळे म्हणा मी जरा
जास्तच घमेंडी .हत्ती ला रंग दिला निळसर शेपटी पांढरी ,कांन वेगवेगळ्या रंगाचे , गवत हिरवे नाही पिवळे ,झटपट काढून गुरुजींना दाखवले ,त्यांनी ठेवून घेतले खूप छान 10 /10 मार्क दिलेत.रविवारी बाहेरून खेळून आलो तर गुरूजी आणि आजोबा माझी वाट पहात होते.आले आले बेरिस्टर साहेब आलेत 😱
आजोबांनी जवळ बोलवले हत्ती चे ड्रॉईंग दाखवले क्षणात कानाखाली आवाज आला मी गाल झाकतो तोपर्यंत गुरुजी नि दुसऱ्या कानाखाली जाळ काढला.निळा हत्ती /पिवळ गवत , पांढरी शेपटी हे शिकवले का तुझ्या बापाने ? गुरुजी बोलत होते रंगसंगती समजत नाही तुला ? साधे चित्र रंगवता येत नाही मुर्त्या काय