#छ्त्रपती_संभाजी_महाराज🚩 #मराठी#म
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील कामगिरीचे वैशिष्ट्य असे की, त्यांना आपल्या कारकिर्दीत एकट्या मोगलांशीच संघर्ष करावा लागला असे नाही; तर सिद्दी आणि पोर्तुगीज या दोन प्रबळ आरमारी सत्तांशीही त्यांना झुंज द्यावी लागली.
(१/८)
१६८२ ते १६८४ या कालातील महाराजांच्या हालचाली पाहिल्या तर असे दिसून येते की, हा मराठ्यांचा राजा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांशी लढत असतानाच या दोन शत्रूंशीही संघर्ष करतो आहे. अशा प्रकारे तिन्ही शत्रूंशी लढत असता, त्याच्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी काही....
(२/८)
इतिहासकारांनी तीन सत्तांशी लढा सुरू केल्याबद्दल महाराजांवरच ठपका ठेवला आहे; पण त्यात काही तथ्य नाही कारण या तिन्ही सत्तांनीच आपणहून संभाजीराजांशी शत्रुत्व सुरू केले होते. तेव्हा अशा शत्रूंवर स्वाऱ्या करून त्यांना शिक्षा करणे, हे राजा म्हणून संभाजीराजांचे आद्य कर्तव्य होते.
(३/८)
इतिहास सांगतो की त्या कालखंडात या तिन्ही सत्तांशी महाराजांनी यशस्वीपणे लढा दिला.भले सिद्दीची दंडराजापुरी अथवा पोर्तुगिजांचा गोवा घेण्याइतपत त्यांना दुर्दैवाने फुरसत मिळाली नसेल पण या दोन्ही शत्रूंवर त्यांनी आपल्या पराक्रमाने जबरदस्त दहशत बसविली होती हे अमान्य करता येईल काय?
(४/८)
व्हाइसरॉयने तर गोव्याची राजधानीच उठवून मुरगाव बंदरात नेण्याचा निर्णय महाराजांच्या दहशतीपोटी घेतला होता! दहशतीपोटीच ते मराठ्यांच्या या राजाला सार्वभौम पातशहासारखा मानमरातब देऊ लागले. १७ व्या शतकातील हिंदुस्थानच्या इतिहासात कोणाही हिंदी सत्तेला अभिमान वाटावा अशी ही घटना आहे !
(५/८)
उपरोक्त तिन्ही सत्तांशी लढत असता, त्यातील मोगलांशी जो संघर्ष चालू होता, त्या आघाडीवर धर्मवीर संभाजी महाराज कमी पडले का, या प्रश्नाचे उत्तर शोधू पाहता असे दिसते की, ते या आघाडीवरही कमी पडले तर नाहीच, उलट बादशाही फौजांना व बादशहाला त्यांनी त्राही भगवान करून सोडले.
(६/८)
खुद्द बादशहा तर छ्त्रपती संभाजी महाराजांच्या प्रखर प्रतिकाराने इतका संतापून गेला की, त्याला आपली पगडी रागाच्या भरात जमिनीवर आपटून फेकून द्यावी लागली आणि संभाजीचा नायनाट केल्यावरच ती धारण करीन अशी प्रतिज्ञाही त्याला करावी लागली!
(७/८)
म्हणूनच खाफीखानाने संभाजी महाराजांच्या या पराक्रमाकडे पाहून उद्गार काढले आहेत, की “संभाजीराजा शिवाजीराजापेक्षा औरंगजेब बादशहाला दहापटीने तापदायक शत्रू ठरला!”
दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला......👇
युद्ध म्हटले कि विजय किंवा पराभव.पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?
या युद्धानंतर काय झाले? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण ३ पिढ्या मराठ्यांच्या गेल्या पण कणा मोडला तो गनिमांचा
शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली.अब्दालीचे कंबरडे मोडले घरी जाऊन तो मेला.अर्यावार्ताला पुन्हा सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही. हेच तर साधायचे होते या युद्धातून! साधले! पराभव कुठे झाला?
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती आहुती म्हणजे देशप्रेम.