2019 च्या एप्रिलमध्ये लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा इथ राहुल गांधींचा "Pune Students Dialogue" हा कार्यक्रम होणार होता. त्याचे पासेस आमच्या कॉलेजात आले होते आणि योगायोगाने मला त्याचे 4 पासेस मिळाले. मग माझा मित्र निखिल मी आणि आमच्या.. (1/)👇
2 मैत्रिणी असे चौघे तिथ गेलो. आमच्या मनात तोपर्यंत WhatsApp फेसबुक, यू ट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातुन रागाची 'Immature पप्पू' हीच image थोपवलेली होती. जरी मी #भाजप आणि #संघ विचारांचा विरोधी असलो तरी रागाची image इतरांप्रमाणे माझ्याही मनात "पप्पू" अशीच होती पण तरीही.. (2/)👇
या माणसाला जवळून ऐकण्याची संधी मिळतेय म्हणून मग आम्ही गेलो. आपला सुबोध भावे आणि RJ @mymalishka यांनी उत्तम सूत्रसंचलन केल होत कार्यक्रमाचं.
त्यादिवशी मी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं राहुल गांधी ह्या माणसाला भेटलो. अगदी लहान वयात आपल्या आजीचं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं...(3/)👇
शरीर आणि आपल्या बापाच्या चिंधड्या बघून सुद्धा हे सारं पचवण आणि पुन्हा त्याच क्षेत्रात उतरण याला खरच कमालीचं धाडस लागत.
रागाचा देशातल्या दारिद्रय़ रोजगार उद्योग आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वच शिक्षण व्यवस्था यावरचा अभ्यास आणि दृष्टिकोन बघून तर मी अवाक् झालो. जगात...(4/)👇
भारताला महासत्ता बनवण्यासाठी आपल्या तरुणांमधे असणार्या potential ची पुरेपूर जाण आणि त्यासाठीच्या योजना या माणसाकड तयार आहेत. ग्रेट यंग मॅन आहे हा माणूस.
राहुल गांधीला ऐकून एक गोष्ट मात्र जाणवली ती म्हणजे - त्यांच्याकड सगळ्या गोष्टींच knowledge आहे सगळ्या..(5/)👇
समस्यांची त्यांना जाणीव आहे आणि त्याचे उपायसुद्धा आहेत. पण ते त्यांना सामान्य माणसापर्यंत पोहोचवता येत नाहीत. त्यात मुख्य अडचण भाषेची आहे. बाकी नेत्याप्रमाण त्यांना लोकांच्या भाषेत त्यांच म्हणणं मांडता येत नाही. म्हणुन इंग्रजी भाषेबाहेर राहुल पोहोचत नाहीत याचाच...(6/)👇
फायदा घेऊन आजवर #भाजपा ने त्याचं प्रतिमाहणण केल. पण मागच्या 2 वर्षात परिस्थिती बदलायला लागलीये राहुल लोकांपर्यंत पोहोचायला लागलेत आणि लोकांनाही राहुल समजायला लागलेत. ज्यांनी राहुलला जवळून ऐकलय आणि समजून घेतलंय त्यांना माहिती हा माणूस काय चीज आहे !!
त्या दिवशी...(7/)👇
त्यांना ऐकलं आणि स्वतः चीच लाज वाटली. कुणाच्यातरी खोट्या प्रचारामुळ एका भल्या माणसाला एवढं बदनाम केल जात होतं आणि आपणही त्यात वाटेकरी होतो याचा खेद वाटला.
मी त्या दिवशी तिथं ऐकायला गेलो खरा पप्पूला पण येताना सोबत घेऊन आलो एक हिरो-खरा गांधी-राहुल गांधी.
त्यानंतर.(8)👇
जेंव्हा-जेंव्हा जिथ-जिथ कुणी राहुलला पप्पू म्हणताना मी ऐकतो तेंव्हा मला फक्त गालातल्या गालात हसायला येत कारण आता मला माहितीये actually पप्पू कोण आहे. 🙏
माझ्या या आवडत्या तरुण नेत्याला @RahulGandhi हार्दिक शुभेच्छा 🌹💐