मित्रांनो, परंपरागत पद्धतीने म्हणजेच JAVA/PYTHON/.NET ह्या प्रोग्रामिंग language वापरून जर systems तयार केल्या तर त्या साठी लागणार वेळ खूप जास्ती असतो. सोबतच जितका जास्ती code तितकेच bugs असण्याची शक्यता असते. 👇
म्हणूनच IT industry मध्ये readymade tools/platforms ला खूप महत्त्व आहे. हे tools तुमच्या साठी code लिहितात आणि एका developer चा वेळ वाचवतात. आजच्या घडीला जितक्याही IT Systems बनत आहेत त्या मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे System Integration (SI). 👇
तर SI साठी लागणाऱ्या एका Platform बद्दल थोडी माहिती देत आहे. Mulesoft Anypoint Platform हे एक अग्रणी असलेले SI tool आहे. विशेष म्हणजे ह्या Mulesoft चे २ course मोफत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला tool बद्दल माहिती आणि system कशी बनवायची ह्या बद्दल माहिती देतात. 👇
हे २ courses केल्यावर तुम्ही MuleSoft Certified Developer - Level 1 ह्या Certification साठी सज्ज होता. Mulesoft developers साठी नेहमीच openings असतात (Source: LinkedIn). तर सगळ्या मराठी आणि IT मध्ये करिअर करू पाहणाऱ्या तरुणांनी नक्कीच ह्याचा लाभ घ्यावा. 👇
IT कंपनी मध्ये मुलाखत घेतांना विशेषतः Computer/IT Freshers ला विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे What is a Class and What is an Object? 👇
जवळपास सगळ्यांचं उत्तर हे पुस्तकी भाषेतलं असतं कि A Class is Blueprint of Object and an Object is instance of Class. हे उत्तर म्हणजे पत्ता सांगण्यासारखं आहे. बस स्टॅन्ड कुठे तर गणपती मंदिरासमोर आणि गणपती मंदिर कुठे तर बस स्टॅन्ड समोर. दोन्ही अमोरासमोर.👇
ह्याच प्रश्नाला जर थोडं सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणासहित सांगता आले तर त्याचा 'इम्पॅक्ट' चांगला होतो.
उदाहणार्थ जर तुम्हाला सायकल डिजाईन करायची आहे. तर आपल्याला काय प्रश्न पडणार? 👇