अमेरिका स्वतः माघारी फिरले.. मग नागरिकांमध्ये लपून बसलेले तालिबानी बाहेर पडले आणि अफगाणिस्तान वर कब्जा केला.. जर हा तालिबानचा विजय आणि अमेरिकेचा पराभव
तर..
१७६१ साली भारतावर आक्रमण केलेल्या अब्दालीला मराठ्यांनी थेट भिडून वापस पाठवून दिले.. मग हा मराठ्यांचा पराभव कसा ??
पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही.. तर मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास आहे
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत निश्चितच मराठ्यांच मोठ नुकसान झालं.. खूप सैनिक गमावले.. अपेक्षित यश मिळाले नाही.. पण मराठ्यांनी देश वाचविला.. अहमदशहा अब्दाली आल्या हाती परत गेला..
नाही म्हणता थोडे फार मराठा सैनिक युद्धबंदी बनवून घेऊन गेला.. पण अब्दालीच्या सैन्याचे अतोनात नुकसान झाले..
आताच्या पाकिस्तान मधील काही भाग मराठ्यांनी गमवला.. पण ज्या उद्देशासाठी अब्दाली भारतात आला होता तो मुघलांना परत सत्ता मिळवून देण्याचा अब्दालीचा उद्देश साध्य झाला नाही..
हाच मराठ्यांचा मोठा विजय आहे
पानिपतच्या तिसऱ्या लढाई नंतर अवघ्या दहा वर्षात मराठ्यांनी पुन्हा दिल्ली काबीज केली.. इंग्रजांनी दिल्ली मराठ्यांकडून घेतली.. मोगलांकडून नव्हे
अस म्हणतात जर मराठ्यांनी युद्ध लढल नसत तर आज पाकिस्तानच्या सीमा दिल्ली पर्यंत असत्या @PuneriKul1
मातृभूमीच्या रक्षणार्थ युद्धात लढलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन
जय भवानी 🚩
जय शिवराय 🚩
हर हर महादेव 🚩
साभार: सुमित मोरे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
खंडित भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳
.
.
.
खरच.. पण आपण स्वतंत्र आहोत का?
१)ज्या भागावर आपल्या पूर्वजांनी भगवा ध्वज फडकावला तो भाग शत्रु राष्ट्राने कधीच गिळंकृत केला आहे..
२) परम पावित्र अशी आपली सिंधु नदी जी आजून पण स्वतंत्र हिंदुस्थानाच्या अधिपत्याखाली येत नाही तो पर्यंत आपण स्वतःला स्वतंत्र कस म्हणणार.
३) गिलगित बल्टिस्तानसह संपूर्ण काश्मीर हिंदुस्थानामधे जो पर्यंत समाविष्ट होत नाही, तो पर्यंत कसल आलय स्वातंत्र्य..
४) १९४७ पासून ते आतापर्यंत आपण कधी विचार केला आहे की आपल्या भारत भू च्या रक्षणासाठी, संपूर्ण काश्मीर साठी आपले किती भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत..
महालक्ष्मी मंदिर हे एक महत्वाचे हिंदू मंदिर आहे जे देवी महालक्ष्मीला समर्पित आहे, भारताच्या प्राचीन कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे.. देवी पुराणानुसार हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.
शक्तीपीठ स्तोत्रम च्या शंकर संहिता नुसार १८ महाशक्तीपीठांपैकी एक.. वेंकटेश्वर कल्याणम च्या मागे असलेल्या कथेसह, महाविष्णूशी लढा दिल्यानंतर आणि खोलासुराचा वध केल्यावर महालक्ष्मी येथे राहिली असे म्हटले जाते..
हे मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार चालुक्य साम्राज्याचे आहे.
पहिल्यांदा ७ व्या शतकात बांधले गेले.
अनेक पुराणांमध्ये मंदिराचा उल्लेख आहे. शिलाहारा, देवगिरी राजवटीतील यादव यांनी या शहराला भेट दिल्याचा पुरावा आहे. आदि शंकराचार्यांनीही भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या मंदिराला नियमित भेटी दिल्या आहेत 🙏
त्यांचा जन्म भाद्रपद शुद्ध द्वितीय,श्री शालिवाहन शके १६५२,साधारण नाम संवत्सरी,सोमवारी म्हणजेच ४ ऑगस्ट १७३० रोजी झाला.
आज त्यांच्या जन्म दिवशी एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करणे गरजेचे आहे ते म्हणजे कानपूर स्थित "भाऊपुर" शहर
२९ डिसेंबर ला माननीय पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील "न्यू भाऊपूर-न्यू खुरजा" मालवाहतूक रेल्वे लाईनचे लोकार्पण केले. हे भाऊपूर म्हणजेच मराठा साम्राज्याचे सकलराजकार्यधुरंधर, श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ नामकरण केलेले एक महत्वाचे औद्योगिक गाव आहे🙏🚩
सदाशिवरावभाऊ सारख्या सेनानीचा पानिपतच्या लढाईत दुर्देवी अंत झाला. भाऊंनी त्यांच्या कार्य काळात कधीही मोठेपणाची हाव केली नाही पण त्याग मात्र केला. मराठा राज्याच कल्याण हे त्याचे एकमेव ध्येय होते.चोख कारभारी, दृढनिश्चयी, प्रचंड पराक्रमी सदाशिवराव भाऊसाहेबांना त्रिवार अभिवादन 🙏🚩
श्री शिवराज्याभिषेक सोहळा
हिंदू साम्राज्य दिवस🚩🚩🚩
शिवशक ३४८ प्रारंभ...
“हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” अशी शपथ घेऊन रायरेश्वराच्या मंदिरातुन सुरू झालेला प्रवास, हा “जेष्ठ शुद्ध त्रयोदशी,शके १५९६” रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होऊन संपन्न झाला.
शिवराज्याभिषेक सोहळा हा पूर्णपणे वैदिक हिंदू पद्धतीने केला गेला, तेव्हाच आपल्याला हिंदूंचा राजा मिळाला व खऱ्या अर्थाने हिंदुसाम्राज्याची सुरुवात झाली. म्हणूनच हिंदुसाम्राज्य दिन!🚩
आजच्याच दिवशी चार पातशहिंच्या छाताडावर पाय देऊन शिवाजी राजे आखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले..🙏
समर्थ रामदास स्वामी:-🙏
" तीर्थक्षेत्रे मोडीली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥
देव धर्म गोब्राह्मण । करवाया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची जेव्हा चीनींनी कपटाने आपल्या भारतीय सेनेवर हल्ला चढवला होता..
१४-१५ जून २०२० च्या अश्याच बेसावध रात्री चिनी सैनिकांनी भारताच्या जमिनीवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला.
१/५
एकाकी खिंड लढवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे सारखा एक फक्त २३ वर्षाचा एकटा तरुण चिनी सैनिकांशी दोन हात करत होता. ११ चिनी सैनिकांचा खात्मा केल्यावर चीन चे सैनिक पूर्णतः घाबरून गेले की एक भारतीय सैनिक आपल्या ११ सैनिकांना पुरून उरतो.
२/५
समोरून त्याला रोखण्याचा कोणताच मार्ग दिसत नसताना चिनी सैनिकांनी आपल्या परंपरेला जगताना त्याच्या पाठीमागून हल्ला केला. त्याच्या पाठीत चाकू खुपसला. त्या अवस्थेत ही त्या सैनिकाने पुन्हा आपल्या पगडीने त्या १२ व्या चिनी सैनिकाचा खात्मा केला.