aKhILeSh Profile picture
Learner. Love Marathi Movies, Bollywood movies, music..fan of A.R. Rahman, Amit Trivedi, Ajay-Atul.
Aug 30, 2022 12 tweets 3 min read
#HumanWildlifeConflict

भाग १
---
गोष्ट आहे २०१८ ची. US शिफ्ट होऊन १ आठवडा झाला होता. संध्याकाळची वेळ होती आणि पाऊस पडत होता. अचानक माझ्या आणि माझ्या बायकोच्या मोबाईल मधून एक कर्कश आवाज यायला सुरवात झाली. तो आवाज कॉल किंवा मेसेज चा नव्हता. असा आवाज याआधी कधी ऐकला नव्हता. 👇 तो आवाज कसा होता ते तुम्ही खालील संकेत स्थळी ऐकू शकता.



थोडी माहिती गोळा केल्यावर समजले कि तो आवाज Emergency Alert System मुळे होता.पाऊस पडत असल्याने पाणी साचून अपघात होऊ शकतात म्हणून फ्लॅश फ्लड वॉर्निंग चा अलर्ट होता.👇
Aug 10, 2022 18 tweets 3 min read
#BrainDump
१० ऑगस्ट २००६ - माझ्या साठी खूप महत्वाचा दिवस कारण ह्याच दिवशी मी माझ्या IT करिअर ला मुंबई मध्ये सुरुवात केली होतो.ह्या १६ वर्षात मी जे काही करू शकलो ते माझ्या पहिल्या कंपनी मध्ये तयार झालेल्या base मुळेच.तर ह्या १६ वर्षातील माझे अनुभव मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय👇 १. IT (technical) दुनिया खूप मोठी आहे.टेक्निकल जॉब्स मध्ये DotNet/JAVA/Python/javascript व्यतिरिक्त पण खूप काही आहे.टूल्स/प्रॉडक्ट्स मध्ये प्रचंड प्रमाणात काम असतं.काही इंडस्ट्री मध्ये विशिष्ट प्रॉडक्ट्स वापरले जातात त्या प्रॉडक्ट्स चे कस्टमायझेशन मध्ये पण खूप काम असतं👇
Mar 9, 2022 10 tweets 3 min read
#IT #ITJobs #Freshers
आधीच्या 🧵 मध्ये आपण Interfaces आणि Abstract Class बद्दल माहिती घेतली.

आज आपण Java 8 मधील बदलांच्या अनुषंगाने ह्याच प्रश्नाचे स्वरूप कसे बदलू शकतं ते बघूया. Java 8 मध्ये आपण Interfaces मध्ये पण methods चे default implementation देऊ शकतो. 👇 ह्याचाच अर्थ कि आधी interfaces आणि abstract class मध्ये जो एक मूळ फरक होता तोच जसा काही नाहीसा झाला. Java 8 च्या अगोदर Interface मधील method चे फक्त signature देऊ शकत होतो पण आता signature आणि वास्तविक code पण Interfaces मध्ये लिहू शकतो. 👇
Mar 4, 2022 15 tweets 3 min read
#IT #ITJobs #Freshers #सोप्याभाषेत

फ्रेशर म्हणून एका डेव्हलपर ला मुलाखती दरम्यान विचारला जाणारा प्रश्न म्हणजे Interface आणि Abstract Class म्हणजे काय? आणि कोणत्या वेळी काय वापरावे? दैनंदिन जीवनातील काही उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सगळ्यांना समजता येईल. 👇 🔎Interface - सोप्या भाषेत सांगायचं झालं तर Interface म्हणजे एक साचा. जसा एका मूर्तिकाराकडे मूर्ती बनवायचा एक साचा असतो अगदी तसा. आता समजा कि तुम्ही अमुक एक मूर्ती बनवण्याचा साचा विकताय. 👇
Mar 2, 2022 4 tweets 1 min read
आमचे प्रॉडक्ट डेटा सेंटर वरून AWS वर जात आहे (टेस्ट सर्व्हर्स).प्रॉडक्ट मध्ये ई-मेल नोटिफिकेशन पाठवण्याचा एक भाग आहे.म्हणूनच AWS वर ई-मेल सर्व्हर सेटअप केले आहे.पण ई-मेल काही जात नव्हते आणि error येत होता Mail server connection failed.👇 Connection failed असा error होता म्हणून AWS चे Security Groups बघितले पण सगळं व्यस्थित होतं. आणि विशेष म्हणजे जसे हे सर्व्हर्स आहेत तसेच दुसरे AWS servers बनवले पण तिथे कधीच असा error नाही आला. 👇
Jan 16, 2022 13 tweets 5 min read
#Linux #VirtualBox #Free #IT #ITJobs #FreeTool #सोपे

बऱ्याच डेव्हलपर्स ला Linux शिकायचे असते. Java/python ह्या languages जितक्या Linux वर प्रभावशाली आहेत तितक्या Windows वर नाहीत. म्हणून Linux चे ज्ञान असणे आवश्यक ठरते. पण कशी शिकणार/इंस्टॉलेशन हा मोठा प्रश्न पडतो. 👇 Laptop ला Dual boot मध्ये २ OS टाकू शकता पण मला ती एक किचकट पद्धत वाटते. तुम्ही तुमच्या Windows लॅपटॉप च्या command prompt ला cygwin द्वारे Linux terminal सारखे वापरू शकता पण फक्त terminal म्हणजे OS नव्हे. तिथे फक्त तुम्हाला मूलभूत commands वापरता येतील.👇
Dec 28, 2021 11 tweets 3 min read
#IT #ITJobs #Freshers #ObjectOrientedProgramming #सोप्याभाषेत

IT कंपनी जॉब साठी CS/IT फ्रेशर्सना विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे "What is Encapsulation?" या प्रश्नाला सहसा Data Hiding असं उत्तर मिळतं. पण Encapsulation चा "प्रॅक्टिकल" उपयोग काय तर समाधानकारक उत्तर मिळत नाही.👇 ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी एक गोष्टं सांगतो.

२००६ सालची गोष्टं आहे. Java Developer म्हणून माझा पहिला जॉब आणि पहिला प्रोजेक्ट. 👇
Dec 12, 2021 10 tweets 3 min read
#IT #Freshers #सोप्याभाषेत #ObjectOrientedProgramming #ITJobs #Thread

IT कंपनी मध्ये मुलाखत घेतांना विशेषतः Computer/IT Freshers ला विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे What is a Class and What is an Object? 👇 जवळपास सगळ्यांचं उत्तर हे पुस्तकी भाषेतलं असतं कि A Class is Blueprint of Object and an Object is instance of Class. हे उत्तर म्हणजे पत्ता सांगण्यासारखं आहे. बस स्टॅन्ड कुठे तर गणपती मंदिरासमोर आणि गणपती मंदिर कुठे तर बस स्टॅन्ड समोर. दोन्ही अमोरासमोर.👇
Dec 7, 2021 6 tweets 3 min read
@MarathiRojgar

#IT #FreeCourses #ITJobs

मित्रांनो, परंपरागत पद्धतीने म्हणजेच JAVA/PYTHON/.NET ह्या प्रोग्रामिंग language वापरून जर systems तयार केल्या तर त्या साठी लागणार वेळ खूप जास्ती असतो. सोबतच जितका जास्ती code तितकेच bugs असण्याची शक्यता असते. 👇 म्हणूनच IT industry मध्ये readymade tools/platforms ला खूप महत्त्व आहे. हे tools तुमच्या साठी code लिहितात आणि एका developer चा वेळ वाचवतात. आजच्या घडीला जितक्याही IT Systems बनत आहेत त्या मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे System Integration (SI). 👇