दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला......👇
युद्ध म्हटले कि विजय किंवा पराभव.पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?
या युद्धानंतर काय झाले? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण ३ पिढ्या मराठ्यांच्या गेल्या पण कणा मोडला तो गनिमांचा
शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली.अब्दालीचे कंबरडे मोडले घरी जाऊन तो मेला.अर्यावार्ताला पुन्हा सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही. हेच तर साधायचे होते या युद्धातून! साधले! पराभव कुठे झाला?
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती आहुती म्हणजे देशप्रेम.
पुन्हा मराठ्यांकडे कोणी देशप्रेमाचे दाखले मागू नयेत!
मराठे एकाकी लढले!
बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. एकवेळ अब्दाली चालेल पण मरहटे नकोत!
एक होऊन लढले नाहीत सगळे,
मराठा एकाकी पडला,
पण अडला, नडला आणि थेट भिडला!
पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान! सर्वोच्च कार्यक्षमता!
ज्यांच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत!
मराठा का एकाकी पडला?
आपल्याविषयी विश्वास निर्माण कराया का कमी पडला?
का परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका वाटला?
आज या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे!
महाराष्ट्राला या देशाचे नेतृत्व करायचे असेल, तर अवघ्या देशाचा विश्वास आपण मिळवला पाहिजे. सर्व देशात आदराचे स्थान मिळवले पाहिजे!
पानिपत म्हणजे दुसर्यांवर विजय, आणि आपल्याकडून पराभव!
आपल्याच लोकांमध्ये बेबनाव, आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका!
या अर्थी पानिपत एक शिकवण! आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल…
आम्ही यास लढाई म्हणत नाही,
हे युद्ध!
महाभारतासारखेच महत्वाचे!
मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा,
आपला अभिमान आपले देशप्रेम आपला त्याग,
ज्यावर प्रत्येक मराठ्याला गर्व वाटावा,
आपण न थकता तो सांगावा, देशाला, जगाला!
कारण पानिपत म्हणजे माझ्या राष्ट्राचा हुंकार!
एक पर्व संपले!
आक्रमणाचे, नाचक्कीचे, बलात्कारांचे…
इतिहास अभ्यासकांच्या भाषेत,
मध्ययुग संपले आणि
आधुनिक इतिहासास प्रारंभ झाला,
तो दिवस...
#छ्त्रपती_संभाजी_महाराज🚩 #मराठी#म
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील कामगिरीचे वैशिष्ट्य असे की, त्यांना आपल्या कारकिर्दीत एकट्या मोगलांशीच संघर्ष करावा लागला असे नाही; तर सिद्दी आणि पोर्तुगीज या दोन प्रबळ आरमारी सत्तांशीही त्यांना झुंज द्यावी लागली.
(१/८)
१६८२ ते १६८४ या कालातील महाराजांच्या हालचाली पाहिल्या तर असे दिसून येते की, हा मराठ्यांचा राजा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांशी लढत असतानाच या दोन शत्रूंशीही संघर्ष करतो आहे. अशा प्रकारे तिन्ही शत्रूंशी लढत असता, त्याच्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी काही....
(२/८)
इतिहासकारांनी तीन सत्तांशी लढा सुरू केल्याबद्दल महाराजांवरच ठपका ठेवला आहे; पण त्यात काही तथ्य नाही कारण या तिन्ही सत्तांनीच आपणहून संभाजीराजांशी शत्रुत्व सुरू केले होते. तेव्हा अशा शत्रूंवर स्वाऱ्या करून त्यांना शिक्षा करणे, हे राजा म्हणून संभाजीराजांचे आद्य कर्तव्य होते.
(३/८)