सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम कलाकारांपैकी एक म्हणून जगभरात ख्यातकीर्त आहेत. ‘भारतरत्न’ देऊन 1999 साली
त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्यावरील @Films_Division चा माहितीपट पाहा
📹
संगीतातला आठवा सूर म्हणून ओळखल्या जाणारया स्वर्गीय सूर लाभलेल्या भारतरत्न एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांनी कर्नाटकी संगीतात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायिका म्हणून अजरामर स्थान निर्माण केले आहे. त्यांच्यावरील विशेष माहितीपट पाहा
जागतिक कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ भारतरत्न चिंतामणी नागेश रामचंद्र उर्फ सीएनआर राव यांनी घनरूप आणि संररचनात्मक रसायनशास्त्र संशोधनात बहुमूल्य योगदान दिले आहे. त्यांना जगभरातील 83 विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरवले आहे. त्यांच्यावरील माहितीपट पाहा
भारत पारतंत्र्यात असतांनाच देशात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात महत्वाचे योगदान अभियंते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, देशातील महान सिव्हिल इंजिनियर आणि राजनीतिज्ञ होते. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
संत नरसिंह मेहता यांचे भजन “वैष्णव जन तो..” महात्मा गांधी यांच्या जीवनकाळात देशभर लोकप्रिय झाले होते.महात्माजी त्यांच्या अनुयायांसह स्वतः साबरमती आश्रमात हे भजन गात असत. स्वातंत्र्यसैनिकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. या भजनावरील माहितीपट आपण इथे बघू शकता.
अवूल पाकिर जैनऊलबदिन अब्दुल कलाम : भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती आणि लोकप्रिय वैज्ञानिक भारतीय मिसाईल मैन डॉ एपीजे अब्दुल कलाम अवकाश वैज्ञानिक होते. 2002 ते 2007 या काळात ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांच्याविषयीचा माहितीपट आपण इथे बघू शकता
पंडित भीमसेन जोशी, हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील एक अग्रणी नाव. किराणा घराण्याची परंपरा पुढे नेणारे आणि आपल्या ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्यावरील विशेष माहितीपट
सनईचे सूर आठवले की प्रत्येकाच्या मनात येणारं पहिलं नाव म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खाँ. बनारसच्या कलावंतांच्या मातीतले उस्ताद बिस्मिल्ला खाँ, शहनाई वादनातले तपस्वी होते. 2001 साली त्यांचा भारतरत्न ने गौरव करण्यात आला. त्यांच्यावरील चित्रपट
सर चंद्रशेखर व्यंकट रमण: भारताचे सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ डॉ सी व्ही रमण ‘प्रकाशाच्या परावर्तनाविषयीच्या’ आपल्या संशोधनासाठी ओळखले जातात. नोबेल पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय वैज्ञानिक असलेल्या सी वी रमण यांच्यावरील विशेष माहितीपट
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
*⃣New Cases- 3,586
*⃣Recoveries- 4,410
*⃣Deaths - 67
*⃣Active Cases - 48,451
*⃣Total Cases till date - 65,15,111
*⃣Total Recoveries till date - 63,24,720
*⃣Total Deaths till date - 1,38,389
*⃣Tests till date - 5,67,09,128
केंद्रीय सशस्त्र पोलीस बलातर्फे सुरु असलेल्या 'अखिल भारतीय वृक्षरोपण अभियान-2021' अंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांनी महाराष्ट्रातल्या नांदेड इथे सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात 1 कोटी व्या वृक्षाचे रोपण केले
*⃣New Cases- 3,595
*⃣Recoveries- 3,240
*⃣Deaths - 45
*⃣Active Cases - 49,342
*⃣Total Cases till date - 65,11,525
*⃣Total Recoveries till date - 63,20,310
*⃣Total Deaths till date - 1,38,322
*⃣Tests till date - 5,65,29,882