MAHARASHTRA DGIPR Profile picture
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन #NEWS
May 30, 2021 12 tweets 3 min read
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे साधला जनतेशी थेट संवाद. #BreakTheChain चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेनुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार. यासाठी २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटिव्हिटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता गृहित धरली जाईल.
Apr 4, 2021 6 tweets 2 min read
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्रिपरिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय. सर्व प्रकारची वाहतूक सुरु, मात्र गर्दीची ठिकाणे बंद. खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु. रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी. सोमवार दि. ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत होणार अंमलबजावणी. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरू. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे,चित्रपटगृहे,गर्दीची ठिकाणे बंद राहणार.
Apr 4, 2021 6 tweets 2 min read
कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांशी साधला ई-संवाद. उद्योग मंत्री @Subhash_Desai, आरोग्य मंत्री @rajeshtope11, वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh सहभागी. शासनासोबत खंबीरपणे उभे असल्याची उद्योजकांची ग्वाही. उद्योजक उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी, हर्ष गोयंका, निखिल मेस्वानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपूर्व भट्टाचार्य, हर्ष गोयंका, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे आदी उपस्थित
Apr 2, 2021 5 tweets 1 min read
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी साधला थेट संवाद. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही. आपण लॉकडाऊन टाळू शकतो, त्यासाठी सर्वांनी पुन्हा एकत्र येत जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने कोरोनाविरुद्ध लढूया- मुख्यमंत्र्यांचे आवाहन Image राज्यात १७ सप्टेंबरला एका दिवशी सर्वाधिक २४ हजार ६१९ रुग्ण, आज ती ४५ हजारापर्यंत जाण्याची शक्यता. याच वेगाने रुग्णसंख्या वाढत राहिली तर आपण निर्माण केलेल्या सुविधा कमी पडतील. आपण आरोग्य सुविधा उभ्या करू, पण डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे- मुख्यमंत्री
Mar 8, 2021 14 tweets 6 min read
#MahaBudgetSession

Budget 2021-22
Highlights #MahaBudgetSession

Budget 2021-22
Highlights

Macro Economy for Maharashtra
Mar 8, 2021 5 tweets 3 min read
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यातील जास्तीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील सदस्यांची एकत्रित बैठक आयोजित करणार- जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil #विधानपरिषदप्रश्नोत्तरे
एका सर्व्हेच्या माध्यमातून भारतीय महिलांची बदनामी करणाऱ्या ग्लीडेन या फ्रेंच ॲपवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार. याप्रकरणी आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू- महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC
Mar 8, 2021 60 tweets 11 min read
आज ८ मार्च... हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपणा सर्वांना माहित आहे. त्या निमित्ताने मी सुरुवातीलाच राज्यातील सर्व माता-भगिनींना, युवती-विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो- उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks

#MahaBudgetSession शुभ शकुनांचं तोरण तू
मांगल्याचं औक्षण तू,
झिजतानाही दरवळणार
देव्हाऱ्यातील चंदन तू...

स्त्री नसते केवळ वस्तू
ती नसते केवळ जननी,
ती असते नवनिर्मितीची गाथा,
जिथे आपण सर्वांनी टेकावा माथा...
#MahaBudgetSession
Jun 15, 2020 11 tweets 3 min read
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली शालेय शिक्षण विभागाची बैठक. शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता देण्यासह मुख्यमंत्र्यांनी शालेय शैक्षणिक वर्षाचा केला शुभारंभ. शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित. #कोरोना मुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी #COVID_19 चा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि शहरांपासून दूरवरील शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करणार. तसेच इतर ठिकाणी ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शिक्षण सुरु होणार- मुख्यमंत्री
Jun 11, 2020 5 tweets 3 min read
महाराष्ट्रामध्ये #COVID_19 बाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय आरोग्यमंत्री @drharshvardhan यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा. राज्याचे आरोग्यमंत्री @rajeshtope11 , प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी सहभागी. #कोरोना च्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे नव्याने ५०० बेड्स आठवडाभरात उपलब्ध होणार. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देणार. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के. धारावी भागातून रुग्ण येण्याची संख्या मंदावली- मंत्री@rajeshtope11
May 8, 2020 9 tweets 4 min read
स्थलांतरित मजुरांना विविध राज्यांत पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध. मात्र, बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नाहीत. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून स्पष्ट निर्देश द्यावेत, अन्यथा मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल- महसूलमंत्री @bb_thorat यांनी व्यक्त केली चिंता महाराष्ट्रातून गृहराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या अंदाजे १० लाखांपेक्षा जास्त. आतापर्यंत स्थलांतरित मजुरांना घेऊन ३२ ट्रेन वेगवेगळ्या राज्यात रवाना. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पश्चिम बंगाल आणि ओरिसा या दोन राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात- महसूलमंत्री @bb_thorat
May 5, 2020 6 tweets 3 min read
#coronavirus चे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा- आरोग्यमंत्री @rajeshtope11 राज्यात कालपर्यंत एकूण २४६५ कोरोना बाधित रुग्ण झाले बरे. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ. सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण, त्यापाठोपाठ पुणे मंडळात ११० रुग्णांना घरी सोडले- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
May 2, 2020 5 tweets 2 min read
#मुंबई#पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा
1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासाच्या परवानगीचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना 2️⃣ असे अधिकार असले तरीही #मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
Apr 12, 2020 13 tweets 6 min read
#CoronaVirusUpdate
आज नवीन २२१ #coronavirus बाधित रुग्णांची नोंद. राज्याची एकूण संख्या झाली १९८२. #कोरोना विषाणू बाधित २१७ रुग्ण बरे होऊन गेले घरी. सध्या १६१६ रुग्णांवर उपचार सुरू- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती #coronavirus बाधित राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका १२९८ (मृत्यू ९२)
ठाणे ६
ठाणे मनपा ४४ (मृत्यू ३)
नवी मुंबई मनपा ४५ (मृत्यू ३)
कल्याण डोंबवली मनपा ४६ (मृत्यू २)
उल्हासनगर मनपा १
भिवंडी निजामपूर मनपा १
मीरा भाईंदर मनपा ४२ (मृत्यू १).......
Apr 11, 2020 12 tweets 5 min read
#CoronaVirusUpdate
आज नवीन १८७ #coronavirus बाधित रुग्णांची नोंद. राज्याची एकूण संख्या झाली १७६१. #कोरोना विषाणू बाधित २०८ रुग्ण बरे होऊन गेले घरी. सध्या १४२६ रुग्णांवर उपचार सुरू- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती #coronavirus बाधित राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका ११४६ (मृत्यू ७६)
ठाणे ६
ठाणे मनपा २९ (मृत्यू ३)
नवी मुंबई मनपा ३६ (मृत्यू २)
कल्याण डोंबवली मनपा ३५ (मृत्यू २)
उल्हासनगर मनपा १
मीरा भाईंदर मनपा ३६ (मृत्यू १)
पालघर ४ (मृत्यू १).......