राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. #BreakTheChain अंतर्गत काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ५ टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.
राज्यात टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार होणार. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय होणार आहे-राज्य शासनाचे स्पष्टीकरण
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे साधला जनतेशी थेट संवाद. #BreakTheChain चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेनुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार.
यासाठी २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटिव्हिटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता गृहित धरली जाईल.
२०११ च्या जणगणनेनुसार १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिकांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्रिपरिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय. सर्व प्रकारची वाहतूक सुरु, मात्र गर्दीची ठिकाणे बंद. खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु. रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी.
सोमवार दि. ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत होणार अंमलबजावणी. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरू. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे,चित्रपटगृहे,गर्दीची ठिकाणे बंद राहणार.
अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची घेतली काळजी. या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यास सर्वांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांशी साधला ई-संवाद. उद्योग मंत्री @Subhash_Desai, आरोग्य मंत्री @rajeshtope11, वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh सहभागी. शासनासोबत खंबीरपणे उभे असल्याची उद्योजकांची ग्वाही.
वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यक तेवढेच कामगार बोलवावेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य तिथे कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची तसेच वर्क फ्रॉम होमची व्यवस्था करावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी साधला थेट संवाद. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही. आपण लॉकडाऊन टाळू शकतो, त्यासाठी सर्वांनी पुन्हा एकत्र येत जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने कोरोनाविरुद्ध लढूया- मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यात १७ सप्टेंबरला एका दिवशी सर्वाधिक २४ हजार ६१९ रुग्ण, आज ती ४५ हजारापर्यंत जाण्याची शक्यता. याच वेगाने रुग्णसंख्या वाढत राहिली तर आपण निर्माण केलेल्या सुविधा कमी पडतील. आपण आरोग्य सुविधा उभ्या करू, पण डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे- मुख्यमंत्री
कालपर्यंत ६५ लाख लोकांना लस. लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर. काल एका दिवसात ३ लाख लोकांना लस. केंद्राने लसीचा पुरवठा वाढविल्यास ही संख्या दिवसाला ६ ते ७ लाख करण्याची क्षमता राज्याकडून विकसित. वाढीव लसीची केंद्राकडे मागणी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील जास्तीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील सदस्यांची एकत्रित बैठक आयोजित करणार- जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
एका सर्व्हेच्या माध्यमातून भारतीय महिलांची बदनामी करणाऱ्या ग्लीडेन या फ्रेंच ॲपवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार. याप्रकरणी आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू- महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील क्षेत्रीय कार्यालयामधील ज्या कर्मचाऱ्यांनी लॉजिंग आणि बोर्डिंगची खोटी देयके सादर केली होती त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल- जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil