#सावरकर_आणि_द्विराष्ट्रवाद
१९३७ च्या कर्णावती येथे केलेल्या भाषणावरुन सावरकरांना सर्रासपणे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे ठरवले जाते.अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या सय्यद अहमद यांनी हा विचार १८८८ मध्ये सर्वप्रथम मांडला,त्यावेळी सावरकर केवळ पांच वर्षांचे होते,या
तथ्याकड़े जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते.
एशियन एजच्या संपादकाने २६ फेब्रुवारी २००३ च्या अग्रलेखात सावरकरांच्या 'त्या' भाषणातील एकच ओळ छापून कहर केला.
हिन्दू हे एक राष्ट्र आहेत असे संबोधता येईल,असे म्हणून सावरकर पुढे जे म्हणतात ते टीकाकारांना बहुधा दिसले नसावे वा विस्मृतीत
गेले असावे.त्या भाषणात सावरकर म्हणतात,हिंदी राज्य मात्र निर्भेळ असू द्या.त्या राज्याने मताधिकार,नोकऱ्या,अधिकाराची स्थाने,कर या संबंधात धर्माच्या नि जातीच्या संदर्भात कसल्याही मत्सरोत्तेजक भेदान्ना मुळीच थारा देऊ नये.कोणताही मनुष्य हिन्दू आहे की मुसलमान आहे की ख्रिस्ती आहे की ज्यू
आहे,इकडे लक्ष दिले जाऊ नये.त्या हिंदी राज्यातील सर्व नागरिक सर्वसामान्य लोकसंख्येतील त्यांची धार्मिक किंवा राजकीय शेकडेवारी विचारात घेतली न जाता त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक गुणावगुणानुसारच वागविले जाऊ द्यात.इंग्लण्ड किंवा अमेरिकेतील संयुक्त संस्थाने यासारख्या जगातील इतर प्रत्येक
राष्ट्रात असल्याप्रमाणे देशातील प्रचंड बहुसंख्य लोकांना समजत असेल तीच भाषा आणि तीच लिपी त्या हिंदी राज्याची राष्ट्रीय भाषा नि राष्ट्रीय लिपी होऊ द्या. कोणत्याही लादलेल्या नी वेड्यावाकड्या संस्काराने ती भाषा नि ती लिपी भ्रष्ट करण्याला कोणत्याही धार्मिक कारणाला मोकळीक न मिळू द्या.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
प्रसंग #दुसरे_महायुद्ध
स्थळ- #अमेरिका
कर्नल पदावर विराजमान होते,बेडल स्मिथ,सेक्रेटरी ऑफ द जनरल स्टाफ.
ते जनरल मार्शल यांच्या कार्यालयात गेले.त्या दोघांमध्ये झालेला संवाद....
जनरल मार्शल- काय काम आहे, स्मिथ ?
बेडल स्मिथ- सर, बाहेर एक गृहस्थ आले आहेत. त्यांच्याकडे मजबूत बनावटीच्या
बनावटीच्या गाडीचे आराखडे आहेत.हे आराखडे त्यांना सरकारला द्यायचे आहेत.तशी त्यांची इच्छा आहे.तथापि त्यांचे कोणीही ऐकून घेण्यास राजी नाहीत.म्हणून ते आपल्याला भेटायला आले आहेत.
जनरल मार्शल- तू स्वतः आराखडे पाहिले आहेस का?
बेडल स्मिथ- होय
जनरल मार्शल- कसे आहेत?
बेडल स्मिथ- मला वाटते,
त्याचा शोध उत्तम आहे.
जनरल मार्शल - मला एवढे पुरेसे आहे. त्याला एक गाडी तयार करायला सांग.
बेडल स्मिथ- सर, गाडीची चाचणी घेण्यासाठी किमान पंधरा गाड्या कराव्या लागतील.
जनरल मार्शल- तू पैसे उभे करू शकशील?
बेडल स्मिथ- होय, 12 सहस्र डॉलर्स लागतील.
जनरल मार्शल- ठीक आहे काम हातात घे.
आज रामायण FAQ मध्ये एका नवीन प्रश्नाचे उत्तर लिहीलं ...
गैरसमज - वाली रक्षणकर्ता होता. रामाने त्याला मारल्यावर म्हण आली,“कोणी वाली राहिला नाही”
उत्तर - हा 'वाली' समजण्यासाठी आपल्याला इस्लामी निकाह समजून घ्यायला हवा. इस्लामी निकाह हा मिया आणि बिवी यांच्या मधील करार असतो. या
करारातील एक पार्टी (मिया)असा करार एका वेळेला ४ बिवींशी करू शकतो.काही इस्लामी पंथात,निकाह ठराविक काळासाठी सुद्धा करायची सोय आहे.त्यामध्ये मिया असा निकाह किंवा करार, ३ दिवसांपासून ते काही वर्षांपर्यंतच्या काळासाठी करू शकतो.
या करारनाम्यात,निकाहाच्या वेळी,मियाने बिविला तलाक दिल्यास
(म्हणजेच त्याने हा करार मोडल्यास)"मी तुला अमुक इतकी रक्कम देईन",असे नमूद करणे आवश्यक असते.या रकमेला 'मेहेर' म्हणतात.तलाक दिल्यावर बिवीला 'मेहेर' मिळतो किंवा ती तो मागते.जो मिया मेहेर देतो त्याला 'मेहेरबान' म्हणतात.अरबी भाषेतून मराठीत आलेला हा अजून एक शब्द. "मेहेरबानी करणे" उपकार
#संग्राह्य
'चर्चचे वास्तव' या छोटेखानी पुस्तकाचा परिचय करून दिल्यानंतर अनेकांनी या विषयावर एखादे विस्तृत माहिती देणारे पुस्तक आहे का,अशी पृच्छा केली आणि आमच्या संग्राहातील 'ख्रिश्चँनिटी आणि हिंदुस्थान' या पुस्तकाची आठवण झाली.वैद्यकीय व्यवसायात असणाऱ्या डॉ.अरविंद गोडबोले यांनी
सत्यान्वेषण करून,भरपूर तळटीपा,विस्तृत संदर्भ ग्रंथ यादी दिल्यामुळे या ग्रंथाला प्रचंड संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.प्रस्तुत ग्रंथाची अनुक्रमणिका पाहिली की विषय व्याप्ती कळते.ख्रिश्चँनिटी- तत्वज्ञान व इतिहास,येशू ख्रिस्ताचे मूळ शिष्य व हिंदुस्थान,युफ्रेटीसचा तीर,सीरियन ख्रिस्ती व
पोर्तुगीजपूर्व मिशनरी,हिंदुस्थानातील पोर्तुगीजांच्या आगमनाची पार्श्वभूमी,मलबारमध्ये पोर्तुगीजांचा चंचुप्रवेश,गोवे व अन्यत्र पोर्तुगीज राज्यस्थापना, पोर्तुगीज शासन व कॅथलिक धर्मपीठ यांचे हिंदूंवर अत्याचार,इन्क्विझिशन, हिंदूंचा विविध प्रकारे धर्मछळ,रॉबर्ट डी नोबिली व फादर स्टीफन्स,
#हौतात्म्यदिन
महादेव विनायक रानडे हा विज्ञान शाखेचे शिक्षण घेणारा तरुण चापेकर बंधूसोबत होता.उंचापुरा व भक्कम शरीराचा हा युवक रँड व आयर्स्ट यांच्या वधात सामील होता.प्लेगमधील अत्याचारांमुळे शनिपारावर डोके आपटून २ स्त्रियांनी जीव दिल्याचा निषेध मवाळपक्षीय गोपालकृष्ण गोखले यांनी
केला.त्यावर सरकारने नाराजी दाखवताच भारतात परतल्यावर ते क्षमा मागून मोकळे झाले.त्यावेळी टिळकांनी त्यांना,पुरावे देतो पण क्षमा मागू नका,असे सांगितले होते.
पुढे एकदा सरदारसिंग राणा म्हणाले होते की,गोखल्यांची एम्.ए. ही पदवी master of apologies म्हणून शोभते.
फितूर द्रविड़ बंधुंना
मारण्यात वासुदेव चापेकर यांच्यासह महादेव रानडे सामील होते.पकड़ले गेल्यावर सर्व आरोप त्यांनी निडरपणे स्वीकारले.
त्यांचे मवाळ पंथीय मामा प्रा.वैजनाथ राजवाड़े त्यांना भेटायला तुरुंगात आले होते,तेव्हा त्यांनी सूचवले की, टिळक हे या कटात सामील होते अशी साक्ष दे, मी तुला यातून बाहेर
#संग्राह्य
ख्रिस्ती समाजाने चालवलेल्या संस्थांचे जाळे खूप मोठे आहे पण या संस्था चालतात कशा,याबद्दलची माहिती देणारे साहित्य मात्र खूपच कमी उपलब्ध आहे.त्याकरता प्रत्यक्ष या सर्व संस्थांच्या वेबसाईटवर किंवा सरकारी अधिकृत वेबसाईट वरील या संस्थांविषयी जी अधिकृत माहिती उपलब्ध असते तीचे
संकलन व विश्लेषण करून #Cross_purposes हे पुस्तक मिलिंद ओक यांनी अत्यंत परिश्रमाने लिहिले.
याच पुस्तकाचा आधार घेत आणि अनेक वेबसाईट्सना भेट देत,जाणकार लोकांकडून व विश्वसनीय सूत्रांकडून माहिती गोळा करीत शिवाय वृत्तपत्र,मासिक या सगळ्यांचा आधार घेत पण त्यातील मूळ संदर्भ पडताळून बघत
चारुदत्त कहू यांनी एकतीस लेखांची मालिका 'चर्चचे वास्तव' या शीर्षकाने साकारली व विजय प्रकाशनाने ती पुस्तक रूपाने प्रकाशित केली.
यात मिलिंद ओक यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे की,"भारतात केवळ अडीच ते तीन टक्के लोकसंख्या असलेला एक समुदाय हजारो संस्थांचे जाळे चालवतो आणि ते सुद्धा
भारतीय इतिहास हा पाश्चात्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तो इतिहास नसून कल्पित कथा आहे,हे म्हणणे अयोग्य आहे.रवींद्रनाथ टागोरांनी हा विचार 'धम्मपद' या निबंधात अतिशय प्रभावीपणे मांडला आहे.मला महाभारताचे प्राचीनत्व वा ऐतिहासिकत्व आधुनिक विद्वानांना संतोष वाटेल अशा
पद्धतीने सिद्ध करावयाच्या भानगडीत सध्या पडावयाचे नाही.विद्वत्ता किंवा व्यासंग हा माझा व्यवसाय नसल्याने मला ते शक्यही नाही.भारतीय व्यक्तिचित्रांचे जे विकृतीकरण सध्या निरनिराळ्या लेख-प्रबंधातून चालू आहे,त्याचा महाभारताच्या उपलब्ध संहितेशी प्रामाणिकपणा ठेवून परामर्ष घ्यावयाचा माझा
विचार आहे. अनुषंगाने महाभारतासंबंधीच्या काही विधानांचे परीक्षणही मी करणार आहे. सर्वसमावेशक,सर्वव्यापक असे विवेचन शक्य नाही. माझे लेखन हे काही पुस्तके आणि त्यातील काही विशेष विकृत विधाने यापुरतेच मर्यादित राहणार आहे.श्री.आनंद साधले यांचे #हा_जय_नावाचा_इतिहास_आहे,श्री.इरावती कर्वे