#मराठा 🚩🚩 Profile picture
मराठा समाजाच्या प्रश्नांवर आवाज उचलणे तसेच विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे खाते कार्यरत राहील. जयोस्तु मराठा🚩🚩
Apr 1, 2022 11 tweets 3 min read
#गुढीपाडवा_आणि_युवराज_संभाजी_महाराज
गुढी पाडवा दरवर्षी जसा जवळ येतो तस त्याबद्दल अपप्रचाराला सुरुवात होती. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने ब्राम्हण मंत्र्यांच्या सांगण्यावरून मनुस्मृती कायद्यानुसार केली, आणि त्याच प्रतिक म्हणून त्या दिवसापासून आजचा गुढीपाडवा सण सुरु झाला. असा कसलाही संदर्भ नसलेला खोटा इतिहास पसरवला जातोय.
मुळात गुढीपाडव्याचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. शालिवाहनांच्या विजयाच प्रतिक म्हणून गुढीपाडवा महाराष्ट्रात इ.स.१ ल्या शतकापासून साजरा होत आलेला आहे. १२ व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी” लिहली.
Mar 31, 2022 7 tweets 2 min read
#संभाजीराजेंची_हत्या_आणि_गुढीपाडवा
औरंगजेबाच्या दरबारातील आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास नागर याने लिहिलेल्या “फुतूहात-इ-आलमगीर” या ग्रंथातील
संदर्भ:- (मूळ फारसी भाषेत असलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी केले.) “बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलास खान आणि बहादूर खान हे संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेऊन बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशाहने आज्ञा केल्यावरून इखलास खान आणि हमिदुद्दीनखान यांनी संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची हजार प्रकारे फजिती करण्यात आली.
Jul 21, 2021 10 tweets 3 min read
#पानिपत🔥🚩 #मराठी #म

दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला......👇 युद्ध म्हटले कि विजय किंवा पराभव.पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?
या युद्धानंतर काय झाले? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण ३ पिढ्या मराठ्यांच्या गेल्या पण कणा मोडला तो गनिमांचा
Jul 20, 2021 9 tweets 4 min read
#छ्त्रपती_संभाजी_महाराज🚩 #मराठी #म
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील कामगिरीचे वैशिष्ट्य असे की, त्यांना आपल्या कारकिर्दीत एकट्या मोगलांशीच संघर्ष करावा लागला असे नाही; तर सिद्दी आणि पोर्तुगीज या दोन प्रबळ आरमारी सत्तांशीही त्यांना झुंज द्यावी लागली.
(१/८) ImageImage १६८२ ते १६८४ या कालातील महाराजांच्या हालचाली पाहिल्‍या तर असे दिसून येते की, हा मराठ्यांचा राजा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांशी लढत असतानाच या दोन शत्रूंशीही संघर्ष करतो आहे. अशा प्रकारे तिन्ही शत्रूंशी लढत असता, त्याच्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी काही....
(२/८)