#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील जास्तीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील सदस्यांची एकत्रित बैठक आयोजित करणार- जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
एका सर्व्हेच्या माध्यमातून भारतीय महिलांची बदनामी करणाऱ्या ग्लीडेन या फ्रेंच ॲपवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार. याप्रकरणी आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू- महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील क्षेत्रीय कार्यालयामधील ज्या कर्मचाऱ्यांनी लॉजिंग आणि बोर्डिंगची खोटी देयके सादर केली होती त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल- जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil
आज ८ मार्च... हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपणा सर्वांना माहित आहे. त्या निमित्ताने मी सुरुवातीलाच राज्यातील सर्व माता-भगिनींना, युवती-विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो- उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks
स्त्री नसते केवळ वस्तू
ती नसते केवळ जननी,
ती असते नवनिर्मितीची गाथा,
जिथे आपण सर्वांनी टेकावा माथा... #MahaBudgetSession
◾️आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येईल.
◾️ महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार, त्यापैकी 800 कोटी रुपये यावर्षी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली शालेय शिक्षण विभागाची बैठक. शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता देण्यासह मुख्यमंत्र्यांनी शालेय शैक्षणिक वर्षाचा केला शुभारंभ. शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित.
#कोरोना मुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी #COVID_19 चा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि शहरांपासून दूरवरील शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करणार. तसेच इतर ठिकाणी ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शिक्षण सुरु होणार- मुख्यमंत्री
रेड झोनमध्ये नसलेल्या ९, १० व १२ वीच्या शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्टपासून, वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून, पहिली ते दुसरीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने,इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रामध्ये #COVID_19 बाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय आरोग्यमंत्री @drharshvardhan यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा. राज्याचे आरोग्यमंत्री @rajeshtope11 , प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी सहभागी.
#कोरोना च्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे नव्याने ५०० बेड्स आठवडाभरात उपलब्ध होणार. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देणार. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के. धारावी भागातून रुग्ण येण्याची संख्या मंदावली- मंत्री@rajeshtope11
जळगाव येथील बाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांचे निलंबन- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
स्थलांतरित मजुरांना विविध राज्यांत पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध. मात्र, बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नाहीत. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून स्पष्ट निर्देश द्यावेत, अन्यथा मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल- महसूलमंत्री @bb_thorat यांनी व्यक्त केली चिंता
महाराष्ट्रातून गृहराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या अंदाजे १० लाखांपेक्षा जास्त. आतापर्यंत स्थलांतरित मजुरांना घेऊन ३२ ट्रेन वेगवेगळ्या राज्यात रवाना. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पश्चिम बंगाल आणि ओरिसा या दोन राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात- महसूलमंत्री @bb_thorat
गृहराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांच्या याद्या तयार. पण पश्चिम बंगाल सरकार महाराष्ट्रात अडकलेल्या कामगारांना परत त्यांच्या राज्यात येण्यास परवानगी देत नाही- महसूलमंत्री @bb_thorat यांची माहिती
#coronavirus चे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा- आरोग्यमंत्री @rajeshtope11
राज्यात कालपर्यंत एकूण २४६५ कोरोना बाधित रुग्ण झाले बरे. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ. सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण, त्यापाठोपाठ पुणे मंडळात ११० रुग्णांना घरी सोडले- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
राज्यात #कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही मोठ्या प्रमाणावर चाचण्या होऊन रुग्णांचे निदान वेळेत. राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २३ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील रुग्णांना घरी सोडले, त्यानंतर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ- मंत्री @rajeshtope11