गिरीश कुबेर यांचे महाराष्ट्राविषयीचे नवीन पुस्तक हे इतिहासाची मोडतोड करणारे आहे. ज्या पद्धतीने ब्राम्हणी इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न केला आहे.तीच री कुबेरानी ओढली आहे. संभाजी महाराजांनी सत्तेसाठी महाराणी सोयराबाई यांना मारले हे तर सनक आणणारे आहे.
यापुढे थोरले बाजीराव यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली आहे. पुढे कहर म्हणजे बाजीराव यांनी दिल्लीला आव्हान देणारा पहिला योद्धा होता म्हणून लिहिलं आहे. हे सांगताना दिल्लीत महादजी शिंदे यांनी दिल्लीत केलेल्या अफाट कामगिरीचा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला आहे.
थोरले बाजीराव हे सातारच्या छत्रपती शाहू महाराज यांचे पेशवे होते. शाहू महाराजांचे कर्तृत्व मोठे होते, कुबेरानी ते सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. उलट थोरल्या शाहू महाराजांकडे दूरदृष्टीचा अभाव होता म्हणून स्वतःचे मनाचे श्लोक छापले. हे शिवकालीन इतिहासाचे झाले.
पुढे सामाजिक न्यायाचे आणि समतेचे पुरस्कर्ते राजश्री शाहू महाराजांचा उल्लेख पहिले आरक्षण दिले इतकाच केला आहे. हे पुस्तक एक प्रकारे प्रॉपगंडा पसरवायला लिहिले आहे की काय अशी शंका येते.
कुबेरानी पुस्तक लिहिले आहे म्हणून वाचकांनी विश्वास ठेवावा हा काळ आता गेला आहे. इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना वेळीच प्रतिउत्तर दिले जाईल. शेवटी एकच सांगणे आहे...
तुम्ही आमच्या शंभुराजांवर कितीही तिरस्काराचे रांजण ओतले तरी शंभूराजांच्या त्यागाने अन बलिदानाने त्याच अमृतच होईल...
एका शिवपुत्राला बदनाम करायला शेकडो कादंबऱ्या, शेकडो नाटक रेखाटुनही तुम्ही हरला आहात.
कलम कसायांनो...शिवपुत्र छत्रपती संभाजीराजा इथल्या तरुणांच्या हृदयावर अधिराज करतोय.
Written by Prashant Dada Dhumal #जय_शंभुराजे..
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शिवाजी महाराजांशी तुलना करण्यास सर्व बाजूंनी साजेल असा मानव सापडणे कठीण आहे....
ग्रीसचा सिकंदर बादशहा इतिहासात मोठा पराक्रमी गणला जातो, परंतु सिकंदरास सर्व जग जिंकण्याची हाव होती. जिंकलेल्या प्रदेशाची सुधारणा करून राज्य व्यवस्था ठरवण्यात त्याने लक्षच घातले नाही.
शिवाजी महाराज सिकंदरासारखे जगज्जेतृत्वासाठी किंवा दिगंत कीर्तीसाठी हपापलेले नव्हते. शिवाय सिकंदराच्या बापाने अगोदरच मोठे राज्य कमावून ठेवले होते, तशी गोष्ट शिवाजीमहाराजांची नव्हती. तसेच शहर काबीज केल्यावर तेथच्या लोकांची नाहक कत्तल करणे,
अमोलिक ग्रंथसंग्रह जाळून टाकणे, शरण आलेल्या बंदिवानास यमसदनी पोचवणे, स्त्रियांवर अत्याचार करणे व मदिरेच्या भक्तीत बेफाम होणे, असली घोर पापे शिवाजीमहाराजांना कधीही शिवली नाहीत.
One more thread.. must read ❤️
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात असणारे काही वादग्रस्त मुद्दे पुढीलप्रमाणे :
१) छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांच्यासह शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अनमोल प्रतिभावान मंत्र्यांना ठार केले.
२) छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती. ३) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत.छत्रपती घराण्याच्या इतिहासाविषयी त्यांचा जास्त अभ्यास नसल्याचे दिसते.
१) छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी युवराज म्हणून संभाजीराजांना मान मिळाला होता. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजेच स्वराज्याचे छत्रपती बनणार होते हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नव्हती.