#Thread
• महाराणी ताराबाईसाहेब -

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर दीडच महिन्यात (२१ एप्रिल १७००) सातारचा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर पुढच्या दीडच महिन्यात (९ जून १७००) परळीचा किल्लाही मराठ्यांच्या हातून मोगलांच्या हाती गेला‌.

@TMahrattas @ShefVaidya

१/१० Image
यानंतर औरंगजेबाची कल्पना अशी की, राजाराम महाराजांच्या ‘असाहाय्य स्त्रिया आणि अज्ञान मुले’ यांना शरण आणायला कितीसा वेळ लागणार?

परंतु त्याच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यावेळी दक्षिणेच्या राजकीय नभोमंडळात एक अत्यंत दीप्तिमान तारा उदय पावत होता.

२/१०
या ताऱ्याच्या प्रकाशाने पुढे अल्पावकाशातच महाराष्ट्राचे मरगळलेले राजकारण पुन्हा उजळून निघाले. विभागून पडलेल्या शक्ती संघटित होत गेल्या. वीरवृत्तींना संजीवनी मिळाली आणि निराशेच्या राखेतून नव्या पराक्रमाचे स्पुरण फुलू लागले.

हा तेजस्वी तारा म्हणजे महाराणी ताराबाईसाहेब.

३/१०
महाराणी ताराबाई यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते आणि कार्यशक्ती दांडगी होती. त्यांचा जन्म १६७५ साली मोहित्यांच्या घराण्यात झाला. छत्रपती शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या.

४/१०
माहेरचे नाव सीताबाई, पण राजाराम महाराजांची विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव ताराऊसाहेब (ताराबाई) असे ठेवण्यात आले.

राजाराममहाराज रायगडावर संभाजीमहाराजांच्या नजरकैदेत होते, त्याच काळात छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचे लग्न हंबीरराव मोहित्यांच्या या कन्येशी करून दिले.

५/१०
विवाहाच्या वेळी त्यांचे वय आठ वर्षाचे आणि राजाराम महाराजांचे तेरा वर्षांचे होते.

छत्रपती राजाराम महाराजांच्या हयातीतच त्या राजकारणात भाग घेत असत, असे तत्कालीन माहितीवरून दिसते.

६/१०
मोघलांच्या फौजेबरोबर असलेल्या पर्शियन इतिहासकार खाफीखान याने ही गोष्ट मुद्दाम नमूद करून ठेवली आहे‌.

इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांनीही म्हटले आहे, “ताराबाईने पतीच्या हयातीतच आपला पौरुषी कार्योत्सव आणि बुद्धिमत्ता निदर्शनास आणून दिली होती‌.

७/१०
याच काळात तिने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेण्यास आरंभ केला होता.”

‘भारतवर्ष’'त वरील विधानाला पूरक असे उल्लेख आढळतात. त्यात म्हटले आहे, “तेथे राजाराम तंजावरा लढत असता ताराबाईने महाराष्ट्रातील एखाद्या प्रसिद्ध राणीप्रमाणे अंमल चालविला.

८/१०
नवरा जिवंत असतानाही हिने रामचंद्रपंतासारख्यावर जरब बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांची खरी सून.”

छत्रपतींच्या या शूर सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीने इ.स.१७०० ते १७०७ पर्यंत सात वर्षे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत दक्षिणेतच मुक्काम करावा लागला आणि ...

९/१०
अपयश पदरी घेऊन येथे देह ठेवावा लागला.

संदर्भ : स.मा.गर्गे, करवीर रियासत

महाराणी ताराबाईसाहेब यांना त्रिवार मनाचा मुजरा 🙇🙇🙇🚩

१०/१०

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Tushar Lagad Patil 

Tushar Lagad Patil  Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @lagadpatil_007

27 Nov
#Thread

बाळाजी बाजीरावानें सदाशिवरावभाऊची पानिपतसाठी जी निवड केली ती यथायोग्य होती. कारण, सदाशिवरावभाऊ असा उत्तम मुत्सद्दी म्हणून नांवाजला गेला होता तसा लढवय्या सरदार म्हणूनहि त्याचा चांगला लौकिक होता.

@TMahrattas @the_mahrattas @ShefVaidya

१/८ Image
१७४७ त सदाशिवरावभाऊने बहादूर मेंड्याची स्वारी केली (का. पत्रे, यादी ६८). १७५० त यमाची शिवदेवाचें बंड त्याने स्वतः जाऊन मोडिले -१७५१ च्या मार्चात बाळाजीने सलाबताला तुंगभद्रेवर अडविलें त्या वेळी भाऊ त्याच्या बरोबर होता.

२/८
१७५१ च्या नोव्हेंबरांत सलाबत बुसीला घेऊन कोरेगांवास आला तेव्हा भाऊ लढाईत हजर होता. १७५२ च्या डिसेंबरातं भालकीची लढाई झाली तींत तो होता.

१७५३ च्या जानेवारींत श्रीरंगपट्टणची स्वारी झाली. तींतही भाऊ व रामचंद्रबाबा शेणवई हे दोघे होते.

३/८
Read 9 tweets
26 Nov
चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला.

#MumbaiTerrorAttack

१/४ ImageImage
कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण ...

२/४
त्या दरम्यान ओंबळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर थोड्या झटापटीनंतर पकडले.

तुकाराम ओंबळ्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण ...

३/४
Read 4 tweets
26 Nov
बांधवानो आपण हे असले प्रकार आणखी किती पाहायचेत याला आता थांबवने खुप महत्वाचे आहे. आज गरज आहे सर्वांनी सहभागी होवून मोठी मोहिम उभारायची. आपण पाहतो की उदा. शिवाजी हायस्कूल, शिवाजी चौक, शिवाजी महाविद्यालय यासर्वांना ...

१/४ Image
‘छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल’, ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय’ करायला लावा तरच बाकी शक्य आहे आजही परिस्थिती अशीच आहे चौक ,शाळा व महाविद्यालयवाले महाराजांचा एकेरी नामोच्चार करतांना सर्रास आढळतात !

२/४
जरा आपल्या सभोवतालच्या परिसरात बघा आपल्याला स्पष्ट जाणवेल या करिता सर्व जिल्यात जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी शाळा महाविद्यालय चे मुख्याध्यापक यांना निवेदन देवून या गंभीर बाबी कडे लक्ष केंद्रित करायला लावा.

महाराजांच्या स्वराज्यात महाराजांचा नामोच्चार अदबिने झालाच पाहिजे !!

३/४
Read 5 tweets
28 Aug
#Thread -
• शिवछत्रपतींच्या पत्रांतील भाषासामर्थ्य

पत्र म्हणजे संवादाचे साधन. पत्रातून व्यक्तिमत्वाचे पैलू अगदी सहजपणेउलगडत जातात. शिवछत्रपतींच्या पत्रव्यवहारातून ठळकपणे जाणवते ती त्यांची कडक शिस्त !

शिवछत्रपतींची पत्रे अभ्यासली असता पत्रांतील वाक्यरचनेची खास...

१/
...वैशिष्ट्य जाणवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लक्षात येण्यास मदत होते. पत्रव्यवहारातून शिवछत्रपतींचे सामर्थ्य, लोभ, प्रेम, माया, राग, थोरवी, दबदबा, शिस्त, धर्म, कर्तव्य, धाक, व्यवहार, मुत्सद्दीपणा, कान उघडणी, जाब, प्रश्न, आदेश, आज्ञा, विनंती, दान, ...

२/
...वास्तवदर्शीपणा, दूरदृष्टी काय होती? किती उच्च प्रतीची होती हे उमजण्यास मदत होते.

*प्रश्नार्थक पत्रांतील वाक्यरचना -

प्रश्नार्थक पत्रातून प्रश्न विचारताना {खरेतर जाब} आमने-सामने संभाषण केल्याप्रमाणे प्रश्न असतात. भाषेतील जरब व व्यक्तिमत्वाचा प्रभाव स्पष्ट दिसतो. जो...

३/
Read 7 tweets
26 Aug
#Thread -

• कैलासा मंदिर, वेरूळ, महाराष्ट्र, भारत

कैलास मंदिराला वेरूळ लेण्यांची ‘गुफा क्र. १’ असे संबोधले गेले आहे आणि हे जगातील सर्वात मोठे अखंड रचना म्हणून उल्लेखनीय आहे जो की एकाच खडकाच्या मोठ्या तुकड्याने बनवलेले आहे.

१/ ImageImage
मंदिराच्या प्रभावी आकाराव्यतिरिक्त, हे त्याच्या शिल्पांसाठी, तसेच त्याच्या इतर स्थापत्य घटकांच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी देखील उल्लेखनीय आहे.

कैलास मंदिर हे महाराष्ट्राच्या पश्चिम भारतीय भागात स्थित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे.

२/ Image
हे मंदिर वेरूळ लेण्यांचा भाग आहे, एक धार्मिक परिसर ज्यामध्ये 34 रॉक-कट मठ आणि मंदिरे आहेत. या मंदिराचे नाव कैलास पर्वतावरून पडले आहे, जे हिंदू देव शिवाचे हिमालयी निवासस्थान आहे.

साधारणपणे असे मानले जाते की हे मंदिर इसवी सनाच्या 8 व्या शतकात,

३/ Image
Read 7 tweets
3 Aug
#Thread
• छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते ?

छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे त्यावेळी होती. पाश्चिमात्यात हेन्री ऑक्झेडन, निकालो मनुची, थेव्हनॉट, उस्टीक, इ. तर भारतीयात परमानंद, परकलदास इ. परंतू फारच थोड्या व्यक्तींनी शिवरायांच्या

१/
व्यक्तिमत्वाबद्दल किंवा शारीरिक ठेवणीबद्दल प्रत्यक्षात नोंद करुन ठेवली आहे.

• महाराजं कसे दिसत होते ?

*इ.स. १६६४ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी वखारीतल्या इंग्रज अधिकारी एस्केलिऑट याने केलेले वर्णन-

"His personality is described by them , who have seen him , to be of...

२/
...mean stature (medium height) lower some what than i am (when) erect and of an excellent proportion. Actual in exercise ane whenever he speaks seems to smile, a quick and piercing eye and witter than any of his people."

अर्थ-
"छत्रपती शिवाजी राजे आपल्या दक्षिणेकडील...

३/
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(