गुरुदक्षिणा 🌹🙏
इयत्ता पाचवी चित्रकलेचा तास गुरुजी नि पांढऱ्या ड्रॉईंगपेपर वर रेखाटन करून दिलेले हत्ती चे चित्र दिले सोबत रंग पण दिलेत आणि रंगवायला सांगितले.चित्रकलेचे गुरुजी माझ्या आजोबांचे शिष्य घरी पिढया न पिढया चित्रकला आणि मूर्तिकार यांचा वारसा.कदाचित त्यामुळे म्हणा मी जरा
जास्तच घमेंडी .हत्ती ला रंग दिला निळसर शेपटी पांढरी ,कांन वेगवेगळ्या रंगाचे , गवत हिरवे नाही पिवळे ,झटपट काढून गुरुजींना दाखवले ,त्यांनी ठेवून घेतले खूप छान 10 /10 मार्क दिलेत.रविवारी बाहेरून खेळून आलो तर गुरूजी आणि आजोबा माझी वाट पहात होते.आले आले बेरिस्टर साहेब आलेत 😱
आजोबांनी जवळ बोलवले हत्ती चे ड्रॉईंग दाखवले क्षणात कानाखाली आवाज आला मी गाल झाकतो तोपर्यंत गुरुजी नि दुसऱ्या कानाखाली जाळ काढला.निळा हत्ती /पिवळ गवत , पांढरी शेपटी हे शिकवले का तुझ्या बापाने ? गुरुजी बोलत होते रंगसंगती समजत नाही तुला ? साधे चित्र रंगवता येत नाही मुर्त्या काय
करशील? चित्र असो की मूर्ती बघणाऱ्या चा पाय निघायला नको त्यांच्या समोरून.मग घरचे आजोबा वडील गुरुजी त्यांच्या कडून बरेच शिकलो.2017 मध्ये परत एकदा मूर्ती करायची लहर आली .बाप्पाच्या प्रत्येक मूर्तीचे सोवळे वेगळ्या रंगा चे बनवले.आठ दिवस आधी सगळ्यांना बोलवले आणि बुकिंग करून घ्या
म्हणून बोललो सगळे जमलेत 20/ 25 परिचयातील लोकांची गर्दी जो तो किती छान मला हा हवा मला या रंगाचा हवा ,मला ते केशरी रंगाचे सोवळे तो हवा अशी गडबड आणि बडबड चालू होती मी आधीच एक निळ्या सोवळ्या ची मूर्ती घराकरता बाजूला ठेवली होती .ओळखीचा दोस्त त्याच्या मोठया मुलाला घेऊन कोणता घायचा ते
विचार करत होता तितक्यात त्याच्या मुलगा बोलला 'पपा आपण हा बुक करू निळ्या रंगाचे सोवळे असलेला माझा तर पायच निघत नाही ये पप्पा .🤔मी त्या गर्दीतून क्षणात 35 /40 वर्ष मागे मला गुरुजी आठवले चित्र असो की मूर्ती बघणाऱ्याचे पाय निघायला नको .मन गलबलून आलेले डोळे गच्च भरून आलेले .मी उगाच
खोकललो डोळ्यातले पाणी लपवायला.दोस्ताने विचारले किती देऊ रे मी म्हटले नंतर दे आज नको .गर्दी पांगली कोपऱ्यात गुरजी आणी त्यांच्या नजरेतले कौतुक यांचा भास झाला .मित्र म्हणतो पैसे का नाही घेत रे ? त्याला काय सांगू चित्र असो की मूर्ती बघणाऱ्याचा पाय निघायला नको हे शीकवणाऱ्या
गुरुजींना आज गुरुदक्षिणा दिल्या चा सोपस्कार पूर्ण करू दे .तुम्ही शिकवलेल्या चित्रकलेला ही छोटीशी सुमनांनजली गुरूजी
गुरुदक्षिणा 🌹🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काल न वापरलेली औषधें परत करायला मेडिकल गेलो हिशेब चालूच होता .तेवढ्यात एक मुलगा म्हताऱ्या आई ला कपड्यावरून मध्यमवर्गीय च वाटत होते .मेडिसिन घायला आले मुलाने फाईल दिली किती बिल होईल सांगा म्हणला .उत्तर आले चार हजार मुलगा म्हणाला देऊन टाका तर आई नि सांगितले हजार चे करा वाटले तर
परत येऊ .सगळे आयुष्य पोरा बाळा न करता संसारकरता खर्ची घालवलेल्य आई ने तिथेच मुलाला चार शब्द सुनावले महिनाभराच्या किराणा इतक्या गोळ्या घेतात का कधी ?😡मी मेडिकल मालकाला दोस्तच माझा नजरेने खुणावले त्याने आजी ला औषधें चार हजाराची घेऊन जा बाकी परत करा मी घेईन असे सांगितले
कमीत कमी दोन अडीच ची तरी घेऊन जा सगळे डोस मी ऍडजस्ट करून देतो नाहीतर चार चे घेऊन जा आणि परत द्या काळजी करू नका आजी आणि मेडिसिन दिले. मी डुलत डुलत काठी टेकवून नाराजीनेच औषधे घेऊन जाणाऱ्या आजी च्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत होतो .मला आई आठवली कॅरी बॅग भरून औषधे आणले की आई आधी