सरदार #पानसे#मल्हार_गड#सोनोरी (सरदार पानसे) #Sanket_Jagtap
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला मल्हारगड पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे.
पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे
पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधिव टाके लागते.
टाक्यांच्या जवळच ध्वजस्तंभ असून त्यावर सदैव भगवा विराजमान आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. ते टाके गडावर संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने गेले 2 वर्षांत साफ करून त्यातील गाळ काढून ते टाके साफ करून
घेतले व यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही. असेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहिरीतही पाणी नाही. या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा होता, किल्ल्यावर दुर्ग संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने
त्यातील पूर्ण माती काढून तो ये-जा करण्यासाठी उघडा केला आहे. ७ पायऱ्या आहेत. तसेच या संस्थेने अजून एक केलेले महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे किल्ल्याच्या बरोबर आतील बाजूस आपल्याला मातीच्या ढिगा खाली कित्येक वर्ष बुजलेला शिवकालीन मोठा चौथरा आपल्याला तिथं दिसून येईल व आपले लक्ष वेधून घेऊल
याचे उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे जरा मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे गडाला
श्री क्षेत्र जेजुरी आणि श्री क्षेत्र कडेपठारचे स्वरूप आले आहे. फक्त मल्हारगडवरच खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावरून कऱ्हा नदी, जेजुरीचा डोंगर, कडेपठार, वगैरे दिसतात.
किल्यावर जाण्यासाठी सोनोरी गावाचा उत्तम पर्याय आहे. सोनोरी गावातून गेल्यावर सरदार पानसे यांचा वाडा पाहण्या सारखा आहे. या वाड्याच्या बाजूला असणारे ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. तसेच लक्ष्मी-नारायण मूर्ती असलेले मंदिर पाहण्या सारखे आहे. अखंड संगमरवरी मध्ये घडवलेली
ही नारायणाची मूर्ती लक्ष वेधून घेते. सरदार पानसे यांचे पुरातन गणपती मंदिर मन मोहून टाकते.
जय श्रीराम जय शिवराय 🚩📿
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
१० जानेवारी इ.स.१६६४
शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. महाबत खान सुरतेच्या बचावासाठी येत असल्याने ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७२४
बाजीराव-पोर्तुगिज यांच्यात तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३०
शनिवारवाड्याचे बांधकाम १७३०ला सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३४
बाजीरावाविरुद्ध लढताना सिद्दी अंबर अफबानीचा रायगडाखाली पराभव होऊन मृत्यू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३९
इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.केळवे पाणकोटा प्रमाणे
महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले #चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन
प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.
सातवाहन काळात हे बंदर सर्वोच्च शिखरावर होते.
१७ व्या शतकानंतर याचे महत्व कमी होत गेले.
चौल हा पुर्वी 15 पाखाडयामध्ये विभागलेला होता, या 15 पाखाडयापैकी भोरसी पाखाडीत चौलचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर आहे.
चौलचे श्री रामेश्वर मंदिर फार वर्षापुर्वीचे असावे असा अंदाज बांधण्यात येतो.
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
९ जानेवारी इ.स.१६३६
शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१६५७
छत्रपती शिवरायांचा "गायकवाड" घराण्यातील "सकवारबाई" यांच्याशी विवाह.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१६६४
बहरोचहून मुघलांची फौज सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना समजली, शिवरायांचे मावळ्यांना परतीच्या प्रवासासाठी तात्काळ लवाजमा बांधणीचे आदेश.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१६७१
बहादूरखान स्वराज्यावर चालून यायला निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जानेवारी इ.स.१६८०
सिद्दीने उंदेरी बेटाचा ताबा घेऊन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. अर्थातच मराठ्यांनी सिद्दीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१७२२
पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह केला
सन १७२१ च्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
८ जानेवारी इ.स.१०२६
गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण.महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जानेवारी इ.स.१६५८
कल्याणहून शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किला असनगावच्या जवळ आहे. याच माहुलीगडावर शहाजी राजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांशी एकवीस वर्षापूर्वी दिली होती. त्यांत ते हरले होते. तो माहुली - भंडारगड - पळसगड ,
शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जानेवारी इ.स.१६६४
सुरतेवरील स्वारी - लूटीचा तिसरा दिवसइनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#छत्रपती_शिवाजी_महाराज आणि #इतिहास
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - दौलत खान.
खरे उत्तर - याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली. त्या अगोदरच राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होते.
शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - सिद्दी हिलाल
खरे उत्तर - हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता. तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी याला वाटेतच ठार केला.
शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ?? खोटे उत्तर - नूरखान
खरे उत्तर - पहिले सेनापती माणकोजी दहातोंडे होते.
नूरखान हा दरोडेखोर होता जुन्नर मावऴात.
गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षणाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधणी संरक्षण बाजू अतिशय महत्त्वाची म्हणूनच शिवरायांच्या दुर्गबांधणीतील
एक अद्भूत प्रयोग आपल्याला पहायला मिळतो तो म्हणजे महादरवाजाची बांधणी.. आदी दोन बुरूजांच्या कवेत अगदी शेवटपर्यंत न दिसता बेमुलाग पद्धतीने लपवलेली ही बांधणी भक्कम बुरुज, अरूंद अधिक चढाच्या पायऱ्याही काही खास वैशिष्ट्ये शत्रूला अगदी शेवटपर्यंत न दिसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये
लपवलेली अशी ही बांधणी दरवाजावर सतत पहारा तसेच संरक्षणाच्या दृष्टीने जंग्या झरोके अशी केलेली आढळते पहारेकऱ्यांच्या सोयीसाठी देवड्यांची रचना दरवाजातच पहायला मिळते गडाला महादरवाजा खेरीज एक दोन असे वेगवेगळे दरवाजे असत गडाचे महत्वाचे आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा...