साधा सर्दी खोकला झाला की आलं, तुळस काढा घ्यायचो,
पोट दुखल की ओवा चावत जायचो.
ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो.
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,
ना हॉस्पिटलच्या एडमिशन मध्ये अडकत होतो.
निरोगी आयुष्य जगत होतो!
साला मी अडाणी होतो
तेच बर होत ... ☺️
राम राम ला राम राम,
सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम
आणि जय भीम ला जय भीम नेच प्रेमाने उत्तर देत होतो
ना धर्म कळत होता
ना जात कळत होती
माणूस म्हणून जगत होतो ...
वयाची बरीच वर्ष चाळीतच गेली. आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद!
असो ... तर, चाळीची मज्जाच और होती. एका मजल्यावर १४ खोल्या, दोन मजल्यांची चाळ. समोरासमोर ७ खोल्या, पुढे गॅलरी, मध्ये (open common) पॅसेज. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा-बारा वाजताच बंद व्हायचे.
कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. इतर जाती-धर्माची कुटुंब असूनही शाकाहारी-मासाहारी असा भेदभाव नव्हता. घरातील पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटुंब!