नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...
संघाच्या प्रार्थनेला चाल देऊन पहिल्यांदा गाणारे श्री यादवराव जोशी यांचा आज जन्मदिन !
आज संघाचे जे विशाल स्वरूप नजरेसमोर येते ते अनेक लोकांनी केलेल्या त्याग व बलिदानामुळे.
1 Image
आपल्या अंगभूत कौशल्य व कलागुणांचा उपयोग करून करोडपती होऊ शकले असते असे काही महान लोकं संघाच्या संपर्कात आले व आपले सर्वस्व संघाला अर्पण केले. त्यातीलच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे श्री यादवराव जोशी.
त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९१४ रोजी नागपुरात झाला. आई-वडिलांचे ते एकमेव पुत्र होते.2
आई-वडिलांचे ते एकमेव पुत्र होते. लहानपणापासूनच त्यांना गायनाची प्रचंड आवड होती. गळ्यात साक्षात गंधर्वांचे वास्तव्य असावे असा त्यांचा आवाज होता. ते नऊ वर्षांचे असतांना चिटणीस पार्कच्या मैदानात गायनाचा कार्यक्रम होता.त्याकाळी आजच्यासारखी मनोरंजनाची साधने नव्हती.
3
गायनाचा कार्यक्रम म्हटला की खूप गर्दी व्हायची. अनेक दिग्गज गायकांनी आपली सेवा दिली. या भरगच्च गर्दी असलेल्या गायनाच्या कार्यक्रमात आयोजकांनी यादवला गाण्याची संधी दिली व या संधीचे सोने केले.अप्रतिम गायला. गायन आटोपल्यानंतर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
4
संगीत सम्राट सवाई गंधर्वांनी यादवची खूपच प्रशंसा केली.
सर्व दिग्गज गायकांनी सर्वसंमतीने त्यांना " बालभास्कर " हा खिताब याच कार्यक्रमात बहाल केला. मित्रांच्या व यादवच्या संगीत शिक्षकाच्या आग्रहास्तव प.पू. डाॅक्टर हेडगेवार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
5
त्यांनी यादवाचे मंत्रमुग्ध करणारे गायन ऐकले आणि त्यांच्या डोक्यात विचार आला की यादवाच्या आवाजाचा संघासाठी उपयोग करून घेतला तर? बाजूलाच यादवचे संगीत क्षेत्रातील गुरू शंकरराव प्रवर्तक बसलेले होते. त्यांनी यादवची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून मिळविली
6
मला संघकार्यासाठी हा मुलगा देता का ही विचारणा केली.तुम्हाला नाही कसे म्हणणार असे म्हणत ठीक आहे, आजपासून यादव तुमचाच म्हणाले व यादवला डाॅक्टरांच्या स्वाधीन केले व यादव पुर्णतः संघमय झाला. बहुसंख्य संघगीतांना यादवरावांनी चाली लावल्या आहेत.
7
नरहरी नारायण भिडे रचित " नमस्ते सदा वत्सले मात्रूभुमे" या वर्तमान प्रार्थनेला यादवरावांनीच चाल लावली व पहिल्यांदा त्यांनीच संघाच्या कार्यक्रमात गायली.त्यांची ही विलक्षण प्रतीभा व संगीत साधना पाहून पंडित भीमसेन जोशी देखील थक्क झाले होते.
8
त्यांनी ,जर यादवराव संगीत क्षेत्रात रमला असता तर या भीमसेन जोशीला संगीत क्षेत्रात वाव मिळाला नसता असे गौरवोद्गार काढले.भीमसेन जोशींनी यादवरावांबद्दल हे उद्गार काढणे हेच यादवरावांच्या संगीत क्षेत्रातील तयारीचे दिग्दर्शन करतात.
9
एम्. ए. व कायद्याची परिक्षा पास करून यादवराव संघाचे प्रचारक म्हणून निघाले. सुरवातीला झांशी हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. काही महिन्यानंतर प.पू. डाॅक्टर हेडगेवारांची प्रकृती ढासळली त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी यादवरावांना नागपुरात बोलावून घेतले.
10
१९४१ मध्ये त्यांना कर्नाटकात प्रांत प्रचारक म्हणून दायित्व दिल्या गेले. त्यानंतर दक्षिण क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, अ.भा. प्रचार प्रमुख, सेवा प्रमुख, आणि १९७७ ते १९८४ याकाळात सह सरकार्यवाह होते.
11
दक्षिणेतील विविध भाषांमध्ये पुस्तक प्रकाशन,सेवा व संस्कृत प्रचार यात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. भारतभारतीद्वारा लहान मुलांसाठी ५०० लघुपुस्तकांचे प्रकाशन यादवरावांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते.१९६२ ला त्यांनी बेंगलोरमध्ये दहा हजार गणवेषधारी स्वयंसेवकांचे शिबीर घेतले.
12
१९८३ मध्ये विहिप द्वारा आयोजित शिबीर ज्यात ७०,००० प्रतिनिधी व एक लाखावरील पर्यवेक्षक उपस्थित होते. हे संपूर्ण शिबीर यादवरावांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. त्यांचे नियोजन व त्याचे कार्यान्विकरण करण्याची क्षमता विलक्षण होती.
13
आयुष्याचा प्रत्येक क्षण संघासाठी जगणाऱ्या यादवरावांची जीवनज्योत २० ऑगस्ट १९९२ ला मावळली. त्यांचे जीवन हे आपल्यासाठी मार्गदर्शक तत्व बनलेले आहे.आपले सर्वस्व संघासाठी पर्यायाने राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या अशा महान लोकांमुळेच संघ उत्तरोत्तर वाढत आहे.
14
आज ते जगातील सर्वात मोठे सामाजिक संघटन ठरले आहे.
श्री यादवरावांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
15

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Umesh Khandelwal

Umesh Khandelwal Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @umeshk1881

6 Sep
१.
*क्या करोगे इतनी संपत्ति कमाकर* ? *तुम्हारा समाज तो वैसे ही खत्म हो जाना है*
एक दिन पूरे काबुल (अफगानिस्तान) का व्यापार सिक्खों का था, आज उस पर तालिबानों का कब्ज़ा है |
-सत्तर साल पहले पूरा सिंध सिंधियों का था, आज उनकी पूरी धन संपत्ति पर पाकिस्तानियों का कब्ज़ा है |
२.
एक दिन पूरा कश्मीर धन धान्य और एश्वर्य से पूर्ण हिंदूओं का था, उन महलों और झीलों पर अब आतंक का कब्ज़ा हो गया और तुम्हें मिला दिल्ली में दस बाई दस का टेंट..|
-एक दिन वो था जब ढाका का हिंदू बंगाली पूरी दुनियाँ में जूट का सबसे बड़ा कारोबारी था | आज उसके पास सुतली बम भी नहीं बचा |
३.
ननकाना साहब, लवकुश का लाहौर, दाहिर का सिंध, चाणक्य का तक्षशिला, ढाकेश्वरी माता का मंदिर देखते ही देखते सब पराये हो गए |
पाँच नदियों से बने पंजाब में अब केवल दो ही नदियाँ बची |
-यह सब किसलिए हुआ.?
Read 11 tweets
5 Sep
१.
🚩🚩🚩🚩🚩

*आम्ही हाफ पॕन्टवाले.*

पूर्वी आमच्या शाखेच्या "हाफ पॅन्टला" दात विचकत हसायचे, स्वत: मात्र बर्मूडा घालून मिरवायचे... तरीही *आम्ही आत्मियतेनं रक्षाबंधन उत्सवानंतर राख्या बांधायला आणि मकरसंक्रांती उत्सवानंतर तिळगुळ आणि लाडू द्यायला त्यांच्या घरी जात राहीलो.*
२.
नंतर दोन जणांच्या उपस्थिती असलेल्या शाखेवर हसत स्वत: मात्र घरदार भरण्यासाठी जगायचे....
मग आमच्या शाखेतल्या खेळांवर हसायचे...जेव्हा ते घरात बसून ढे-या वाढवायचे...मात्र *संकटसमयी त्यांना आमचीच आठवण यायची आणि आम्ही?कोडगे ना आम्ही! त्यांनी हाक मारली न मारली तरी धावून जात राहीलो.
३.
आमच्या विचारांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या पक्षाच्या निवडून आलेल्या केवळ दोन खासदारांना हसायचे.....
#३७० व ३५ब या मुद्द्याला विनोदाची वारी दाखवत... राम मंदिरा विषयी म्हणायचे तारीख नहीं बताएंगे...आणि आम्ही ?.....
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(