एखाद्या घटनेवर पत्रकार कसे प्रतिक्रिया देतील यावर #थ्रेड
रजनीश कुमार: आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार भकासपुर गावात गाईला दोन खोंड झाले आहेत, गाईचा मालक स्वतःला जुळे झाले तेव्हा खुश नव्हता एवढा खुश आहे.
इस देश में इंसान के बच्चे से जादा गाय के बच्चे को अहमियत दी जा रही है! १/९
राजीव वांदेकर : नमस्कार तुम्ही पहात आहात माझा तोंडपट्टा, आणि आज आपल्यासोबत आहेत एकाच वेळी जुळे देणारे, माफ करा जुळे देणाऱ्या गाईचे मालक.
तर मालक, असंय की, आमच्या प्रेक्षकांना हे कळलंच पाहिजे, म्हणून मला तुम्ही सांगा हे कसं झालं?
२/९
निखिल वेगळे: नमस्कार, हा गोठा जरी यांचा असला तरी हा शो माझा आहे, आणि हे जे तुम्ही चालवलं आहे ते मला अजीबात मान्य नाही, गाईला दोन्ही खोंड च का झाली, एखादी कालवड का नाही? हा लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे, मी याचा निषेध करतो. ३/९
विशेष जाधव: नमस्कार, तुम्ही पहात आहे खा चोवीस तास, आणि आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार एका गाईला दोन खोंड झाले आहेत
(मनातून) त्या पेक्षा दोन बोकड झाले असते तर रविवारची सोय तरी झाली असती #मटनवार_रविवार ४/९
हर्षदा सो कुल: नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या Vlog मध्ये. आजचा विषय एकदम वेगळा आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत, गाईला खोंड कसे होतात, त्यासाठी काय प्रोसेस असते, ऑस्ट्रेलिया ची खोंडे भारताच्या खोंडापेक्षा कशी वेगळी असतात, त्यामुळे पटकन चॅनल ला सबस्क्राईब करा ५/९
भाऊ तोडफोडकर: या दोन खोंडामुळे आमचं संख्याबळ १०८ झाले आहे, आणि पुराणात १०८ ला विशेष महत्व आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना राज्य करण्याचा काहीही अधिकार नाहीये तुम्हाला सांगतो.
तात्काळ हे सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि खोंडराज्य आणले पाहिजे ६/९
रवींद्र शोधकर: तुमचे स्वागत आहे माझे चॅनल मिनीमहाराष्ट्र वर आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार गाईला दोन खोंड झाले आहेत. त्या खोंडाना मी एवढंच सांगू इच्छितो की ट्रोल करणाऱ्या कोंबडीच्या पिल्लांना अजिबात घाबरु नको, माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे, आपण त्यांचा खुराडा शोधून काढू. ७/९
अंजना ओम शेठ: जो सत्तर साल मे नही हुआ वो आज हुआ है, गाय को हुआ खोंड. ये शेठ की नीतियों की बदौलत मुमकिन हुआ
(पाठीमागून कोणीतरी): अहो गाईला खोंडच होतात.
अंजना: 😧
ओरड गोस्वामी: नेशन वांट्स टू क्नो, क्या ये पड़ोसी मुल्क की चाल है?
८/९
चॅनलचे सोशल मीडिया हॅण्डल करणाऱ्यांच्या पोस्ट:
गाईला झाले असे काहीतरी की पाहून तुम्ही थक्क व्हाल😳 #क्लिकबेट
टिप: कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही🙏
९/९
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh