शिवाजी महाराजांशी तुलना करण्यास सर्व बाजूंनी साजेल असा मानव सापडणे कठीण आहे....
ग्रीसचा सिकंदर बादशहा इतिहासात मोठा पराक्रमी गणला जातो, परंतु सिकंदरास सर्व जग जिंकण्याची हाव होती. जिंकलेल्या प्रदेशाची सुधारणा करून राज्य व्यवस्था ठरवण्यात त्याने लक्षच घातले नाही.
शिवाजी महाराज सिकंदरासारखे जगज्जेतृत्वासाठी किंवा दिगंत कीर्तीसाठी हपापलेले नव्हते. शिवाय सिकंदराच्या बापाने अगोदरच मोठे राज्य कमावून ठेवले होते, तशी गोष्ट शिवाजीमहाराजांची नव्हती. तसेच शहर काबीज केल्यावर तेथच्या लोकांची नाहक कत्तल करणे,
अमोलिक ग्रंथसंग्रह जाळून टाकणे, शरण आलेल्या बंदिवानास यमसदनी पोचवणे, स्त्रियांवर अत्याचार करणे व मदिरेच्या भक्तीत बेफाम होणे, असली घोर पापे शिवाजीमहाराजांना कधीही शिवली नाहीत.
प्रसिद्ध रोमन सरदार जूलियस सीझर व शिवाजीमहाराज यांच्यात थोडे साम्य आहे दोघेही धोरणी, राजकारण कुशल व व्यवस्थित होते. पण सीझरही जगज्जेतृत्वाच्या हव्यासापासून अलिप्त नव्हता.
रोम राष्ट्राच्या विस्तृत व संपन्न पायावर सीझरने पराक्रम गाजवणे व मुळात काहीच नसता शिवाजीमहाराजांनी आपल्या राष्ट्रास स्वातंत्र्य प्राप्त करून देणे, यात पुष्कळ फरक आहे...
शिवाजीमहारांजांपेक्षा जास्त पराक्रम गाजवणारे किंवा जास्त देश जिंकून त्याजवर राज्य करणारे पुरूष पुष्कळ आढळतील पण त्यांच्या गुणसमुच्चय एका व्यक्तीत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही.
फार काय शिवाजी महाराजांच्यात अमुक एक दोष दाखवा असा प्रश्न कोणी केल्यास आपणास निरूत्तर व्हावे लागते...
रियासतकार गो.स. सरदेसाई..
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
One more thread.. must read ❤️
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात असणारे काही वादग्रस्त मुद्दे पुढीलप्रमाणे :
१) छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांच्यासह शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अनमोल प्रतिभावान मंत्र्यांना ठार केले.
२) छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती. ३) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत.छत्रपती घराण्याच्या इतिहासाविषयी त्यांचा जास्त अभ्यास नसल्याचे दिसते.
१) छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी युवराज म्हणून संभाजीराजांना मान मिळाला होता. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजेच स्वराज्याचे छत्रपती बनणार होते हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नव्हती.
गिरीश कुबेर यांचे महाराष्ट्राविषयीचे नवीन पुस्तक हे इतिहासाची मोडतोड करणारे आहे. ज्या पद्धतीने ब्राम्हणी इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न केला आहे.तीच री कुबेरानी ओढली आहे. संभाजी महाराजांनी सत्तेसाठी महाराणी सोयराबाई यांना मारले हे तर सनक आणणारे आहे.
यापुढे थोरले बाजीराव यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली आहे. पुढे कहर म्हणजे बाजीराव यांनी दिल्लीला आव्हान देणारा पहिला योद्धा होता म्हणून लिहिलं आहे. हे सांगताना दिल्लीत महादजी शिंदे यांनी दिल्लीत केलेल्या अफाट कामगिरीचा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला आहे.
थोरले बाजीराव हे सातारच्या छत्रपती शाहू महाराज यांचे पेशवे होते. शाहू महाराजांचे कर्तृत्व मोठे होते, कुबेरानी ते सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. उलट थोरल्या शाहू महाराजांकडे दूरदृष्टीचा अभाव होता म्हणून स्वतःचे मनाचे श्लोक छापले. हे शिवकालीन इतिहासाचे झाले.